निपाणी (वार्ता) : निपाणी येथील रोहिदासनगरमध्ये असलेल्या गजानन महाराज मंदिरात संत गजानन महाराजांचा ११६ वा संजीवन समाधी सोहळा पार पडला. त्यानिमित्त ५६ प्रकारचा नैवेद्य दाखवण्यात आला. पहाटे पाच वाजता शैलजा पाटील, अभिषेक पाटील व राजेंद्र पवार-वडर यांच्या हस्ते काकड आरती, अभिषेक, दुग्धाभिषेक अभिजीत कुलकर्णी यांच्या पौराहित्याखाली करण्यात आले. सहा …
Read More »दसरा महोत्सवातील क्रीडा स्पर्धेत पार्श्वमती विद्यालयाची दैदिप्यमान कामगिरी
निपाणी (वार्ता) : श्री बाहुबली विद्यापीठ, बाहुबली संचलित अक्कोळ येथील श्री पार्श्वमती विद्यालयातील विद्यार्थिनींनी दसरा महोत्सवांतर्गत आयोजित तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धेत उल्लेखनीय कामगिरी करत विविध क्रीडा प्रकारांत विजेतेपद व पदके मिळविली. त्यामुळे या विद्यार्थिनींची जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धेसाठी निवड झाली आहे. स्पर्धेत विद्यालयाच्या गौरी सुतार हिने १५०० विठ्ठल धावणे, संजली जबडे …
Read More »प्रत्येक क्षेत्रातील अभियंत्यांचे योगदान महत्त्वाचे
जयश्री पाटील ; निपाणीत अभियंता दिन कार्यक्रम निपाणी (वार्ता) : अभियंता म्हणजे केवळ इमारती, पूल, रस्ते किंवा यंत्रे तयार करणारी व्यक्ती नव्हे. अभियंता म्हणजे समस्या ओळखून त्यावर योग्य, शाश्वत आणि नाविन्यपूर्ण उपाय शोधणारा व्यक्ती आहे. आपल्या जीवनातील प्रत्येक क्षेत्रात अभियंत्यांचे योगदान महत्त्वाचे आहे. घरापासून ते गगनचुंबी इमारतींपर्यंत, छोट्या यंत्रापासून …
Read More »निपाणी परिसरात सोनपावलांनी गौराईचे आगमन
दुपारनंतर महिलांची लगबग; भक्तीभावाने केली आरास निपाणी (वार्ता) : निपाणी शहर, ग्रामीण भागात गुरुवारी (ता. १७) गौरीची थाटामाटात विराजमान झाली. माहेरवासिनींचे प्रतीक समजल्या जाणाऱ्या या गौरीची दुपारनंतर महिलांनी मुहूर्तावर नदी, विहिरी, तलाव, जलकुंभ आधी ठिकाणी पूजा केली. युवतींनीही साजशृंगार करून सण साजरा केला. पूजेनंतर महिला, युवतींनी झिम्मा, फुगडी, सूप, …
Read More »शहरातील सार्वजनिक गणेश मंडळातर्फे नेत्रदीपक देखाव्यांची निर्मिती
निपाणी (वार्ता) : निपाणी येथे गणेशोत्सवानिमित्त शहरातील विविध सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांकडून धार्मिक, सामाजिक आणि सांस्कृतिक विषयांवर आधारित आकर्षक नेत्रदीपक देखावे साकारण्यात आले आहेत. यामध्ये दलाल पेठ येथील श्री हनुमान गणेशोत्सव मंडळ व ट्रबलर्स ग्रुप यांच्यातर्फे साकारण्यात आलेला ‘काशी घाट दर्शन’ हा देखावा भाविकांचे विशेष लक्ष वेधून घेत आहे. निपाणीतच …
Read More »फॅब इंडियाचे माजी संचालक, समाजसेवक जी. एन. गोपीकृष्ण यांचे निधन
बेळगाव : बेळगाव येथे वास्तव्यास असलेले समाजसेवक जी. एन. गोपीकृष्ण (75) यांचे रविवारी गदग जिल्ह्यातील लक्ष्मेश्वर येथे निधन झाले. मूळचे बळारी येथील असलेले गोपीकृष्ण यांनी बेळगावसह विविध शहरांमध्ये शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर मुंबईतील टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेस येथून ग्रामीण विकास आणि समाजसेवा विषयात पदव्युत्तर शिक्षण विशेष गुणवत्तेसह पूर्ण …
Read More »जायंट्स सप्ताहाचा उत्साहात प्रारंभ
बेळगाव : येथील जायंट्स ग्रुप ऑफ बेळगाव मेनतर्फे दरवर्षीप्रमाणे यंदाही जायंट्स सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. सप्ताहाचा शुभारंभ बालिका आदर्श विद्यालय येथे व्हॉलीबॉल स्पर्धेला प्रारंभ करून करण्यात आला. बांधकाम व्यावसायिक आर. एम. चौगुले आणि जायंट्स ग्रुप ऑफ बेळगाव मेनचे अध्यक्ष लक्ष्मण शिंदे यांच्या हस्ते नेटपूजन करण्यात आले. यावेळी फेडरेशन ऑफिसर …
Read More »बसरीकट्टी येथे सुवर्ण पदक विजेते प्रज्वल हिरोजीचा सत्कार
बेळगाव : ओडिसातील भुवनेश्वर येथे नुकत्याच पार पडलेल्या ऑल इंडिया स्लिंगशॉट स्पर्धेत (नेमबाजी) बसरीकट्टी गावचे सुपुत्र कु. प्रज्वल लक्ष्मण हिरोजी यांनी पंधरा वर्षे वयोगटात स्लिंगशॉट स्पर्धेत सुवर्णपदक मिळवल्याबद्दल त्याचा गावांमध्ये सत्कार करण्यात आला बसरीकट्टी गावातील गावच्या प्रवेश भागात असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये प्रज्वल हिरोजी याचा माजी एसडीएमसी अध्यक्ष …
Read More »कर्नाटक सरकारची ‘गृहलक्ष्मी’ योजनेची पडताळणी प्रक्रिया सुलभपणे पार पाडण्याची सुप्रिया पाटील यांची मागणी
निपाणी (वार्ता) : कर्नाटक सरकारची ‘गृहलक्ष्मी’ योजना अधिक प्रभावीपणे राबविण्यासाठी लाभार्थी महिलांची पडताळणी प्रक्रिया करण्यात येणार आहे. ही पडताळणी अंगणवाडी कार्यकर्त्यांच्या माध्यमातून केली जाणार असून, या प्रक्रियेबाबत माहिती घेण्यासाठी केपीसीसी सदस्य व कर्नाटक प्रदेश महिला काँग्रेसच्या जनरल सेक्रेटरी सुप्रिया पाटील यांनी येथील सीडीपीओ कार्यालयास भेट देऊन अधिकाऱ्यांशी चर्चा …
Read More »१५ वर्षे समर्पणाची… नव्या यशाकडे वाटचाल
‘विवेकानंद’चे चेअरमन कुमार पाटील यांची पत्रकार परिषद बेळगांव : १५ वर्षे समर्पणाची… नव्या यशाकडे वाटचाल अशी बिरुदावली असलेल्या कॉलेज रोड येथील विवेकानंद मल्टीपर्पज सौहार्द को-ऑप. सोसायटीची वार्षिक सर्वसाधारण सभा बुधवार दि. २३ सप्टेंबर रोजी सकाळी अकरा वाजता जगन्नाथराव जोशी सभागृह, गुडसशेड रोड, बेळगांव येथे होणार आहे, अशी माहिती विवेकानंद …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta