जनतेच्या समस्यांवर तोडगा काढण्याऐवजी काँग्रेस सरकारने वाढविला आर्थिक बोजा : टीका बेळगाव : दूध, दही, बस तिकीट यांसह जीवनावश्यक वस्तू आणि सेवांच्या दरात करण्यात आलेली वाढ राज्य सरकारने तात्काळ मागे घ्यावी. सर्वसामान्य जनतेवरील आर्थिक भार कमी करून त्यांच्या अडचणी दूर करण्यासाठी सरकारने पुढाकार घ्यावा, अशी मागणी भाजपचे नेते किरण …
Read More »मराठी विद्यानिकेतनमध्ये आकाश कंदील व दिवाळी अंकांचे प्रदर्शन
बेळगाव : द.म.शि. मंडळ संचलित मराठी विद्यानिकेतन बेळगाव येथे दिवाळीनिमित्त विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या आकर्षक आकाश कंदील व विद्यार्थ्यांच्या लेखणीतून साकारलेल्या दिवाळी अंकांचे प्रदर्शन भरविण्यात आले. या प्रदर्शनाचे उद्घाटन ज्येष्ठ समाजसेवक डॉ. शिवाजी कागणीकर व मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण युवा समितीचे अध्यक्ष श्री. अंकुश केसरकर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी शाळेचे …
Read More »उडुपीतील शरीरसौष्ठव स्पर्धेत शहाबुद्दीनने पटकावले प्रथम पारितोषिक!
एक लाख रुपये आणि चार फूट उंचीचा आकर्षक चषक; २०० स्पर्धकांचा सहभाग उडुपी (वार्ता) : उडुपी येथील अलांकुर गावात आयोजित भव्य शरीरसौष्ठव स्पर्धेत शहाबुद्दीन याने उत्कृष्ट शरीरसौष्ठवाचे प्रदर्शन करत विजेतेपद पटकावले. त्याला रोख एक लाख रुपये आणि चार फूट उंचीचा आकर्षक चषक देऊन गौरविण्यात आले. या स्पर्धेत तब्बल …
Read More »जेलभरो आंदोलनासाठी जाणाऱ्या ‘रयत’च्या कार्यकर्त्यांना निपाणी पोलिसांनी रोखले
निपाणी (वार्ता) : यंदा सर्वत्र दुष्काळजन्य परिस्थिती निर्माण झाल्याने ऊसासह अन्य पिके करपून जात आहेत. परिणामी उसाच्या वजनात घट होण्याची शक्यता असून, उत्पादन खर्चातही मोठी वाढ झाली आहे. या पार्श्वभूमीवर साखर कारखान्यांनी प्रतिटन ३७०० रुपये आणि राज्य सरकारने प्रतिटन १०० रुपये अनुदान द्यावे, अशी मागणी रयत संघटनेसह विविध …
Read More »शेतकऱ्यांच्या समर्थनार्थ वकिलांचे कामकाज बंद
चुन्नप्पा पुजारी यांच्यासह शेतकऱ्यांना ताब्यात घेतल्याच्या निषेधार्थ राणी चन्नम्मा सर्कल येथे निदर्शने बेळगाव : ऊस उत्पादकांच्या आंदोलनादरम्यान शेतकरी नेते चुन्नप्पा पुजारी यांच्यासह अनेक शेतकऱ्यांना पोलिसांनी ताब्यात घेतल्याच्या निषेधार्थ गुरुवारी बेळगावातील वकिलांनी कामकाज बंद ठेवून आंदोलन केले. शहरातील राणी चन्नम्मा सर्कल येथे एकत्र आलेल्या वकिलांनी सरकार आणि पोलिसांच्या कारवाईविरोधात जोरदार …
Read More »मुडलगी दरोडा प्रकरणाचा छडा; सात जणांना अटक
२ कोटी ३९ लाखांची रोकड जप्त; आणखी दोघे फरार – जिल्हा पोलीसप्रमुख के. रामराजन यांची माहिती बेळगाव : मुडलगी येथे २ कोटी ६८ लाख रुपयांचा दरोडा टाकल्याच्या प्रकरणाचा मुडलगी पोलिसांनी छडा लावला आहे. याप्रकरणी सात जणांना अटक करण्यात आली असून, त्यांच्याकडून २ कोटी ३९ लाख रुपये रोख रक्कम जप्त …
Read More »रेशनच्या तांदळाचा काळाबाजार रोखण्यासाठी धडक मोहीम
राज्यभरात 17.78 लाख किलो तांदूळ जप्त; बेळगाव जिल्ह्यात सर्वाधिक पाच लाख किलो तांदळाचा समावेश बेळगाव : रेशनवरील तांदळाचा काळाबाजार रोखण्यासाठी अन्न व नागरी पुरवठा विभागाने राज्यभर धडक मोहीम हाती घेतली आहे. गेल्या तीन महिन्यांत बेकायदेशीर वाहतूक, साठवणूक आणि विक्रीप्रकरणी तब्बल 17.78 लाख किलो तांदूळ जप्त करण्यात आला आहे. यामध्ये …
Read More »आकर्षक सवलतींनी फुलली इलेक्ट्रॉनिक बाजारपेठ
दिवाळीत मोबाईल, टीव्ही, फ्रीज खरेदीकडे कल; अनेक वस्तूंच्या खरेदीवर गिफ्ट निपाणी (वार्ता) : दिवाळी सणात घराची सजावट, नवीन कपडे आणि फराळाच्या तयारीसह इलेक्ट्रॉनिक वस्तूंच्या खरेदीलाही ग्राहकांकडून पसंती देत आहेत. इलेक्ट्रॉनिक बाजारपेठ वेगवेगळ्या ऑफर्सनी भरले असून दीपोत्सव कॅश करण्याचा प्रयत्न केला जात आहे. दिवाळीच्या मुहूर्तावर नवीन वस्तू घरी आणण्यासाठी ग्राहक …
Read More »चून्नाप्पा पुजारींसह शेकडो ऊस उत्पादक शेतकरी पोलिसांच्या ताब्यात!
मुक्तिमठ परिसरात शेतकरी आणि पोलिसांत जोरदार वादावादी; जैन आंदोलनाला पोलिसांचा अडथळा बेळगाव : उसाला योग्य दर मिळावा, या मागणीसाठी शेतकऱ्यांनी आयोजित केलेल्या हिंडलगा जेल भरो आंदोलनाला पोलिसांनी अटकाव केला. भुतरामनहट्टी येथील मुक्तिमठ परिसरात शेतकरी आणि पोलिसांमध्ये जोरदार वादावादी झाल्याने काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले. शेतकरी नेते चून्नाप्पा पुजारी …
Read More »बेळगाव जिल्ह्यात उसाला प्रतिटन ३,६०० रुपये दर निश्चित!
कारखानदार आणि शेतकरी नेत्यांची सहमती बेळगाव : ऊसदराच्या प्रश्नावरून शेतकरी आणि साखर कारखानदार यांच्यात सुरू असलेल्या संघर्षावर तोडगा काढण्याच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण घडामोड घडली आहे. बेळगाव जिल्ह्यातील साखर कारखानदारांनी प्रतिटन उसाला ३,६०० रुपये दर देण्यास सहमती दर्शविल्याची घोषणा जिल्हा पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांनी केली आहे. शेतकरी नेते चूनाप्पा पुजारी …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta