Friday , November 6 2026
Breaking News

बसमध्ये प्रवासी फुल्ल : चालक, वाहक बेपत्ता

Spread the love

 

निपाणी आगारातील परिस्थिती ; दीड तास बसमध्ये प्रवासी अडकून

निपाणी (वार्ता) : निपाणी येथील आगारातील बससेवेवर आधार प्रमुखांचे नियंत्रण असल्याने प्रवाशांची गैरसोय होत आहे. निपाणी- हुपरी मार्गावर एकाच वेळी बऱ्याच बस सोडल्या जात आहेत. त्यामुळे एक बस भरून झाल्यानंतर त्यापाठोपाठ लागणाऱ्या बसमुळे उर्वरित बस रिकाम्याच धावत आहेत. सोमवारी (ता.२) सायंकाळी ३.४५ वाजता निपाणी प्लॅटफॉर्मर निपाणी- गजबरवाडी (के ए. २५ एफ ३१११) ही बस लावण्यात आली होती. बस भरल्यानंतरही सोडण्याची विनंती केली असता तासभर बस सोडणार नाही, अशी उद्दट भाषा वाहकाने केली. त्यामुळे प्रवाशांना सुमारे तासभर बसमध्ये बसून राहावे लागले.
दररोज सायंकाळी ४ वाजता ही बस सोडली जाते. पण सोमवारी सायंकाळी सुमारे दीड तास उशीर केला. याउलट अचानकच ढोणेवाडी आणि हुपरी बस लावण्यात आल्या. त्यामध्ये महाविद्यालय आणि प्राथमिकचे माध्यमिक शाळेतील विद्यार्थीनीं मोठी गर्दी केली. परिणामी वृद्ध नागरिक व महिलांना बसमध्ये चढणे कठीण झाले. परिणामी सुमारे तासभर बसमध्ये थांबूनच राहावे लागले. निपाणी -हुपरी मार्गावरील बस वेळेकडे आगार प्रमुख व इतर अधिकाऱ्यांचे पूर्णपणे दुर्लक्ष झाल्याने प्रवाशातून संताप व्यक्त केला जात आहे. त्याबाबत आगार प्रमुख आधार नियंत्रक यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी दूरध्वनी उचलला नाही. तरी या पुढील काळात वेळेनुसार बस न सोडल्यास आंदोलन करण्याचा इशारा प्रवाशांनी दिला आहे.
—————————————————————
‘निपाणी आगारातून विविध मार्गावर बस सेवा सुरू आहेत. पण निपाणी -हुपरी मार्गावर धावणाऱ्या बस सेवाकडे दुर्लक्ष झाल्याने वृद्ध नागरिक, रुग्ण व महिलांची गैरसोय होत आहे. तरी आगाराने आपला कारभार सुधारून वेळेनुसार बस सेवा सुरळीत करावी.’
–सुजाता माळी, प्रवासी महिला, बेनाडी

About Belgaum Varta

Check Also

राज्यस्तरीय शरीरसौष्ठव स्पर्धेत निपाणीच्या रतिक लाखेचे दुहेरी यश

Spread the love  निपाणी (वार्ता) : कर्नाटक राज्यस्तरीय शरीरसौष्ठव (बॉडीबिल्डिंग) स्पर्धांमध्ये निपाणी येथील‌ रुतिक लाखे …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *