Friday , November 6 2026
Breaking News

बोरगाव अरिहंत परिवारातर्फे शैक्षणिक क्षेत्रातील नेतृत्वांचा गौरव

Spread the love

 

 

निपाणी (वार्ता) : बोरगाव येथील अरिहंत परिवार आणि बोरगांव पट्टण पंचायतीतर्फे निपाणी शिक्षक संघाच्या अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल बशीर मुजावर, कोल्हापूर येथील शिवाजी विद्यापीठातून हिंदी विषयात पी.एच.डी. पदवी प्राप्त घेतल्याबद्दल सुधाकर इंडी यांचा अरिहंत बँक, पी के पी एस, अरे यांच्या दूध उत्पादक संघ यांच्या संयुक्त विद्यमाने सहकाररत्न उत्तम पाटील यांच्या हस्ते मान्यवरांच्या उपस्थितीत सत्कार करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या.
उत्तम पाटील यांनी, सध्या शिक्षण क्षेत्रात विविध संधी उपलब्ध असून ग्रामीण भागातील युवकांनी त्याचा लाभ घ्यावा. विशेष करून संशोधनाच्या माध्यमातून यश संपादन करावे. त्यासाठी मदत करण्यास साठी अरिहंत उद्योग समूह प्रयत्नशील असल्याचे सांगितले.
कार्यक्रमास पट्टन पंचायतचे नगराध्यक्ष दिगंबर कांबळे, उपनगराध्यक्ष रुकसाना अपराज, नगरसेवक अभयकुमार मगदूम, पी के पी एसचे उपाध्यक्ष सुमित रोड्ड, सीईओ आर. टी. चौगुला, प्रदीप माळी, दर्शन पाटील, राजू गजरे, प्रवीण पाटील, राजेंद्र ऐदमाळे, राजेंद्र पाटील, मुख्याधिकारी स्वानंद तोडकर यांच्यासह नगरसेविका, पदाधिकारी कर्मचारी उपस्थित होते.

 

About Belgaum Varta

Check Also

राज्यस्तरीय शरीरसौष्ठव स्पर्धेत निपाणीच्या रतिक लाखेचे दुहेरी यश

Spread the love  निपाणी (वार्ता) : कर्नाटक राज्यस्तरीय शरीरसौष्ठव (बॉडीबिल्डिंग) स्पर्धांमध्ये निपाणी येथील‌ रुतिक लाखे …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *