



निपाणी (वार्ता) : निपाणी येथील प्रभाग क्रमांक २२ आणि २४ मधील भीम नगरातील सार्वजनिक स्वच्छतेकडे नगरपालिका प्रशासनाचे पूर्णपणे दुर्लक्ष झाले आहे. या परिसरातील गटारीची मोडतोड झाल्या असून सांडपाणी रस्त्यावर पसरत आहे. याबाबत नागरिकांनी नगरपालिका प्रशासनाला कळवूनही दुरुस्ती देखभालीकडे दुर्लक्ष केल्याने परिसरातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. या गटांची दुरुस्त करून तात्काळ सांडपाण्याची व्यवस्था न केल्यास नगरपालिकेवर मोर्चा काढण्याचा इशारा माजी नगरसेवक मज्जिद सय्यद व नागरिकांनी दिला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी, जीवनातील सार्वजनिक सुविधाकडे सर्वांचे दुर्लक्ष झाले आहे. परिणामी परिसरातील नागरिकांना नाक दाबून परिसरात ये-जा करावे लागत आहे. मोकाट जनावरे आणि डुकरांचा वावर ही वाढला आहे. त्यामुळे लहान बालकासह नागरिकांवर डुक्करे हल्ला करत आहेत. या गंभीर बाबीकडे नगरपालिका प्रशासनाने तात्काळ लक्ष देऊन गटारीच्या दुरुस्तीसह सांडपाण्याची व्यवस्था करण्याची मागणी होत आहे.
——————————————————————
‘भीमनगर या मागास विभागाकडे स्वच्छता आणि इतर बाबतीत दुर्लक्ष झाले आहे. मूलभूत सुविधा देण्यासाठी पालिकेला निवेदन देऊनही दखल घेतलेली नाही. त्यामुळे नागरिक आंदोलनाच्या परिसरात आहेत ‘
-मज्जिद सय्यद, माजी ननिपाणी, निपाणी.
Belgaum Varta Belgaum Varta