Friday , November 6 2026
Breaking News

सीमावासीयांच्या समर्थनार्थ पुणे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन

Spread the love

 

बेळगावसह ८६५ गावांचा संयुक्त महाराष्ट्रात समावेश करण्याची मागणी; पुणेकरांचा सीमालढ्याला पाठिंबा

पुणे : बेळगाव, कारवार, निपाणी, बिदर, भालकीसह सीमाभागातील ८६५ गावांचा संयुक्त महाराष्ट्रात समावेश करावा, या मागणीसाठी तसेच १ नोव्हेंबर रोजी सीमाभागात पाळण्यात येणाऱ्या काळ्या दिनाला पाठिंबा दर्शविण्यासाठी पुणे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर लाक्षणिक धरणे आंदोलन करण्यात आले. सकाळी १० ते दुपारी ३ या वेळेत हे आंदोलन शांततेत पार पडले.

आंदोलनाच्या प्रारंभी विश्वनाथ पाखरे यांनी प्रास्ताविकातून धरणे आंदोलनाची भूमिका स्पष्ट केली. १९५६ पासून सीमाभागातील मराठी बांधवांवर होत असलेल्या अन्यायाचा उल्लेख करताना मराठी शाळा बंद करण्याचे प्रयत्न, शेतकऱ्यांच्या जमिनी बळकावण्याचे प्रकार तसेच मराठी तरुणांवर दाखल होणारे कथित खोटे गुन्हे या मुद्द्यांवर त्यांनी प्रकाश टाकला. सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित असलेल्या सीमाप्रश्नाच्या दाव्याबाबत केंद्र आणि राज्य सरकारने ठाम भूमिका घ्यावी, अशी मागणीही यावेळी करण्यात आली.

यावेळी उत्तम तरळे, विजय पाटील, एस. आर. पाटील, उदय पाटील, बाबासाहेब पाटील, रुपेश सुळकर, व्यंकाप्पा पाटील, संतोष पाटील, आराध्या गणपत पाटील, हणमंत पाटील आदींनी मनोगत व्यक्त केले. सीमाभागातील मराठी बांधवांच्या लढ्याला पुणेकरांचा पूर्ण पाठिंबा असून, न्याय मिळेपर्यंत हा लढा सुरूच राहील, असा निर्धार वक्त्यांनी व्यक्त केला.

आंदोलनाची सांगता कु. आराध्या वैराळ सुळकर हिने सादर केलेल्या ‘जय जय महाराष्ट्र माझा’ या स्फूर्तिदायी महाराष्ट्र गीताने झाली. त्यानंतर धरणे आंदोलनस्थळावरून मोर्चा काढण्यात आला. जिल्हाधिकारी कार्यालयात जाऊन गृहशाखेतील अधिकारी संतोष कोचवाड यांच्याकडे सीमाप्रश्नासंदर्भातील मागण्यांचे निवेदन सादर करण्यात आले.

या आंदोलनाला गणपत पाटील, सातेरी पाटील, मारुती पाटील, वैराळ सुळकर, अर्जुन वीर, गंगाराम वीर, संतोष कुंभार, नारायण पाटील, शिवाजी चंदगडकर, राहुल चन्नेवाडकर, संदीप बिडकर, नितीन कुर्लिंग, भरत पाटील, एम. सी. पाटील, परशराम पाटील, संदीप बर्वे, चंद्रकांत काकडे, आर्य वारुनेकर, मुरलीधर देसाई, किरण राणाप्पा पाटील, सचिन पाटील, भुजंग गोविंद पारखे, पांडुरंग करविनकोप, हरीनंद मिराशी, ज्योतीबा तिनेकर, गंगाराम चन्नेवाडकर, हेमंत तवर, पांडुरंग कुलम, सिद्धू वाकाले, शिवानंद चन्नेवाडकर, पांडुरंग पाटील, परशराम निलजकर, नारायण कृष्णाप्पा पाटील, बाळकृष्ण गुंडप, दीपक पाटील, शांताराम पेडणेकर, श्रीकांत मिराशी, निंगाप्पा पाटील, मारुती कुलम, विद्याधर पाटील, मंगेश वंजारी, मानिक पाटील, मोतीलाल बेंद्रे, हुनमंत देसाई, विठ्ठल पाखरे, राहुल घाडी, ज्ञानेश्वर पाटील, भरमानी पाटील, धानाप्पा पाटील, नागराज पाखरे, कु. स्नेहा पाटील, कु. गायत्री पाटील तसेच मराठी अभ्यास केंद्राचे प्रमुख दीपक पवार यांचे सहकारी, सोनालीताई आदी उपस्थित होते.

About Belgaum Varta

Check Also

जीवित प्रमाणपत्राच्या नावाखाली वृद्धाची २.३७ लाखांची फसवणूक

Spread the love  फेसबुकवरील जाहिरातीला प्रतिसाद देणे पडले महागात; व्हॉट्सॲपवर एपीके फाईल पाठवून सायबर चोरट्यांचा …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *