



काळ्या फिती लावून महाराष्ट्र एकीकरण समितीच्या माध्यमातून सीमावासीयांना पाठिंबा
सातारा : महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्नाकडे लक्ष वेधण्यासाठी आणि बेळगावसह सीमाभागातील मराठी भाषिकांच्या आंदोलनाला पाठिंबा दर्शविण्यासाठी १ नोव्हेंबर या काळ्या दिनानिमित्त सातारा येथे महाराष्ट्र एकीकरण समितीच्या सातारा विभागातर्फे धरणे आंदोलन करण्यात आले.
यावेळी उपस्थितांनी काळ्या फिती लावून सीमाभागातील मराठी भाषिकांवरील अन्यायाचा निषेध नोंदविला. बेळगाव, कारवार, निपाणी, बिदर, भालकीसह सीमाभागातील मराठी भाषिकांच्या महाराष्ट्रात सामील होण्याच्या मागणीला आपला पाठिंबा असल्याचे या आंदोलनातून व्यक्त करण्यात आले.
या आंदोलनात सातारा येथे वास्तव्यास असलेले बेळगावचे ग्रामस्थ परशुराम पाखरे, राजकारण शंकरराव गाडेकर, बाळकृष्ण (कल्लाप्पा) साळुंखे, नारायण गोडसे, राजू भुजंग बारूकर, बळीराम येळूलकर, केदारी पाटील आणि सुरेश पाटील सहभागी झाले होते.
Belgaum Varta Belgaum Varta