Sunday , September 20 2026
Breaking News

Belgaum Varta

कंग्राळ गल्लीत भूमिगत विद्युत वाहिन्या घालण्याचे काम सुरू

  गणेशोत्सव मंडळाच्या पाठपुराव्याला यश; विविध विभागांचा समन्वय बेळगाव : कंग्राळ गल्ली गणेशोत्सव मंडळाचे अध्यक्ष प्रतीक पाटील व त्यांच्या सहकाऱ्यांनी कंग्राळ गल्लीतील लोंबकळणाऱ्या धोकादायक विद्युत वाहिन्यांचा प्रश्न पोलीस आयुक्त श्री. प्रकाश निकम यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत मांडला होता. या मागणीची दखल घेत आता कंग्राळ गल्लीमध्ये भूमिगत विद्युत वाहिन्या घालण्याचे काम …

Read More »

देश, देव, धर्मासाठी प्रत्येकांनी काम करावे

    अदृश काडसिद्धेश्वर स्वामी; समाधी मठात मूर्ती प्राणप्रतिष्ठापना कार्यक्रम निपाणी (वार्ता) : अलीकडच्या काळात देशात अराजकता निर्माण झाली आहे. त्यामुळे मानवी जीवन संकटात सापडले आहे. त्यापासून परावृत्त होण्यासाठी प्रत्येकाने देश, देव आणि धर्मासाठी काम केल्यास जीवन सुखकर होणार आहे. त्यासाठी प्रत्येकाने साधुसंतांच्या सहवासात राहून जीवन पद्धती समजून घ्यावी, असे …

Read More »

न्यू इंग्लिश स्कूल, मुतगे येथे पालक मेळावा उत्साहात संपन्न

  मुतगे : मुतगे (ता. बेळगाव) येथील दक्षिण महाराष्ट्र शिक्षण मंडळ संचालित न्यू इंग्लिश स्कूलच्या इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांचा पालक मेळावा उत्साहात संपन्न झाला. शाळेच्या सभागृहात झालेल्या पालक मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी शाळा सुधारणा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष आर. वाय. पाटील हे होते. प्रारंभी मुलींच्या स्वागतगीताने कार्यक्रमाची सुरुवात झाली. मराठी विषयाचे शिक्षक शिवाजी हसनेकर …

Read More »

मराठी विद्यानिकेतनमध्ये किशोरावस्थेबद्दल विद्यार्थ्यांना मार्गदर्शन

  बेळगाव : दि. 8 सप्टेंबर या दिवशी मराठी विद्यानिकेतन शाळेमध्ये ‘जागृती मंचतर्फे’ आरोग्य भान-किशोरावस्था: वाढ व विकासाचा टप्पा ‘इयत्ता सातवीच्या विद्यार्थ्यांना समजावण्यात आला. यावेळी शाळेची माजी विद्यार्थिनी असलेल्या आणि सध्या शेख होमिओपॅथी मेडिकल कॉलेजच्या सहाय्यक प्राध्यापिका डॉ  कीर्ती अभय बिर्जे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. वयानुसार होणारी वाढ, मासिक ऋतुचक्र, …

Read More »

गृहलक्ष्मीच्या दोन हजारांसाठी महिलांची धावपळ!

    सणासुदीच्या तोंडावर हप्त्याची प्रतीक्षा; पडताळणीच्या कचाट्यात पात्र लाभार्थीही अडकल्या बेळगाव : सणासुदीचे दिवस आले… घरात आनंदाचे वातावरण असायला हवे; मात्र आर्थिकदृष्ट्या गरजू महिलांचे लक्ष लागले आहे ते गृहलक्ष्मी योजनेच्या दोन हजार रुपयांच्या हप्त्याकडे! योजनेतील अपात्र लाभार्थी शोधण्यासाठी आणि लाभार्थ्यांची माहिती अद्ययावत करण्यासाठी शासनाकडून कागदपत्रांची पडताळणी सुरू आहे. मात्र …

Read More »

आंतरविभागीय क्रिकेट स्पर्धेत बेळगावचे खेळाडू चमकले

  आशुतोष हिरेमठ, सोहम पाटील यांची यू-१९ कर्नाटक संभाव्य संघात निवड बेळगाव : आंतरविभागीय क्रिकेट स्पर्धेत दमदार अष्टपैलू कामगिरी करणाऱ्या बेळगाव स्पोर्ट्स क्लबच्या आशुतोष हिरेमठ आणि सोहम पाटील यांची यू-१९ कर्नाटक राज्याच्या संभाव्य संघात निवड झाली आहे. दोन्ही खेळाडूंनी आपल्या उल्लेखनीय कामगिरीच्या जोरावर निवड समितीचे लक्ष वेधून घेतले. धारवाड विभागीय …

Read More »

रोजगार हमीच्या कामावरून डॉक्टरांकडे जाताना काळाचा घाला!

  गोदगेरी क्रॉसजवळ दुचाकी झाडावर आदळली; बाळगुंदच्या मजुराचा जागीच मृत्यू खानापूर : रोजगार हमीच्या कामावर असताना अचानक डोकेदुखीचा त्रास जाणवला. डॉक्टरांकडे उपचार घेऊन घरी परतताना दुचाकीवरील नियंत्रण सुटले आणि रस्त्यालगतच्या झाडावर दुचाकी आदळली. या भीषण अपघातात बाळगुंद येथील मजुराचा जागीच मृत्यू झाला. संजय गणपती सुतार (रा. बाळगुंद) असे मृत्यू झालेल्या …

Read More »

गणपती भाड्याने! बेंगळूरमध्ये उत्सवाची नवी संकल्पना

  भव्य मूर्तीची हौसही भागणार; पर्यावरणपूरक विसर्जनाचाही मार्ग मोकळा बेंगळूर : ‘गणपती बाप्पा मोरया’च्या जयघोषाने अवघे शहर दुमदुमत असताना बेंगळूरमध्ये यंदाचा गणेशोत्सव एका अनोख्या प्रयोगामुळे चर्चेत आला आहे. गणेशमूर्ती विकत घेण्याऐवजी ती चक्क भाडेतत्त्वावर घेण्याची नवी संकल्पना येथे आकाराला आली आहे. मोठ्या आकाराची भव्य मूर्ती प्रतिष्ठापित करण्याची मंडळांची इच्छा आणि …

Read More »

लालबहादूर शास्त्री विद्यालयाच्या विद्यार्थ्यांचे तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धेत घवघवीत यश

  बुद्धिबळ व योगासन स्पर्धेसाठी जिल्हास्तरावर निवड मणगुती : दक्षिण महाराष्ट्र शिक्षण मंडळ संचलित लालबहादूर शास्त्री विद्यालय, मणगुती येथील विद्यार्थ्यांनी हुक्केरी तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धेत घवघवीत यश संपादन केले. या यशामुळे विद्यार्थ्यांची जिल्हास्तरीय बुद्धिबळ व योगासन स्पर्धेसाठी निवड झाली आहे. दिनांक ११ सप्टेंबर २०२६ रोजी सरकारी माध्यमिक शाळा, नेरली (ता. हुक्केरी) …

Read More »

विविध मागण्यांसाठी बेळगाव ग्रामीण भाजप आणि शेतकऱ्यांचा रास्तारोको

    पंत बाळेकुंद्री येथे बेळगाव-बागलकोट महामार्गावर वाहतूक खोळंबली बेळगाव : सतत खंडित होणारा वीजपुरवठा सुरळीत करावा तसेच गणेशोत्सव मंडळांवर लादण्यात आलेल्या जाचक अटी रद्द कराव्यात, या मागण्यांसाठी बेळगाव ग्रामीण भाजप आणि शेतकऱ्यांच्या वतीने पंत बाळेकुंद्री येथे रास्तारोको आंदोलन करण्यात आले. अनियमित वीजपुरवठ्यामुळे विद्यार्थी, गृहिणी आणि शेतकऱ्यांना मोठ्या अडचणींचा सामना …

Read More »