लक्ष्मणराव चिंगळे; जिल्हा काँग्रेस अध्यक्ष निवड झाल्याने सत्कार निपाणी (वार्ता) : पक्षश्रेष्ठींनी आपल्यावर यापूर्वी दिलेली जवाबदारी प्रामाणिकपणे पार पाडली आहे. या पुढील काळात पक्ष संघटन व बळकटीसाठी सर्वांना सोबत घेऊन जोमाने काम करणार आहे. शिवाय पक्षासाठी काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना निश्चितच संधी मिळेल, असा विश्वास चिक्कोडी जिल्हा काँग्रेसचे नुतन अध्यक्ष …
Read More »युवा समितीच्या वतीने खानापूर तालुक्यातील करंबळ, कौंदल आणि रुमेवाडी मराठी प्राथमिक शाळांत शैक्षणिक साहित्याचे वितरण
खानापूर : महाराष्ट्र एकीकरण युवा समिती आणि राज्य मराठी विकास संस्था, मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने खानापूर तालुक्यातील करंबळ, कौंदल आणि रुमेवाडी गावांतील मराठी प्राथमिक शाळांमध्ये शैक्षणिक साहित्याचे वितरण करण्यात आले. महाराष्ट्र एकीकरण युवा समितीचा उपक्रम तसेच शिक्षणाचे महत्त्व पटवून सांगण्यात आले. मराठी भाषा मराठी शाळा टिकल्या पाहिजेत. त्यासाठी सर्वांनी …
Read More »मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांचे १९ सप्टेंबरपासून आझाद मैदानावर बेमुदत उपोषण
अंतरवली सराटी : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी अखेर मुंबईकडे कूच करण्याची घोषणा केली आहे. अंतरवली सराटी येथे गेल्या १४ दिवसांपासून सुरू असलेल्या त्यांच्या बेमुदत उपोषणावर अद्याप तोडगा निघालेला नसल्याने १२ सप्टेंबर रोजी झालेल्या समर्थकांच्या बैठकीत आंदोलनाची पुढील दिशा निश्चित करण्यात आली. “नाक दाबल्याशिवाय तोंड …
Read More »प्रगती मल्टीपर्पज सोसायटीची वार्षिक सर्वसाधारण सभा संपन्न
बेळगाव : महात्मा फुले रोड शहापूर बेळगांव येथील प्रगती मल्टीपर्पज सौहार्द सहकारी संघ नियमित या सोसायटीची 17 वी वार्षिक सर्वसाधारण सभा सोसायटीच्या कार्यालयात संपन्न झाली. सोसायटीचे चेअरमन श्री. अजित ग. पाटील अध्यक्षस्थानी होते. प्रारंभी व्यासपीठावर उपस्थित चेअरमन श्री. अजित ग. पाटील व संचालकांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले. संचालक श्री. …
Read More »गणेशोत्सवानिमित्त ‘आरती संग्रह’ पुस्तकांचे वाटप; श्री. रमेश पावले यांचा स्तुत्य उपक्रम
बेळगाव : गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर सामाजिक व धार्मिक बांधिलकी जपत श्री. रमेश पावले यांच्या पुढाकाराने ‘आरती संग्रह पुस्तक वाटप’ उपक्रम उत्साहात पार पडला. भारतीय संस्कृती, परंपरा आणि भक्तीभाव घराघरांत पोहोचावा, तसेच गणरायाच्या आरतीचा मंगलमय नाद प्रत्येक घरात घुमावा, या उद्देशाने या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. भाविक व नागरिकांना यावेळी आरती …
Read More »पीओपी गणेश मूर्तींवर कडक बंदी; नियम मोडल्यास कारवाई
जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांचा इशारा; सार्वजनिक गणेश मंडळांना मातीच्या मूर्तींचे आवाहन बेळगाव : न्यायालयाच्या आदेशानुसार पीओपीच्या गणेश मूर्तींच्या प्रतिष्ठापना आणि विसर्जनावर बंदी घालण्यात आली असून, नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कडक कायदेशीर कारवाई केली जाईल, असा इशारा जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांनी दिला. बेळगाव येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. सार्वजनिक …
Read More »जिल्हास्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार मिळाल्याबद्दल शोभा निलजकर यांचा सत्कार
येळ्ळूर : मराठी मॉडेल शाळा, येळ्ळूर येथील शिक्षिका सौ. शोभा राजाराम निलजकर यांना यावर्षीचा जिल्हास्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त झाल्याबद्दल शाळेच्या एसडीएमसीतर्फे त्यांचा शाल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. शनिवारी सकाळी शाळेच्या प्रार्थनेच्या वेळी छत्रपती श्री शिवाजी महाराज सभागृहात हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. यावेळी एसडीएमसीच्या सर्व सदस्यांच्या …
Read More »गणेशोत्सवात रात्री १२ वाजेपर्यंत दुकाने सुरू ठेवण्यास परवानगी
बेळगाव : गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर शहरातील केळकर बाग परिसरातील व्यापारी संघटनेने रात्री १२ वाजेपर्यंत दुकाने सुरू ठेवण्यास परवानगी द्यावी, अशी मागणी केली होती. यासंदर्भात व्यापाऱ्यांनी उपपोलीस आयुक्त नारायण भारमणी यांची भेट घेऊन निवेदन सादर केले. गणेशोत्सव काळात ग्रामीण तसेच शहरी भागातून मोठ्या संख्येने नागरिक रात्री १० वाजल्यानंतरही खरेदीसाठी बाजारपेठेत …
Read More »पंडित नेहरू हायस्कूलच्या पाच विद्यार्थ्यांची जिल्हास्तरीय कुस्ती स्पर्धेसाठी निवड
बेळगाव : सार्वजनिक शिक्षण खात्याच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या तालुकास्तरीय कुस्ती स्पर्धेत पंडित नेहरू हायस्कूलच्या पाच विद्यार्थ्यांनी सुवर्णपदक पटकावत उल्लेखनीय यश मिळवले. या स्पर्धेत राजू दोडमणी, पृथ्वीराज तुळजाई, समर्थ पाटील, समर्थ डुकरे आणि अथर्व निकम यांनी उत्कृष्ट कामगिरी करत सुवर्णपदक मिळवले. त्यांच्या या यशामुळे पाचही विद्यार्थ्यांची आता जिल्हास्तरीय कुस्ती …
Read More »‘जय गणेश श्री – 2026’ बॉडी बिल्डिंग स्पर्धेच्या चषकाचे अनावरण
बेळगाव : बेळगाव डिस्ट्रिक्ट बॉडी बिल्डिंग असोसिएशन अँड स्पोर्ट्स आणि मध्यवर्ती सार्वजनिक गणेशोत्सव महामंडळ, बेळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या दुसऱ्या ‘जय गणेश श्री – 2026’ बॉडी बिल्डिंग स्पर्धेच्या चषकाचे अनावरण करण्यात आले. क्लब रोड येथील डॉ. संजय सुंठकर यांच्या कार्यालयात झालेल्या कार्यक्रमात ट्रॅफिक विभागाचे असिस्टंट कमिशनर ज्योतिबा …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta