Sunday , September 20 2026
Breaking News

वांगी पिकातून भरघोस उत्पादन

Spread the love

 

बेनाडी येथील सतीश पाटील यांचा उपक्रम ; आतापर्यंत ४ टन वांग्याची तोडणी

निपाणी (वार्ता) : दिवसेंदिवस शेतीमध्ये अमुलाग्र बदल होत आहेत. नव्या बदलांची खास धरून बेनाडी येथील प्रगतशील युवा शेतकरी सतीश पाटील यांनी हवामानावर आधारित वांग्याचे पीक घेतले आहे. या पिकाचे उत्पादन चांगले होत असून आतापर्यंत त्यांनी ४ टन वांग्याचे उत्पादन घेतले आहे. बाजारपेठेत दरही चांगला मिळत असल्याने उत्पन्न चांगले मिळत आहे.
सतीश पाटील यांनी, दीड एकर क्षेत्रामध्ये मार्च महिन्यात वांग्यांच्या तरूची लागवड केली आहे. त्यासाठी हांचिनाळ येथील वांग्याचे तरु प्रतिनग १ रुपये ५० पैशाप्रमाणे १०९३ तरुण लावले आहेत. प्रति आठवडा तोडणी केल्यानंतर प्रति किलो २५ ते ३० रुपये दर बाजारपेठेत मिळत आहे. निपाणी, कोल्हापूर आणि बेळगाव बाजारपेठेत वांग्याची विक्री करण्यात येत आहे.
हांचिनाळ येथील केशव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली ठिबक द्वारे पाणी आणि औषध व खतांचा डोस दिला जात आहे. ऑक्टोंबर पर्यंत हा हंगाम चालणार असून त्यातून चांगले उत्पादन मिळणार आहे.

——————————————————————–

‘चालू हवामानावर आधारित भाजीपाला पिकी घेतल्यास शेतकऱ्यांना निश्चितच फायदा होऊ शकतो. सध्या पांढरी माशी, लाल कोळी रोगांचा प्रादुर्भाव होत आहे. त्यामुळे वेळेवर औषध फवारणी केल्यास पिकाच्या उत्पादनात वाढ होऊ शकते.’
सतीश पाटील, वांगी उत्पादक शेतकरी, बेनाडी


About Belgaum Varta

Check Also

प्रत्येक क्षेत्रातील अभियंत्यांचे योगदान महत्त्वाचे

Spread the love  जयश्री पाटील ; निपाणीत अभियंता दिन कार्यक्रम निपाणी (वार्ता) : अभियंता म्हणजे …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *