Sunday , September 20 2026
Breaking News

निपाणीतील तनवीर देसाई याचा विश्वविक्रम; ‘उमलिंगला’ शिखर केले सर

Spread the love

 

निपाणी (प्रतिनिधी) : निपाणीतील एका साहसीवीराने जागतिक विक्रम करीत आपले नाव जागतिक स्तरावर नोंदविले आहे. येथील सुपुत्र तनवीर शब्बीर देसाई याने लद्दाख लेह येथील सर्वात उंच शिखर सर केले आहे.

येथील अकोळ रोड हुडको कॉलनी येथील शब्बीर देसाई यांचे चिरंजीव तनवीर याने काश्मीर लेह लद्दाख येथील सर्वात उंच ‘उमलिंग ला’ हे १९०२४ फूटावरील अंतर दुचाकीच्या सहाय्याने सर केले आहे.

तनवीर हा साहसवीर असून तो सध्या सोशल मिडीयावर कार्यरत आहे. तनवीर आणि त्याच्या सुमारे २० हून अधिक सहकाऱ्यांनी गेल्या महिन्याभरापूर्वी निपाणी येथून लेह लद्दाखकडे कूच केली होते. दि. ४ रोजी तनवीरने उमलिंग लेह शिखर विनासायास पार केले. त्याच्या या पराक्रमाबद्दल जागतिक नोंदी घेणाऱ्या गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड या नामांकीत संस्थेने त्यांचा विश्वविक्रमवीर म्हणून सन्मान पत्र देवून गौरव केला आहे.

तनवीर हा सोशल मिडीयावर कार्यरत असून त्याचे इन्स्टाग्रामवरसुमारे अडीच लाखाहून अधिक फॉलोअर्स आहेत. तर त्याचे सुमारे २००० हून अधिक व्हिडीयोंना लाखों दर्शक प्राप्त झाले आहेत. त्याच्या या यशाबद्दल त्याचे निपाणी व परिसरातून कौतुक होत आहे.

About Belgaum Varta

Check Also

प्रत्येक क्षेत्रातील अभियंत्यांचे योगदान महत्त्वाचे

Spread the love  जयश्री पाटील ; निपाणीत अभियंता दिन कार्यक्रम निपाणी (वार्ता) : अभियंता म्हणजे …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *