Monday , September 21 2026
Breaking News

मतदार यादी पुनरीक्षण १०० टक्के पूर्ण करा; बीएलओंना घरोघरी पडताळणीचे निर्देश

Spread the love

 

बेळगाव : मतदार यादीतील नवीन मतदारांची नोंदणी, मृत व स्थलांतरित मतदारांची नावे वगळणे तसेच आवश्यक दुरुस्त्यांसह विशेष संक्षिप्त पुनरीक्षणाचे काम शंभर टक्के पूर्ण करण्यासाठी बीएलओंनी घरोघरी जाऊन पडताळणी करावी, असे निर्देश कर्नाटकचे मुख्य निवडणूक अधिकारी वाय. अन्बुकुमार यांनी दिले.

बेळगाव जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित मतदार यादी विशेष संक्षिप्त पुनरीक्षण आढावा बैठकीत ते बोलत होते. भारत निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार मतदार यादीची पारदर्शकता व अचूकता राखण्यासाठी हे पुनरीक्षण अत्यंत महत्त्वाचे असल्याचे त्यांनी सांगितले. बीएलओंनी पुनरीक्षणाचे काम गतीने पूर्ण करावे, तसेच सर्व माहिती मान्यताप्राप्त राजकीय पक्षांना वेळेवर उपलब्ध करून द्यावी, असेही त्यांनी स्पष्ट केले.

यावेळी त्यांनी मतदार यादीबाबत प्राप्त होणाऱ्या तक्रारी व हरकतींची आयोगाच्या नियमांनुसार तत्काळ दखल घेऊन त्यांचे निवारण करावे, तसेच आठवड्यातून एकदा राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींसोबत बैठक घेण्याच्या सूचना दिल्या. प्रत्येक तालुक्यात पुनरीक्षणाचे शंभर टक्के उद्दिष्ट गाठण्यावर त्यांनी भर दिला.

बैठकीत जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांनी निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक तत्त्वांचे काटेकोर पालन करून जबाबदारीने काम करण्याचे निर्देश दिले. या प्रक्रियेत कोणताही निष्काळजीपणा खपवून घेतला जाणार नसल्याचा इशाराही त्यांनी अधिकाऱ्यांना दिला.

या बैठकीला प्रोबेशनरी आयएएस अधिकारी रोहित सिंग, अप्पर जिल्हाधिकारी विजयकुमार होणकेरी, सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी तसेच निवडणूक विभागातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

बैठकीनंतर मुख्य निवडणूक अधिकारी वाय. अन्बुकुमार आणि जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांनी वडगाव येथील खासबाग क्रमांक ३ सरकारी शाळेला भेट देऊन बीएलओंकडून सुरू असलेल्या मतदार यादी पुनरीक्षणाच्या प्रत्यक्ष कामाची पाहणी केली व त्यांच्याशी संवाद साधला.

About Belgaum Varta

Check Also

‘बेळगांवचा कैवारी’चा अभिनव उपक्रम; गणेशोत्सवात ‘ज्ञान दान’

Spread the love  बेळगाव : गणेशोत्सव हा भक्ती, श्रद्धा आणि उत्साहाचा सण असला तरी सामाजिक …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *