Sunday , September 20 2026
Breaking News

Belgaum Varta

श्रीराम सेना हिंदुस्थानकडून श्रमदानातून रस्ता दुरुस्ती; इदलहोंड येथील खड्डे बुजवून गणेशभक्तांसाठी मार्ग सुकर

खानापूर : इदलहोंड येथील बसस्थानकापासून जाणारा रस्ता तसेच स्मशानभूमीकडे जाणारा रस्ता खड्ड्यांमुळे अत्यंत खराब झाला होता. त्यामुळे या मार्गावरून ये-जा करणाऱ्या वाहनचालकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत होता. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर या समस्येची दखल घेत श्रीराम सेना हिंदुस्थानच्या कार्यकर्त्यांनी श्रमदानातून रस्त्यावरील खड्डे बुजविले. श्रीराम सेना हिंदुस्थानचे अध्यक्ष शंकर पाखरे यांच्या नेतृत्वाखाली …

Read More »

गणेशोत्सवासाठी यमकनमर्डी पोलिसांकडून गणेश मंडळाना मार्गदर्शक सूचना : पीएसआय आर. बी. पाटील

  मंडप, मिरवणूक व विसर्जनावेळी नियमांचे पालन करण्याचे आवाहन दड्डी वार्ताहर.. आगामी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर सार्वजनिक गणेश मंडळांनी उत्सव शांततेत, शिस्तबद्ध व सुरक्षित वातावरणात साजरा करावा, यासाठी यमकनमर्डी पोलिस ठाण्याकडून विविध मार्गदर्शक सूचना जारी करण्यात आल्या आहेत. गणेशमूर्तीची प्रतिष्ठापना, मंडपाची सुरक्षा, मिरवणूक, ध्वनिक्षेपकाचा वापर तसेच विसर्जनाच्या वेळी मंडळांनी आवश्यक खबरदारी घेण्याचे …

Read More »

चिकाटी आणि अथक प्रयत्नांतूनच यश शक्य : सीए संदीप खन्नुकर

बेळगाव : सध्याच्या स्पर्धेच्या युगात विद्यार्थ्यांसमोर विविध आव्हाने आहेत. मात्र, या आव्हानांवर मात करण्यासाठी चिकाटी, शिस्त आणि अथक प्रयत्नांची गरज असून, त्यातूनच यश मिळविता येते, असा विश्वास सीए तथा एस. एम. खन्नुकर असोसिएट्सचे संचालक संदीप खन्नुकर यांनी व्यक्त केला. शहापूर येथील पंडित नेहरू पदवीपूर्व महाविद्यालयात गुरुवारी सकाळी राज्य मराठी विकास …

Read More »

बोरगांव पूर्व भाग संघाला २१.२६ लाखाचा नफा

  संस्थापक अण्णासाहेब हवले : संघाची २७ वी वार्षिक निपाणी (वार्ता) : शेतकरी घटकांना सावरण्याचे काम कृषि संघ करीत आहे. त्यांचा आर्थिक विकास करण्यासह त्यांना सक्षम करणे हे कृषी संघाचे मुख्य उद्दिष्ट आहे. शासनाकडून मिळणाऱ्या सोयीसुविधा आणि शून्य टक्के व्याजदराने मिळणाऱ्या शेती कर्जाचा लाभ शेतकऱ्यांना दिला जात आहे. शेतकऱ्याला केंद्रस्थानी …

Read More »

अधिकाऱ्यांच्या आश्वासनानंतर बोरगावमधील शेतकऱ्यांचे हेस्कॉममवरील आंदोलन मागे

  निपाणी (वार्ता) : बोरगाव दूधगंगानदीला पाणी असतानाही बोरगाव व परिसरातील शेतकऱ्यांना शेतीपंपासाठी मिळणारा वीजपुरवठा ७ तासांवरून केवळ ३ तासांवर आणल्याने संतप्त शेतकऱ्यांनी बोरगाव हेस्कॉम कार्यालयासमोर आंदोलन केले. शासनाच्या नियमानुसार सकाळी ४ व रात्री ३ असे एकूण ७ तास वीज मिळणे अपेक्षित असताना, सध्या सकाळी केवळ २ व रात्री १ …

Read More »

खानापूर तालुका क्रीडा स्पर्धेत ताराराणी पदवीपूर्व महाविद्यालयाला चॅम्पियनशिप!

  खानापूर : अभ्यासामध्ये अग्रेसर असण्यासोबतच सांस्कृतिक कार्यक्रमांमध्येही नेहमीच नाव चर्चेत असणाऱ्या ताराराणी पदवीपूर्व महाविद्यालयाने आता क्रीडा क्षेत्रातही आपले अभूतपूर्व वर्चस्व सिद्ध केले आहे. काल सरकारी पदवीपूर्व महाविद्यालय मुगळीहाळ येथे पार पडलेल्या तालुका क्रीडा स्पर्धेत म. मं. ताराराणीच्च्या खेळाडूंनी विविध क्रीडा प्रकारांमध्ये अत्यंत चमकदार व सरस कामगिरी करत संपूर्ण तालुक्यात …

Read More »

खानापूर विभागीय क्रीडा स्पर्धेत मणतुर्गा हायस्कूल विद्यार्थिनींना सर्वसाधारण विजेतेपद

  खानापूर : नुकत्याच पार पडलेल्या खानापूर विभागीय क्रीडा स्पर्धेत श्री चांगळेश्वरी शिक्षण मंडळ संचलित मणतुर्गा हायस्कूलच्या विद्यार्थीनीना सर्वसाधारण विजेतेपद मिळाले. तर विद्यार्थ्यांनी सुद्दा विविध गटात क्रमांक पटकाविले आहेत. विजेत्या स्पर्धकांची नावे खालील प्रमाणे मुली – देवयानी हेब्बाळकर 100 मि धावणे, 200 मि धावणे व 110 अडथळा प्रथम’ कु- विनया …

Read More »

जिल्हास्तरीय हँडबॉल स्पर्धेत संत मीरा शाळेला विजेतेपद विजेतेपद

  बेळगाव : न्यू वंटमुरी शाळेच्या मैदानावर सार्वजनिक शिक्षण खात्याच्या वतीने आयोजित जिल्हास्तरीय हँडबॉल स्पर्धेत संत मीरा अनगोळ बेळगावने विजेतेपद पटकाविले. प्राथमिक मुलाच्या गटात बेळगाव शहर संघाने अंतिम सामन्यात बेळगाव ग्रामीण तालुक्याच्या संघाचा 2-1 असा पराभव करून प्रथम क्रमांक पटकाविला. तसेच माध्यमिक मुलाच्या गटात संत मीरा अनगोळ बेळगाव शहर संघाने …

Read More »

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर आमदार सेठ यांची रस्त्यांची पाहणी

    रस्ते दुरुस्तीची कामे तातडीने पूर्ण करण्याच्या अधिकाऱ्यांना सूचना बेळगाव : आगामी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर बेळगाव उत्तर मतदारसंघाचे आमदार आसिफ (राजू) सेठ यांनी गुरुवारी रात्री गणेश मिरवणूक मार्गांची पाहणी केली. यावेळी त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना आवश्यक असलेली रस्ते दुरुस्तीची कामे तातडीने हाती घेऊन पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या. आमदार सेठ यांनी समादेवी …

Read More »

किल्ला तलावाच्या विकासकामांना प्रारंभ; 3.85 कोटींचा निधी मंजूर

  बेळगाव : बेळगाव उत्तर मतदारसंघाचे आमदार आसिफ (राजू) सेठ यांच्या हस्ते किल्ला तलावाच्या विकासकामांना प्रारंभ करण्यात आला. लघु पाटबंधारे विशेष निधीअंतर्गत या विकासकामासाठी ₹3.85 कोटींचा निधी मंजूर करण्यात आला आहे. या निधीतून तलावाच्या परिसरात दगडी पिचिंग, पेव्हर ब्लॉक, फेन्सिंगसह विविध विकासकामे करण्यात येणार आहेत. तलावाची पायाभूत सुविधा सुधारण्याबरोबरच परिसराचे …

Read More »