Friday , November 6 2026
Breaking News

माजी आमदार अरविंद पाटील यांच्या आरोग्य शिबिराला जनतेचा उदंड प्रतिसाद!

Spread the love

 

खानापूर : खानापूर हा निसर्गाचे लेणे लाभलेला, हिरव्यागार जंगलांनी वेढलेला आणि कष्टकरी शेतकरी व बहुजन समाजाने समृद्ध असलेला तालुका. परंतु, या दुर्गम आणि जंगलमय भागात आरोग्य सेवांची मोठी कमतरता नेहमीच जाणवत आली आहे. गावात गंभीर आजार उद्भवल्यास किंवा तातडीच्या उपचारांसाठी बेळगावसारख्या मोठ्या शहरांतील रुग्णालयांची पायरी चढावी लागते. मात्र, बेळगावमधील महागडे वैद्यकीय उपचार सर्वसामान्य, गरीब आणि शेतकरी कुटुंबांच्या आवाक्याबाहेरचे असतात.
जनतेची हीच व्यथा आणि वेदना ओळखून, माजी आमदार, भाजपा नेते व डी सी सी बॅंकचे विद्यमान संचालक श्री. अरविंद चंद्रकांत पाटील यांनी एक अत्यंत उदात्त आणि संवेदनशील पाऊल उचलले. “आपल्या भागातील गोरगरीब जनतेला त्यांच्या हक्काचे आरोग्य भाग्य मिळाले पाहिजे,” या ध्येयाने प्रेरित होऊन त्यांनी आज, गुरुवार दिनांक २९ ऑक्टोबर २०२६ रोजी नंदगड येथे भव्य मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन केले.
बेळगावमधील नामवंत आणि तज्ज्ञ डॉक्टरांना थेट नंदगडमध्ये आमंत्रित करून स्थानिक जनतेसाठी उपचारांची दारे उघडी करून देण्यात आली. या उपक्रमाला खानापूर तालुक्यातील जनतेने दिलेला प्रतिसाद अभूतपूर्व आणि उदंड असाच ठरला! शिबिराच्या सुरुवातीपासूनच हजारो नागरिकांनी उपस्थिती लावली. विशेषतः डोळ्यांचे आजार, उच्च रक्तदाब (बीपी) आणि मधुमेह (शुगर) यांसारख्या आजारांनी त्रस्त असणाऱ्या रुग्णांची संख्या मोठी होती. तज्ज्ञ डॉक्टरांकडून मोफत तपासणी, सल्ला आणि औषधोपचार मिळाल्याने गोरगरीब रुग्णांच्या चेहऱ्यावर एक वेगळाच आनंद आणि दिलासा पाहायला मिळाला. जनतेच्या आरोग्याची काळजी घेणारा हा उपक्रम म्हणजे तालुक्यातील दुर्गम भागात आशेचा एक नवा किरण ठरला आहे.
दुग्ध व्यवसायातील क्रांती: शेतकऱ्यांच्या जीवनाला आर्थिक स्थैर्य
माजी आमदार व लोकनेता श्री. अरविंद पाटील यांचे कार्य केवळ आरोग्य क्षेत्रापुरते मर्यादित राहिलेले नाही; तर त्यांनी खानापूर तालुक्यातील कृषी आणि ग्रामीण अर्थव्यवस्थेला एक नवी दिशा दिली आहे. खानापूर हा मुख्यतः शेतीप्रधान तालुका. परंतु निसर्गाच्या लहरीपणावर अवलंबून असणाऱ्या शेतीला पूरक व्यवसायाची अत्यंत गरज होती. ही गरज ओळखून अरविंद पाटील यांनी तालुक्यात ‘दुग्ध क्रांती’
त्यांनी तालुक्यातील लहान-मोठ्या शेतकऱ्यांना, भूमिहीनांना आणि महिलांना दुग्ध व्यवसायाकडे वळवण्यासाठी प्रेरित केले. दुग्ध उत्पादनाला आधुनिक तंत्रज्ञानाची जोड देऊन, दूध संकलन केंद्र आणि योग्य बाजारपेठ उपलब्ध करून दिली.
आज तालुक्यातील शेकडो शेतकरी कुटुंबे केवळ शेतीवर अवलंबून न राहता दुग्ध व्यवसायाच्या माध्यमातून दरमहा हक्काचे आणि शाश्वत उत्पन्न मिळवत आहेत. या दुग्ध क्रांतीमुळे ग्रामीण भागातील तरुणांचे स्थलांतर थांबले असून, त्यांच्यात आत्मनिर्भरतेची एक नवी ऊर्जा निर्माण झाली आहे. शेतीसोबतच दुग्ध व्यवसाय हा आज खानापूरच्या ग्रामीण अर्थव्यवस्थेचा मुख्य कणा बनला आहे.
जनसेवेचा वसा आणि ध्यास म्हणजे काय?
नेतृत्व कसे असावे? आणि लोकप्रतिनिधींचे जनतेशी नाते कसे असावे? याचे मूर्तिमंत उदाहरण म्हणजे माजी आमदार अरविंद चंद्रकांत पाटील! सत्ता असो वा नसो, जनतेच्या सुखादुःखात खंबीरपणे पाठीशी उभे राहणे हीच त्यांची खरी जनतेच्या गरजा आणि अडचणी ओळखून त्यावर तात्काळ व ठोस उपाययोजना करणे, हा त्यांचा स्वभाव आहे.
शेतकरी, कष्टकरी, महिला आणि बहुजन समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी त्यांनी नेहमीच पुढाकार घेतला आहे.
दुग्ध व्यवसायाच्या माध्यमातून हजारो घरांत समृद्धी आणल्यानंतर, आता आरोग्य शिबिरांच्या माध्यमातून त्यांनी तालुक्यातील हजारो कुटुंबांना आरोग्याचे वरदान दिले आहे. आता पर्यंत दवाखान्याद पेशंटला नेणारा नेता संपूर्ण दवाखानाच पेशंटच्या दारी घेऊन आला हे विशेष आहे.
याप्रसंगी नंदगडचे ज्येष्ठ मार्गदर्शक श्री. पी. के. पाटील, श्री. विठ्ठल पाटील, श्री. पी. एच. पाटील, मार्केटिंग सोसायटीचे चेअरमन श्री. श्रीशैल माटोळी, श्री. नानासाहेब पाटील, प्रकाश गावडे, दिपक पाटील, जोतिबा भरमपन्नावर, प्रदीप पवार, सयाजी पाटील, निंगाप्पा तलवार, चंद्रकांत होसमनी, डॉ नागराज भरप्पणावर, चिरंजीव राजवर्धन पाटील, मारूती टक्केकर, ज्ञानेश्वर निलजकर, विठ्ठल पाटील, चन्नाप्पा बाचोळकर, सुहास पाटील, विठ्ठल हिंडलगेकर अशी अनेक मान्यवर मंडळी या प्रसंगी उपस्थित होती.
अरविंद पाटील यांच्या या निःस्वार्थी, दूरदृष्टीपूर्ण आणि प्रेरणादायी कार्याचे संपूर्ण खानापूर तालुक्यातून उत्स्फूर्त कौतुक होत आहे. अशा प्रकारच्या लोककल्याणकारी उपक्रमांमुळे तालुक्यातील शेतकरी आणि सर्वसामान्य जनतेच्या मनात एक नवी उमेद, नवीन आशा आणि भविष्याबद्दलचा सार्थ विश्वास निर्माण झाला आहे. जनसेवेचा हा प्रवाही ध्यास असाच अविरत सुरू राहो, हीच खानापूरच्या जनतेची मनोमन सदिच्छा!

About Belgaum Varta

Check Also

खानापूर तालुक्यातील रेशन वितरण व्यवस्था जिल्ह्यात अव्वल

Spread the love  रेशन दुकानदारांच्या मासिक बैठकीत सुर्यकांत कुलकर्णी यांचे गौरवोद्गार; ई-केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *