Friday , November 6 2026
Breaking News

कल्पकता वाढविण्यासाठी वाचन आवश्यक

Spread the love

 

सुनील पाटील; कुर्ली हायस्कूलमध्ये दिवाळी अंकाचे वितरण

निपाणी (वार्ता) : आधुनिक जीवनशैलीमुळे वाचनासाठी वेळ नाही. शालेय स्तरावर विद्यार्थ्यांची विचार करण्याची क्षमता, कल्पकता वाढविण्यासाठी वाचन संस्कृतीचे संवर्धन गरजेचे असल्याचे मत नागपूर येथील ज्ञान संदेश मासिकाचे संपादक सुनील पाटील यांनी केले. कुर्ली येथील एच जे सी चीफ फौंडेशन वा राज्य मराठी विकास संस्था यांच्यावतीने वाचनकट्टा उपक्रम अंतर्गतसिद्धेश्वर विद्यालयात दिवाळी अंक वितरण कार्यक्रम प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक एस.एस. चौगुले हे होते.
तात्यासाहेब यादव यांनी स्वागत केले. मान्यवरांच्या हस्ते रोपास जलार्पण करुन कार्यक्रमाचे उद्घाटन झाले. सुनील पाटील यांनी वाचन संस्कृती जोपासण्यासाठी विद्यालयात ३०० दिवाळी अंक भेट दिले. त्याबद्दल विद्यालयातर्फे सत्कार झाला. वाचनासाठी पुस्तकांची निवड, वाचनाचे प्रकार व फायदे, वेळेचे नियोजन याबाबत पाटील यांनी मार्गदर्शन केले. मुख्याध्यापक चौगुले यांनी, वाचन संस्कृती जोपासण्यासाठी पालकांनी वाचनकट्टा उपक्रम व पुस्तक दान चळवळीला प्रोत्साहन देणे गरजेचे असल्याचे सांगितले.
यावेळी पी. एस. चौगुले, सौरभ धोंडफोडे, ए. ए. चौगुले, एस. एस. साळवी, एस. एस. देसाई, एस. एम. बारवाडे, डी. बी. खोत, एस. एल. कुंभार यांच्यासह विद्यार्थी उपस्थित होते. एस. ए.पाटील यांनी सूत्रसंचालन केले. के. ए. नाईक यांनी आभार मानले.

About Belgaum Varta

Check Also

राज्यस्तरीय शरीरसौष्ठव स्पर्धेत निपाणीच्या रतिक लाखेचे दुहेरी यश

Spread the love  निपाणी (वार्ता) : कर्नाटक राज्यस्तरीय शरीरसौष्ठव (बॉडीबिल्डिंग) स्पर्धांमध्ये निपाणी येथील‌ रुतिक लाखे …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *