Friday , November 6 2026
Breaking News

मासेमारीच्या जाळ्यांची वारंवार चोरी

Spread the love

 

मासेमार कुटुंबांवर उपासमारीची वेळ ; सदलगा-बोरगाव परिसरातील मासेमार त्रस्त

निपाणी (वार्ता) : महाराष्ट्र-कर्नाक सीमेलगतच्या पंचगंगा नदीत मासेमारी करून उदरनिर्वाह करणाऱ्या बोरगाव, सदलगा परिसरातील गोसावी, बागडी मासेमार कुटुंबांना वारंवार जाळी चोरीच्या प्रकारांचा फटका बसत आहे. जाळ्यांची रात्रीच्या वेळी चोरी होत असल्याने त्यांच्यासमोर आर्थिक संकट उभे राहिले आहे.
मासेमार नदीत मासे पकडण्यासाठी जाळी टाकून रात्री घरी परततात. मात्र दुसऱ्या दिवशी नदीवर गेल्यानंतर जाळी चोरीला जात आहे. मासे मारीसाठी लागणारे साहित्य खरेदी करण्यास काही कुटुंबांनी बँकांकडून कर्ज घेतले आहे. तर काहींनी हातउसने पैसे उभे केले आहेत. अशा परिस्थितीत जाळ्यांची चोरी झाल्यामुळे पुन्हा साहित्य खरेदी करायचे कसे, आणि घेतलेले कर्ज फेडायचे कसे, असा प्रश्न निर्माण झाला आहे.
या प्रकरणाची संबंधित अधिकाऱ्यांनी गांभीर्याने दखल घेऊन चोरीच्या घटनांची चौकशी करावी, दोषींना शोधून त्यांच्यावर कठोर कायदेशीर कारवाई करावी. याशिवाय मासेमारांच्या उपजीविकेचे साधन सुरक्षित ठेवण्यासाठी आवश्यक उपाय योजना कराव्यात, अशी मागणी मासेमार कुटुंबांकडून करण्यात येत आहे. त्यामुळे संबंधित यंत्रणा या प्रकरणात तातडीने लक्ष घालणार का, असा प्रश्न उपस्थित होत आहे. यावेळी उत्तम गोसावी, राजू बागडी, अनिल बागडी, सागर बागडी, शाम गोसावी, दीपक बागडी, विश्वजीत गोसावी, राहुल गोसावी, रेहमान बहुरूपी, किस्मत बहुरूपी, योगेश बागडी, पिंटू गोसावी, शिवाजी गोसावी, संभाजी गोसावी, मारुती बागडी, संतोष गणाचारी यांच्यासह व्यवसायिक उपस्थित होते.

About Belgaum Varta

Check Also

राज्यस्तरीय शरीरसौष्ठव स्पर्धेत निपाणीच्या रतिक लाखेचे दुहेरी यश

Spread the love  निपाणी (वार्ता) : कर्नाटक राज्यस्तरीय शरीरसौष्ठव (बॉडीबिल्डिंग) स्पर्धांमध्ये निपाणी येथील‌ रुतिक लाखे …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *