



महाराष्ट्र एकीकरण समिती महिला आघाडीचे आवाहन
बेळगाव : १ नोव्हेंबर काळ्या दिनानिमित्त आयोजित करण्यात येणाऱ्या मुक सायकल फेरीत महिलांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन महाराष्ट्र एकीकरण समिती महिला आघाडीच्या अध्यक्षा रेणू किल्लेकर आणि माजी महापौर सरिता पाटील यांनी केले.
काळ्या दिनाच्या पार्श्वभूमीवर महिला आघाडीच्या कार्यालयात अध्यक्षा रेणू किल्लेकर यांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेण्यात आली. यावेळी सीमाभागातील मराठी भाषिकांवर होणाऱ्या अन्यायाचा निषेध नोंदविण्यासह सीमाप्रश्नाकडे केंद्र सरकारचे लक्ष वेधण्यासाठी १ नोव्हेंबर रोजी आयोजित करण्यात येणाऱ्या मुक सायकल फेरीत सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले.
रविवारी सकाळी ९ वाजता होणाऱ्या या मुक सायकल फेरीत सर्व मराठी भाषिकांसह महिलांनीही उत्स्फूर्त सहभाग नोंदवून मराठी भाषिकांच्या हक्कांसाठी एकजूट दाखवावी, असे आवाहन महिला आघाडीच्या वतीने करण्यात आले.
Belgaum Varta Belgaum Varta