



निपाणी (वार्ता) : बोरगांव येथील हिंदू मुस्लिम ऐक्याचे प्रतीक असलेल्या हजरत पीर बाबा ढंगवाली गुलरवा व हजरत पीर हैदरसा मदरसा पुरुषाला प्रारंभ झाला आहे. त्यानिमित्त पाटील घराण्यातर्फे पारंपरिक गालिफ अर्पण कार्यक्रम सवाद्य मिरवणुकीनेपार पडला. यावेळी अरिहंत बँकेचे अध्यक्ष अभिनंदन उर्फ बच्चू पाटील आणि सहकाररत्न उत्तम पाटील यांच्या हस्ते धार्मिक वातावरणात पूजा विधी पार पडला.
उत्तम पाटील यांनी, उरुसानिमित्त आयोजित या धार्मिक सोहळ्याला विशेष महत्त्व आहे. गालिफ अर्पण करण्याच्या पारंपरिक विधीतून श्रद्धा, भक्तिभाव आणि धार्मिक परंपरेचे जतन केले जात आहे.
या धार्मिक स्थळांशी ग्रामस्थ व भाविकांची श्रद्धा जोडलेली असून, उरुसाच्या निमित्ताने परिसरात भक्तिमय वातावरण निर्माण झाले आहे. भविष्यात नागरिकांचे आरोग्य सुरक्षित राहण्यासह देशात शांतता निर्माण होण्यासाठी प्रार्थना केल्याचे सांगितले.
यावेळी विनयश्री पाटील, धनश्री पाटील, पृथ्वीराज अभिनंदन पाटील यांच्यासह बोरगांव पट्टन पंचायतचे नगरसेवक, विविध संघ संस्थांचे पदाधिकारी, अरिहंत परिवाराचे पदाधिकारी, उरूस कमिटीचे सदस्य, मनाचे फकीर, कार्यकर्ते, युवक, अरिहंत परिवारातील सदस्य उपस्थित होते.
Belgaum Varta Belgaum Varta