



मराठा मंडळमध्ये कार्यकर्त्यांची बैठक
निपाणी (वार्ता) : निपाणी आणि बेडकीहाळ या विभागासाठी नव्याने काँग्रेस जिल्हाध्यक्ष निवडले जाणार आहेत. या दोन्ही निवडी गटबाजी व्यतिरिक्त, सर्वसामान्य कार्यकर्त्यांची मते जाणून घेऊन केल्या जाणार असल्याची माहिती पक्षनिरीक्षक विनय नावलगट्टी यांनी दिली. येथील मराठा मंडळ मध्ये आयोजित कार्यकर्त्यांच्या बैठकीत ते बोलत होते.
राजेश कदम यांनी स्वागत केले.
नावलगट्टी म्हणाले, राहुल गांधी आणि मल्लिकार्जुन खर्गे यांच्या नेतृत्वाखाली ‘संघटन सृजन अभियान’ सुरू आहे. पहिल्या टप्प्यात जिल्हाध्यक्षांच्या निवडी होणार आहेत. विभागीय पातळीवर सक्षम आणि नागरिकात मिसळणाऱ्यांना नेतृत्व देण्यावर पक्षाचा विचार असल्याचे सांगितले.
जिल्हाध्यक्ष लक्ष्मणराव चिंगळे यांनी, पक्ष निष्ठावंत कार्यकर्त्यांच्या पाठीशी उभा राहतो, याचा स्वतःचा दाखला दिला. ९ वर्षे संघटनेसाठी केलेल्या कामाची दखल घेऊन पक्षाने पुन्हा आपल्यावर जिल्हाध्यक्षपदाची जबाबदारी सोपवली आहे..
माजी मंत्री वीरकुमार पाटील यांनी, कार्यकर्त्यांना निर्भीडपणे आपली मते मांडावित. अध्यक्ष निवडताना सर्व समाजघटक, महिला आणि युवकांना योग्य प्रतिनिधित्व मिळावे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. अंतिम निर्णयापूर्वी पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांच्याशीही चर्चा करावी, अशी सूचना त्यांनी निरीक्षकांना केली.
निरीक्षक अल्ताफ मजूर म्हणाले, विधानसभा निवडणुकीला अवघे दीड वर्ष शिल्लक आहेत. त्यामुळे बूथ पातळीपर्यंत संघटन मजबूत करण्याची गरज व्यक्त केली.
बैठकीला निरीक्षक सुनील हनमण्णावर, रक्षिता ईडी, जिल्हा काँग्रेस उपाध्यक्ष रोहन साळवे, केपीसीसी सदस्या सुप्रिया पाटील, पंकज पाटील, सुजय पाटील, बसवराज पाटील, चंद्रकांत जासूद, अस्लम शिकलगार, वर्षा चव्हाण, सिद्दीक अंकलगी, युवराज पोळ, संदीप चावरेकर, किरण कोकरे, अवधूत गुरव, प्रतीक शहा यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. श्रीनिवास संकपाळ यांनी सूत्रसंचालन केले.
Belgaum Varta Belgaum Varta