Friday , November 6 2026
Breaking News

विज्ञान प्रदर्शनामुळे संशोधन वृत्तीला वाव

Spread the love

 

डॉ. पूर्णिमा चिरंतीमठ ; बागेवाडी कॉलेजमध्ये विज्ञान प्रदर्शन

निपाणी (वार्ता) : विज्ञान प्रदर्शने विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन, तंत्रज्ञान, संशोधन आवड आणि नवीन संशोधांबद्दलची रुची विकसित करतात. अशी प्रदर्शने केवळ विद्यार्थ्यांची सर्जनशीलताच प्रकट करण्यासह लेखन, संवाद आणि प्रभावी सादरीकरण कौशल्ये देखील वाढवतात, असे मत हुबळी येथील आय.ई.एम.एस. बिझनेस स्कूलच्या संचालिका डॉ. पूर्णिमा चिरंतीमठ यांनी व्यक्त केले. येथील जी. आय. बागेवाडी महाविद्यालयात आयोजित ‘प्रज्ञाना-५’ या राष्ट्रीय स्तरावरील विज्ञान प्रदर्शनात प्रमुख पाहुण्या म्हणून त्या बोलत होत्या.

डॉ. चिरंतीमठ म्हणाल्या, विज्ञान क्षेत्रात यश मिळवण्यासाठी जिज्ञासा, चिकाटी, संशोधन वृत्ती महत्त्वाची आहे. विज्ञान प्रदर्शने पाठ्यपुस्तकातील ज्ञान प्रत्यक्ष अनुभवातून समजून घेणे आवश्यक आहे. भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, जीवशास्त्र आणि गणित यांसारख्या विषयांमध्ये नवनवीन शोधांसाठी अनेक संधी उपलब्ध असल्याचे सांगितले.
केएलई संस्थेचे संचालक अमर उर्फ प्रवीण बागेवाडी यांनी विज्ञान प्रदर्शनाचे उद्घाटन केले. स्थानिक मंडळाचे अध्यक्ष महेश बागेवाडी आणि संस्थेचे सदस्य डॉ. एस. आर. पाटील व एम. आर. पाटील प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. प्राचार्य हेमा चिक्कमठ यांनी स्वागत केले. प्रा. शंकरमूर्ती के. एन. यांनी प्रमुख पाहुण्यांची ओळख करून दिली.
अध्यक्ष प्राचार्या डॉ. एम. एम. हुरळी म्हणाले, विज्ञान आणि तंत्रज्ञान क्षेत्रात विद्यार्थ्यांची आवड वाढवणे, त्यांच्यातील प्रतिभा ओळखणे आणि त्यांच्यात संशोधक वृत्ती विकसित करणे हा या प्रदर्शनाचा मुख्य उद्देश असल्याचे सांगितले.
विविध शाळा आणि महाविद्यालयां मधील १५० हून अधिक विद्यार्थ्यांनी सहभाग घेऊन नाविन्यपूर्ण संकल्पना प्रदर्शित केल्या.शाळा आणि महाविद्यालय या दोन्ही विभागांमध्ये, प्रथम क्रमांकाच्या विजेत्याला १०,००० रुपये, द्वितीय क्रमांकाच्या विजेत्याला ७,००० रुपये आणि तृतीय क्रमांकाच्या विजेत्याला ५,००० रुपयांची रोख पारितोषिके व प्रमाणपत्रे वितरित करण्यात आली.
यावेळी निवृत्त प्राध्यापक एस. बी. सोलबन्नवर, व्ही. बी. धारवाड, डॉ. बी. एस. कांबळे, डॉ. आर. जी. खराबे, डॉ. एम. डी. गुरव, डॉ. एस. एम. रायमाने, मंजुळा के, अश्विनी किल्लेदार, महेश केंचगौडरा, प्रियांका टाकळे, काव्यश्री कुंभार यांच्यासह प्राध्यापक, विद्यार्थी आणि विविध शाळा व महाविद्यालयांतील परीक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. प्रा. गीता कमते आणि प्रा. एस. पी. पाटील यांनी सुत्रसंचलन केले. समन्वयक डॉ. ए. ए. कांबळे यांनी आभार मानले.

About Belgaum Varta

Check Also

राज्यस्तरीय शरीरसौष्ठव स्पर्धेत निपाणीच्या रतिक लाखेचे दुहेरी यश

Spread the love  निपाणी (वार्ता) : कर्नाटक राज्यस्तरीय शरीरसौष्ठव (बॉडीबिल्डिंग) स्पर्धांमध्ये निपाणी येथील‌ रुतिक लाखे …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *