



बेळगाव : के.एल.ई. संस्थेच्या लिंगराज महाविद्यालयातील (स्वायत्त) वाणिज्य विभागाच्या वतीने ३० व ३१ ऑक्टोबर २०२६ रोजी ‘अस्तित्व – अस्तित्वाच्या पलीकडे एक नवी भरारी’ (ASTITVA – Emergence Beyond Existence) या सांस्कृतिक महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. या महोत्सवाचे यंदा सलग सहावे वर्ष आहे.
विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देणे, सर्जनशीलतेला प्रोत्साहन देणे आणि त्यांच्या व्यक्तिमत्त्व विकासाला चालना देणे हा या महोत्सवाच्या आयोजनामागील प्रमुख उद्देश आहे. विविध सांस्कृतिक उपक्रमांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना आपली कला आणि कौशल्ये सादर करण्याची संधी मिळणार आहे.
महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एच. एस. मेलीनमनी आणि वाणिज्य विभागाचे समन्वयक प्रा. विनायक वरुटे यांच्या मार्गदर्शनाखाली महोत्सवाचे नियोजन करण्यात आले आहे.
या महोत्सवासाठी रंभाई गारमेंट्स हे शीर्षक प्रायोजक असून, डेकॅथलॉन, बेळगाव आणि एंजल वन हे सहप्रायोजक आहेत. विद्यार्थी समन्वयक म्हणून साद अत्तर आणि हिबा शेख कार्यरत आहेत.
महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी या सांस्कृतिक महोत्सवात उत्स्फूर्त सहभाग नोंदवून आपले कलागुण सादर करावेत, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.
Belgaum Varta Belgaum Varta