Friday , November 6 2026
Breaking News

१ नोव्हेंबर काळ्या दिनाची युवा समिती सीमाभागतर्फे शहापूर भागात जनजागृती

Spread the love

 

बेळगाव : शहापूर येथील सराफ गल्ली, बिचू गल्ली, आचार्य गल्ली, गाडेमार्ग, संभाजी रोड या परिसरात महाराष्ट्र एकीकरण युवा समिती सीमाभागतर्फे संघटनेचे मुख्य सल्लागार अशोक घगवे यांच्या नेतृत्वाखाली १ नोव्हेंबर काळ्या दिनाची जनजागृती करण्यात आली.

यावेळी बोलताना सामाजिक कार्यकर्ते राजू पाटील यांनी गेल्या ७० वर्षांपासून अन्यायाने डांबण्यात आलेला हा मराठी बहुभाषिक प्रदेश महाराष्ट्रात विलीन होण्यासाठी १९५६ साली शेकडो जणांनी आपले बलिदान दिले आणि ते हुतात्मे झाले. तरिही तत्कालीन केंद्र सरकारने आम्हाला अन्यायाने १ नोव्हेंबर १९५६ रोजी कर्नाटक राज्याची निर्मिती केली. याला विरोध म्हणून सीमाभागातील मराठी जनता हा दिवस काळादिन म्हणून सुतक पाळते, याही वर्षी आपण कुठेही कमी न पडता या मूक सायकल फेरीत बहुसंखेने उपस्थित राहूया व सायकल फेरी यशस्वी करूया असे आवाहन केले.

माजी नगरसेविका स्वाती संजय बैलूरकर यांनी या आपल्या भागातून मराठी भाषिकांवर झालेला अन्यायाच्या विरोधात व सिमाप्रश्नाच्या सोडवणुकीसाठी महिला नेहमीच अग्रेसर असून याही वेळी आपण महिला वर्ग बहुसंख्येने उपस्थित राहू, असे आश्वासन दिले.

अशोक घगवे यांनी तरुणांना आवाहन करताना १ नोव्हेंबर काळ्यादिनी बहुसंख्येने उपस्थित राहून केंद्र व कर्नाटक सरकारला मराठी भाषिकांची ताकत दाखवून देऊया असे आवाहन केले.

सुरज जाधव यांनी उपस्थितांचे आभार मानताना येथील उपस्थितांनी काळ्यादिनाची सायकल फेरी यशस्वी करण्यासाठी सराफ गल्ली, बीचू गल्ली, संभाजी रोड, गाडेमार्ग व आचार्य गल्ली येथे घरोघरी जाऊन जागृती करावी असे आव्हान केले.

यावेळी राजश्री बैलूरकर, प्रेमा माळवी, प्रतिभा माळवी, रेखा माळवी, शीतल माळवी, रेणुका सदावर, ऋतुजा मरुचे, दिपा माळवी, सविता माळवी, रोहिणी माळवी, ओंकार बैलूरकर, अमर कडगावकर, अमित डवरी, सौरभ पाटील, विशाल सावंत, अमित पाटील, साईराज कुगजी, रोशन पाटील, प्रणव माळवी, सुजल माळवी, उमेश पाटील, अभिषेक तरळे, निलेश काकतकर, ज्ञानेश्वर चिकोर्डे, गोविंद कुंडेकर, रघुनाथ माळवी, विजय पाटील, ओम बैलूरकर, श्रेयस सुरेडकर, विनायक मजुकर, प्रशांत बैलूरकर, अमर डवरी, प्रभाकर पाटील, अमित नाईक, विनायक पाटील, राजू डवरी, अनिकेत पाटील, राहुल माळवी, अभिषेक बैलूरकर, गजानन बैलूरकर, निखिल सुणगार, नागेश बैलूरकर आदी बहुसंख्य महिला व युवक उपस्थित होते.

About Belgaum Varta

Check Also

जीवित प्रमाणपत्राच्या नावाखाली वृद्धाची २.३७ लाखांची फसवणूक

Spread the love  फेसबुकवरील जाहिरातीला प्रतिसाद देणे पडले महागात; व्हॉट्सॲपवर एपीके फाईल पाठवून सायबर चोरट्यांचा …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *