Friday , November 6 2026
Breaking News

कॉन्ट्रॅक्ट ब्रिज प्रशिक्षणास प्रारंभ

Spread the love

 

बेळगाव : बेळगाव जिल्ह्यात ‘कॉन्ट्रॅक्ट ब्रिज’ या बौद्धिक खेळाचा प्रसार करणे आणि त्याला पुनरुज्जीवित करणे या उद्देशाने कर्नाटक राज्य ब्रिज असोसिएशन आणि ब्रिज फेडरेशन ऑफ इंडिया यांच्या सहकार्याने बेळगावात मोफत ब्रिज प्रशिक्षण कार्यक्रमाला प्रारंभकरण्यात आला.

बेळगाव जिल्हा कॉन्ट्रॅक्ट ब्रिज असोसिएशनतर्फे टिळकवाडी क्लब येथे टिळकवाडी क्लबचे उपाध्यक्ष अभय कुलकर्णी यांच्या हस्ते आणि बेळगाव जिल्हा ब्रिज असोसिएशनच्या प्रा. एस. वाय. प्रभू, राजू बर्वे, एम. आय. हेगडे, नंदकुमार देशपांडे, संतोष ममदापूरकर यांच्या उपस्थितीत रोपट्याला पाणी घालून या प्रशिक्षणाचे उद्घाटन करण्यात आले.

प्रा. प्रभू म्हणाले, डिसेंबर अखेरपर्यंत शनिवार, रविवार, मंगळवार आणि गुरुवारी संध्याकाळी ६ ते ७ या वेळेत टिळकवाडी क्लब येथे प्रशिक्षण आहे. या कार्यक्रमात सुरु महाविद्यालयीन विद्यार्थी, नोकरदार, व्यावसायिक आणि विशेषतः ज्येष्ठ नागरिकांना सहभागी होता येते. या खेळाच्या प्रशिक्षणासाठी पूर्वज्ञानाची आवश्यकता नाही, असे सांगितले. एच. डी. काद्रोळकर म्हणाले, ब्रिज खेळाचे पूर्वज्ञान असणे आवश्यक नाही. या खेळाविषयी मूलभूत माहिती देवून नंतर खेळातील कौशल्ये विकसित करता येतात, असे त्यांनी सांगितले. यावेळी डी. एम. पंडित, नंदकुमार देशपांडे आदी उपस्थित होते.

About Belgaum Varta

Check Also

जीवित प्रमाणपत्राच्या नावाखाली वृद्धाची २.३७ लाखांची फसवणूक

Spread the love  फेसबुकवरील जाहिरातीला प्रतिसाद देणे पडले महागात; व्हॉट्सॲपवर एपीके फाईल पाठवून सायबर चोरट्यांचा …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *