Friday , November 6 2026
Breaking News

चन्नेवाडी येथे पाण्याची भीषण टंचाई; ग्रामपंचायतीचे दुर्लक्ष, ग्रामस्थांची आमदारांकडे धाव

Spread the love

 

खानापूर : चन्नेवाडी ता. खानापूर जेमतेम तीनशे लोकसंख्या असलेलं गाव, कसबा नंदगड ग्रामपंचायतीच्या अख्त्यारीत येणाऱ्या या गावात दोन बोरवेल व जुन्या विहिरीने पाणी पुरवठा केला जात होता. यापूर्वी मुबलक पाणीसाठा असलेल्या या गावातून कधी कधी नंदगड रहिवासीय पाणी घेऊन जात होते. पण गेल्या काही वर्षांपासून कसबा नंदगड ग्रामपंचायतीच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे दोन्हीही बोरवेल व विहिरीच्या मोटारी बंद झाल्याने गावात पाणी टंचाई झाली. अनेकवेळा ग्रामपंचायतिला तक्रारी व निवेदने देण्यात आली पण ग्रामपंचायत अधिकाऱ्यांनी याकडे दुर्लक्ष् केले.

यासाठी गावकऱ्यांनी बैठक घेऊन तालुक्याचे आमदार विठ्ठल हलगेकर यांना उपरोक्त मागणीचे निवेदन शनिवार दिनांक 31 ऑक्टोबर रोजी सादर केले. त्याचबरोबर या निवेदनाची प्रत तहसीलदार,तालुका पंचायत व समंधित कार्यालयाना देण्यात आली आहे.

यावर आमदार विठ्ठल हलगेकर यांनी येत्या आठ दिवसात नवीन बोरवेल मारून देण्याचे व तोपर्यंत टँकरणे पाणी पुरवठा केला जाईल असे आश्वासन गावकऱ्याना दिले. यावेळी नागोजी पाटील, भरमाजी पाटील, सुधाकर पाटील,शंकर पाटील, स्वागत पाटील, दत्ताराम पाटील, श्रीनाथ पाटील, ईश्वर पाटील आदी उपस्थित होते.

About Belgaum Varta

Check Also

खानापूर तालुक्यातील रेशन वितरण व्यवस्था जिल्ह्यात अव्वल

Spread the love  रेशन दुकानदारांच्या मासिक बैठकीत सुर्यकांत कुलकर्णी यांचे गौरवोद्गार; ई-केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *