Monday , August 17 2026
Breaking News

बाळूमामा देवस्थान घोटाळा प्रकरणाला वेग; आरोपी फरार, आर्थिक गुन्हे शाखेकडून तपास तीव्र

Spread the love

 

कोल्हापूर : आदमापूर येथील श्री संत बाळूमामा देवस्थानातील कथित 60 कोटी 75 लाख रुपयांच्या आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी तपासाला गती मिळाली आहे. या प्रकरणात तत्कालीन धर्मादाय निरीक्षक रागिणी खडके, ट्रस्टचे तत्कालीन सचिव रावसाहेब कोणकेरी यांच्यासह संबंधितांवर गुन्हे दाखल करण्यात आले असून, आरोपी सध्या फरार असल्याची माहिती समोर आली आहे.

प्राथमिक तपासात देवस्थानाच्या व्यवहारांमध्ये गंभीर आर्थिक अनियमितता झाल्याचे निदर्शनास आले आहे. देवस्थानाच्या जमिनींच्या व्यवहारात मोठ्या प्रमाणावर गैरव्यवहार झाल्याचा आरोप असून, सुमारे 20 लाख रुपयांची किंमत असलेली जमीन दुरुस्ती दस्ताद्वारे 3 कोटी रुपयांना दाखवून निधीचा अपहार करण्यात आल्याचा संशय आहे.

तसेच, देवस्थानाच्या 23 जमिनींच्या मालकीसंदर्भातील कागदपत्रांमध्ये विसंगती, दानपेटी व पशुधन विक्रीतून मिळालेल्या देणग्यांचा अधिकृत हिशेब नसणे, भाविकांनी अर्पण केलेल्या सोन्या-चांदीच्या दागिन्यांच्या नोंदी गायब असणे आणि उत्पन्न-खर्चासाठी स्वतंत्र नोंदवह्यांचा वापर करून आर्थिक फेरफार केल्याचे आरोप तपासात समोर आले आहेत.

या संपूर्ण प्रकरणाचा आर्थिक गुन्हे शाखेकडून सखोल तपास सुरू असून, फरार आरोपींचा शोध घेण्याचे प्रयत्न सुरू आहेत. गुन्हे दाखल होऊनही अद्याप अटक न झाल्याने भाविकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली असून, दोषींवर कठोर कारवाईची मागणी केली आहे.

About Belgaum Varta

Check Also

आदमापूर बाळूमामा देवस्थानातील ६०.७५ कोटींच्या गैरव्यवहारप्रकरणी गुन्हा दाखल; जिल्ह्यात खळबळ

Spread the love  कोल्हापूर : महाराष्ट्र, कर्नाटक, गोवा आणि मध्य प्रदेशसह लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *