Monday , August 17 2026
Breaking News

साहित्यरत्न, विचारवंत कॉमेड अण्णा भाऊ साठे राष्ट्रीय सन्मान पुरस्कार २०२६ ने साहित्यिक अर्जुन विष्णू जाधव कोल्हापूरात सन्मानित

Spread the love

 

कोल्हापूर : ठाणे शहरातील नव्या दमाचे नव्या उमेदीचे समाजातील विविध स्तरांतील विषयावर आपल्या अभ्यासू लेखणीतून, विवेक बुद्धीतून परखड, प्रखरपणे लेखन करणारे आणि महाराष्ट्र शासनसह अनेक संस्था, संघटना, मंडळ यांचे पुरस्कार मिळालेले साहित्यिक अर्जुन विष्णू जाधव यांचा कोल्हापूर येथील समाजात अग्रणीय कार्य करणारी मानवतावादी सांस्कृतिक चळवळ यांच्या वतीने रविवार दि. २ ऑगस्ट २०२६ रोजी राजर्षी छत्रपती शाहू स्मारक भवन, कोल्हापूर येथे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष श्रीपाल सबनीस, धरणग्रस्तांसाठी कार्य करणारे थोर विचारवंत, सामाजिक कार्यकर्ते भरत पाटणकर, जेष्ठ साहित्यिक प्रा. किसनराव कुराडे आदी मान्यवरांच्या शुभ हस्ते “विचारवंत, साहित्यिक कॉमेड अण्णा भाऊ साठे राष्ट्रीय सन्मान २०२६” देऊन सन्मानित करण्यात आले.
साहित्यिक अर्जुन विष्णू जाधव हे सदैव आपल्या लेखनातून समाजाच्या तळागाळातील प्रश्न मांडत असतात. त्यांनी आपल्या मानवतावादी विवेक बुद्धीतून समाजात जनजागृती आणि जन प्रबोधन करण्याचे कार्य आपल्या परखड लेखनातून प्रखरपणे मांडले आहे. आजपर्यंत त्याची विविध विषयावर लिहिलेली “जागर, बेळगाव कुणाच्या बापाच, बागलकोटची सुगंधा, माझा बाप उद्ध्वस्त गिरणी कामगार, लेक जगवा लेक शिकवा, व्यसनमुक्ती आणि प्रेयसी एक आठवण..” इत्यादी पुस्तके प्रकाशित झालेली असून त्यांना अनेक पुरस्कार मिळाले आहेत.” प्रेयसी एक आठवण..” ही कादंबरी तर बरीच गाजत आहे. “बाप चालतो घराची वाट..” हे आता काहीच दिवसात प्रकाशित करण्यात येणार आहे. तसेच “ग्रामपंचायत एक वाटणीदार अनेक…” ही ग्रामीण कादंबरी ही प्रकाशनाच्या वाटेवर आहे. जाधव यांचे विविध स्तरांतून अभिनंदन होत आहे.

About Belgaum Varta

Check Also

आदमापूर बाळूमामा देवस्थानातील ६०.७५ कोटींच्या गैरव्यवहारप्रकरणी गुन्हा दाखल; जिल्ह्यात खळबळ

Spread the love  कोल्हापूर : महाराष्ट्र, कर्नाटक, गोवा आणि मध्य प्रदेशसह लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *