Friday , October 23 2026
Breaking News

एकाही दोषीला सोडणार नाही – पालकमंत्री प्रकाश आबिटकर

Spread the love

 

कोल्हापूर : अतिशय पुरोगामी राज्य म्हणून ओळख असलेला महाराष्ट्रातील लोकराजा शाहू महाराजांच्या भूमीत एका निवृत्त सिव्हिल सर्जनने माणुसकीला काळीमा फासणारे अत्यंत घृणास्पद कार्य केले आहे. ही अतिशय दुर्दैवी बाब आहे. मात्र या प्रकरणांमध्ये जे जे म्हणून दोषी सापडतील त्या कोणालाही सोडले जाणार नसल्याचा कडक इशारा पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांनी दिला. कदमवाडी रोडवरील एका हॉस्पिटलमध्ये निवृत्त सिव्हिल सर्जन हे गुरुवारी अवैध गर्भपात करताना पोलिसाला आढळून आल्याने आज जिल्हाधिकारी कार्यालयात आरोग्यमंत्र्यांनी तात्काळ आढावा बैठक घेतली.

यावेळी आमदार सर्वश्री अमल महाडीक, चंद्रदीप नरके, अशोकराव माने, जिल्हाधिकारी डॉ विजय राठोड, मनपा आयुक्त डॉ.राजेंद्र भारूड, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. जॅसमिन, पोलीस अधीक्षक निलोत्पल, निवासी उपजिल्हाधिकारी गजानन गुरव, करवीर प्रांत अधिकारी मोसमी चौगुले, पीसीपीएनडीटीच्या ॲड गौरी पाटील उपस्थित होते.

मातेच्या गर्भातच कळ्या खुडण्याचे अतिशय लांछनास्पद काम जिल्ह्यात काही ठिकाणी गुप्तपणाने सुरू आहे अशी सर्व ठिकाणे पोलिसांनी उध्वस्त करावीत त्याचबरोबर यातील दोषींना कडक शिक्षा होण्यासाठी प्रयत्न करावेत. जेणेकरून असे कार्य करणाऱ्या दुसऱ्या कोणाची हिंमत होणार नाही असे निर्देश पालकमंत्र्यांनी यावेळी दिले.

गुरुवारी शहरात घडलेल्या प्रकरणाच्या अनुषंगाने जिल्ह्यातील फार्मासिस्टची प्रशासनाने एक बैठक घ्यावी अशी सूचना आमदार अमल महाडिक यांनी केली. तर संशयास्पद ठिकाणची पीसीपीएनडीटी टीमने लिस्ट द्यावी. या संशयास्पद ठिकाणी जिल्हा प्रशासनाकडून अचानक सरप्राईज व्हिजिट करण्यात येईल असे जिल्हाधिकारी डॉ राठोड यांनी यावेळी स्पष्ट केले.

प्रारंभी श्रीमती ॲड पाटील यांनी जिल्ह्यातील सद्यस्थितीतील एकूण नोंदणीकृत सोनोग्राफी केंद्राची माहिती सांगून या समितीच्यावतीने करण्यात येणाऱ्या कारवाईसाठी पोलीस विभागाचे नेहमीच सहकार्य असल्याचे सांगितले. यावेळी पोलीस विभागाचे इतर अधिकारी तसेच पीसीपीएनडीटी समितीतील इतर सदस्य उपस्थित होते.

About Belgaum Varta

Check Also

बाळूमामा देवस्थान घोटाळा प्रकरणाला वेग; आरोपी फरार, आर्थिक गुन्हे शाखेकडून तपास तीव्र

Spread the love  कोल्हापूर : आदमापूर येथील श्री संत बाळूमामा देवस्थानातील कथित 60 कोटी 75 …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *