Monday , August 17 2026
Breaking News

कर्नाटक मंत्रिमंडळाचा आज विस्तार; 20 आमदारांचा शपथविधी आज सायंकाळी

Spread the love

बेंगळुरू : कर्नाटक मंत्रिमंडळ विस्ताराच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस हायकमांडकडून नव्या मंत्र्यांची यादी अंतिम करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. आज (सोमवारी) सायंकाळी 4 वाजता राजभवनात नव्या मंत्र्यांचा शपथविधी सोहळा पार पडणार आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, अंतिम क्षणी बदल होण्याची शक्यता नाकारता येत नसली तरी सध्या उपलब्ध असलेल्या यादीत 20 आमदारांचा समावेश आहे.

संभाव्य नवे मंत्री

शिवराज तंगडगी (कनकगिरी)

बी. झेड. झमीर अहमद खान (चामराजपेट)

एस. एस. मल्लिकार्जुन (दावणगेरे उत्तर)

डॉ. अजय सिंग (जेवर्गी)

एच. सी. बालकृष्ण (मागडी)

टी. रघुमूर्ती (चल्लकेरे)

एन. चेलुवरायस्वामी (नागमंगळ)

के. एम. शिवलिंगेगौडा (अरसीकेरे)

रिजवान अर्शद (शिवाजीनगर)

 बी. नागेंद्र

रुद्रप्पा लामाणी

नरेंद्रस्वामी

मंकाळ वैद्य

गायत्री शांतगौडा

विजयानंद काशप्पनवर

संतोष लाड

बसवराज रायरेड्डी

मधू बंगारप्पा

लक्ष्मण सवदी (अथणी)

पुट्टरंगशेट्टी

याशिवाय, जी. एस. पाटील यांची विधानसभा अध्यक्ष (स्पीकर), ए. एस. पोन्नण्णा यांची उपाध्यक्ष (डेप्युटी स्पीकर), सलीम अहमद यांची विधान परिषद सभापती आणि उमाश्री यांची उपसभापती म्हणून निवड झाल्याची माहितीही समोर आली आहे.

राजभवनात आज सायंकाळी होणाऱ्या शपथविधी सोहळ्याकडे राज्याचे लक्ष लागले असून, अखेरच्या क्षणी यादीत काही बदल होण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.

About Belgaum Varta

Check Also

दोन महिन्यांच्या चिमुकल्याची हत्या; आईसह चौघांना अटक

Spread the love  बिदर : दोन महिन्यांच्या चिमुकल्या मुलाला आईसह कुटुंबातील सदस्यांनी विहिरीत फेकून देत …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *