Wednesday , December 17 2025
Breaking News

Classic Layout

उद्यापासून शाळांना दसऱ्याची सुट्टी

  दुसऱ्या शैक्षणिक सत्रामध्ये शनिवारी पूर्ण दिवस शाळा बेळगाव : उद्या शनिवार दि. २० सप्टेंबरपासून शाळांना दसरा सुट्टी सुरू होत आहे. यंदा दसरा सुट्टी २० सप्टेंबर ते ६ ऑक्टोबरपर्यंत राहणार आहे. ७ ऑक्टोबरपासून शाळा पुन्हा सुरू होणार असून दुसऱ्या सत्राला प्रारंभ होईल, असे शालेय शिक्षण खात्याच्या उपसंचालकांनी (प्रशासन) कळविले आहे. …

Read More »

इनर व्हील क्लब खानापूरकडून रवळनाथ हायस्कूल, शिवठाणला पाण्याची टाकी भेट

  खानापूर : तालुक्यातील मौजे शिवठाण येथील श्री चांगळेश्वरी शिक्षण संस्था संचलित रवळनाथ हायस्कूलला इनर व्हील क्लब, खानापूरतर्फे विद्यार्थ्यांच्या उपयोगासाठी स्वच्छ पाण्याची टाकी भेट देण्यात आली. कार्यक्रमास क्लबच्या अध्यक्षा सौ. वर्षा सुरेश देसाई, सेक्रेटरी सौ. सविता कल्याणी, एडिटर सौ. साधना पाटील, आयएसओ सौ. प्रियांका हुबळीकर, मेंबर सौ. गंधाली देशपांडे, माजी …

Read More »

पॅकेज टेंडर पद्धतीविरोधात कंत्राटदारांचा जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा

  बेळगाव : पॅकेज टेंडर प्रणाली रद्द करण्यासह विविध प्रलंबित मागण्या मान्य करण्यासाठी कर्नाटक राज्य कंत्राटदार संघटना, बेळगाव जिल्हा कार्यनीरत कंत्राटदार संघटना आणि बेळगाव महापालिका कंत्राटदार संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने शुक्रवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढून निवेदन सादर करण्यात आले. कित्तूर राणी चन्नम्मा चौक येथे शहर व जिल्ह्यातील कंत्राटदार मोठ्या संख्येने …

Read More »

मराठी शाळा नं. 5 चव्हाट गल्ली येथे माजी विद्यार्थी संघ आयोजित कै. ॲड. किसनराव यळ्ळूरकर गुणवत्ता पुरस्काराचे वितरण

  बेळगाव : मंगळवार दिनांक 16/9/2025 रोजी मराठी शाळा नं.5 चव्हाट गल्ली येथे कै. ॲड.किसनराव यळ्ळूरकर यांच्या स्मरणार्थ गुणवत्ता पारितोषिक वितरण कार्यक्रम संपन्न झाला. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून बेळगावच येथील उषाताई गोगटे गर्ल्स हायस्कूलचे माजी मुख्याध्यापक श्री, माधव कुंटे सर, ॲड. अमर यळ्ळूरकर, शितल यळ्ळूरकर, प्रवीण जाधव, माजी विद्यार्थी …

Read More »

अनैतिक संबंधातून तरुणाची हत्या, बेळगाव पोलिसांची कारवाई

  बेळगाव : बेळगाव जिल्ह्यातील शहाबंदर येथे अनैतिक संबंधातून एका तरुणाचा खून करून आपल्या पत्नीच्या हत्येचा कट रचणाऱ्या आरोपीला बेळगाव पोलिसांनी अटक केली आहे, अशी माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. भीमाशंकर गुळेद यांनी दिली. आज झालेल्या पत्रकार परिषदेत ते म्हणाले, हुक्केरी तालुक्यातील शहाबंदर येथे बसमधून उतरलेल्या महांतेश बुकनट्टी (२४) या …

Read More »

जातनिहाय जनगणनेसंदर्भात युवा नेते किरण जाधव यांच्याकडून जनजागृती!

  बेळगाव : येत्या 22 तारखेपासून सुरू होणाऱ्या जातनिहाय जनगणनेसंदर्भात मराठा समाजातील नेते मंडळीकडून मोठ्या प्रमाणात जनजागृती करण्यात येत आहे. त्या अनुषंगाने मराठा समाजाचे युवा नेते किरण जाधव यांनी आज बेळगावमधील नामांकित अशा नवहिंद को-ऑपरेटिव्ह सोसायटी आणि मराठा सहकारी बँकेला भेट देऊन तेथील चेअरमन आणि संचालकाला जातनिहाय जनगणना पत्रकात मराठा …

Read More »

मुलाच्या एका ओव्हरमध्ये 5 सिक्स, वडिलांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन

  दुबई : श्रीलंकेचा उदयोन्मुख क्रिकेटपटू दुनिथ वेलालागेला मोठा धक्का बसला आहे. दुनिथ वेलालागेचे वडिल सुरंगा वेलालागे यांचे निधन झाले. दुनिथ आशिया कपमध्ये अफगाणिस्तान विरुद्ध सामन्यात खेळत असतानाच ही दु:खद घटना घडली. या सामन्यात श्रीलंकेने शानदार विजय मिळवला. त्यांनी सुपर फोरमध्ये प्रवेश केलाय. दुनिथ वेलालागे या मॅचमध्ये खेळत होता. पण …

Read More »

बेळगाव नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित पुणे संस्थेची 26 वी वार्षिक सर्वसाधारण सभा खेळीमेळीत संपन्न

  पुणे : बेळगावकरांनी पुणेस्थित बेळगावकरांसाठी स्थापन केलेली बेळगाव नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित स. नं. 77, लक्ष्मीनारायण पार्क, शॉप नंबर 11, ससाणे नगर, हडपसर, पुणे – 28 या संस्थेची वार्षिक सर्वसाधारण सभा गुरुवार दिनांक 18 सप्टेंबर 2025 रोजी क्रांतीज्योती महिला प्रतिष्ठान स्व. सुषमा स्वराज बचत गट व प्रशिक्षण केंद्र, नवले …

Read More »

युवा समितीच्या वतीने खानापूर तालुक्यातील विविध सरकारी मराठी शाळेत शैक्षणिक साहित्य वाटप

  खानापूर : खानापूर तालुक्यातील प्रत्येक सरकारी मराठी शाळेतील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य पोहोचविण्याचे चांगले कार्य महाराष्ट्र एकीकरण युवा समितीतर्फे करण्यात आले आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात मराठी शाळांमध्ये विद्यार्थ्यांची संख्या वाढण्यास निश्चित मदत होईल असे प्रतिपादन खानापूर तालुका समितीचे सरचिटणीस आबासाहेब दळवी यांनी केले आहे. शैक्षणिक वर्षाला सुरुवात झाल्यापासून खानापूर तालुक्यातील …

Read More »

मच्छे येथील व्ही. एस. पाटील हायस्कूलच्या कबड्डी व थ्रोबॉल संघांची जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी निवड

  मच्छे : दक्षिण महाराष्ट्र शिक्षण मंडळ संचालित मच्छे येथील व्ही. एस. पाटील हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनी तालुका पातळीवर झालेल्या मुलांच्या कबड्डी व थ्रोबॉल स्पर्धांमध्ये घवघवीत यश संपादन केले आहे. निर्मळ नगर येथे झालेल्या तालुका पातळीवरील क्रीडा स्पर्धेत अंतिम सामन्यात मन्नीकेरी हायस्कूलचा पराभव करत मुलांच्या थ्रोबॉल संघाने तसेच कबड्डी खेळातील अंतिम सामन्यात …

Read More »