Friday , December 19 2025
Breaking News

Classic Layout

कॅन्टोन्मेंट भागातही ऍड. अमर यळ्ळूरकर यांच्या प्रचाराला वेग

  बेळगाव : दिनांक 28 एप्रिल शुक्रवार रोजी सकाळी महाराष्ट्र एकीकरण समितीचे बेळगाव उत्तर मतदार संघातील अधिकृत उमेदवार ऍड. श्री. अमर यळ्ळूरकर यांचा बेळगाव शहराला लागून असलेल्या कॅम्प भागातील लोकवस्तीमध्ये प्रचार फेरी काढण्यात आली. कॅम्प भागातील श्री. मुत्तू मरियम्मा देवी मंदिर मरी माता दुर्गामाता मंदिर मरियम्मा देवी मंदिर आदी ठिकाणी …

Read More »

अमर यळ्ळूरकर यांच्या प्रचारार्थ आमदार रोहित पवार यांची उद्या जाहीर सभा..

  ‌बेळगाव : शनिवार दिनांक. २९ रोजी सायंकाळी सहा वाजता बेळगाव उत्तर मतदार संघातील महाराष्ट्र एकीकरण समितीचे अधिकृत उमेदवार श्री. अमर यळ्ळूरकर यांच्या प्रचारार्थ महाराष्ट्रातील युवा आमदार श्री. रोहित पवार यांची जाहीर सभा क्रांतिसिंह नानापाटील चौक चव्हाट गल्ली या ठिकाणी होणार आहे. तत्पूर्वी खडक गल्ली, भडकल गल्ली, जालगर गल्ली, शेट्टी …

Read More »

भारत नगर परिसरात रमाकांत कोंडुसकर यांचा प्रचारात झंझावात

  बेळगाव : बेळगाव दक्षिण मतदार संघातील महाराष्ट्र एकीकरण समितीचे अधिकृत उमेदवार रमाकांत कोंडुसकर यांची प्रचार फेरी पदयात्रा शुक्रवार दिनांक 28 एप्रिल 2020 रोजी नाथ पै सर्कल शहापूर येथून पदयात्रा आणि प्रचार फेरीची सुरुवात झाली. बॅरिस्टर नाथ पै यांचे स्मरण करण्यात आले. यांच्या सीमाभागातील चळवळीतील योगदान खूप मोठे आहे हे …

Read More »

रांगोळ्या घालून, फटाके वाजवून गांधीनगरमध्ये अमर यळ्ळूरकर यांचे जल्लोषी स्वागत

  बेळगाव : दि. २७ रोजी सायंकाळी बेळगाव उत्तर मतदार संघातील गांधीनगर येथे महाराष्ट्र एकीकरण समितीचे उमेदवार श्री. अमर यळ्ळूरकर यांचा प्रचारार्थ भव्य प्रचारफेरी काढण्यात आली. सुरवातीला किल्ला येथील दुर्गाडी देवीला नतमस्तक होऊन अमर यळ्ळूरकर यांनी प्रचाराला सुरुवात केली. गांधीनगर भागात महिलांनी प्रचार मार्गावर रांगोळ्या घालून सामूहिक ओवाळणी करत अमर …

Read More »

प्रत्येकाने माय मराठीसाठी पुढे आले पाहिजे : आर. एम. चौगुले

  उचगाव : मराठी भाषा, मराठी संस्कृती टिकविण्यासाठी जिवाचं रान करावं लागेल, ही स्वाभिमानाची लढाई असून प्रत्येकाने आपल्या माय मराठीसाठी पुढे आले पाहिजे, असे आवाहन महाराष्ट्र एकीकरण समितीचे अधिकृत उमेदवार आर. एम. चौगुले यांनी केले. अतिवाड येथे शुक्रवारी सकाळी प्रचार-पदयात्रा काढण्यात आली यावेळी ते बोलत होते. चौगले पुढे म्हणाले, समितीच्या …

Read More »

येळ्ळूर ग्रा. पं. अध्यक्षांनी धरले जेजेएम अधिकाऱ्यांना धारेवर!

  बेळगाव : येळ्ळूर येथील जलजीवन योजनेअंतर्गत घरोघरी नळाला सोडण्यात येणारी पाणी व्यवस्था सुरळीत नसल्याने येळ्ळूर ग्रामपंचायत अध्यक्ष सतीश बाळकृष्ण पाटील यांनी संबंधित अधिकाऱ्यांना धारेवर धरून चांगलाच जाब विचारला. आता उन्हाळ्याचे दिवस सुरू असून लोकांना पाण्यासाठी वन वन फिरावे लागत आहे. कोट्यवधी खर्चून सुरू झालेली जल जीवन मिशन योजनाही धोक्यात …

Read More »

श्री आदी शंकराचार्य जयंती भक्तिभावाने साजरी

  बेळगाव : श्री आदी शंकराचार्य जयंती भक्तिभावाने चिदंबर नगर येथील श्री चिदंबर मंदिरात साजरी करण्यात आली. श्री आदी शंकराचार्य जयंती निमित्त पाच दिवस विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. वेदमूर्ती डॉ.चंद्रशेखर जोशी यांच्या मार्गदर्शनाखाली धार्मिक कार्यक्रम पार पडले. लघु रुद्राभिषेक, भजन, प्रवचन आणि महाप्रसाद कार्यक्रमाला भक्तांनी मोठ्या संख्येने …

Read More »

मरगाई देवीला चांदीचा मुखवटा व चांदीची चवार भेट

  बेळगाव : हलगा येथील मरगाई देवीला चांदीचा मुखवटा व चांदीची चवार कलमेश्वर, हनुमान, भावकेश्वरी, मंदिर निर्माण कमिटीचे अध्यक्ष चारूकिर्ती सैबन्नावर व जयश्री सैब्बन्नावर यांचे चिरंजीव सुहास सैब्बन्नावर व गीता सैब्बन्नावर यांनी भेट दिली. शुक्रवार दिनांक 28 रोजी सकाळी मरगाई मंदिरात हा कार्यक्रम संपन्न झाला. या कार्यक्रमानिमित्त मरगाई मंदिर जीर्णोद्धार …

Read More »

आ. रोहित पवार यांचा रविवारी रोड शो व जाहीर सभा

बेळगाव : म. ए. समितीचे बेळगाव दक्षिण मतदार संघाचे अधिकृत उमेदवार रमाकांत कोंडुसकर यांच्या प्रचारार्थ राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा नेते व आमदार रोहित पवार यांच्या रोड शो व जाहीर सभेचे रविवार दि. 30 रोजी आयोजन करण्यात आले आहे. रमाकांत कोंडुसकर यांच्या पदयात्राना मिळणारा उत्स्फूर्त प्रतिसाद व मतदारांचा पाठिंबा पाहता विरोधकांच्या पायाखालची …

Read More »

आर. एम. चौगुले यांचे निलजी, मुतगा भागात जल्लोषी स्वागत

  बेळगाव : सीमाभागात महाराष्ट्र एकीकरण समितीच्या उमेदवारांचा प्रचार दणक्यात सुरु असून ग्रामीण मतदार संघाचे उमेदवार आर. एम. चौगुले यांनी आज निलजी, मुतगा भागाचा दौरा केला. कार्यकर्त्यांसमवेत निलजी, मुतगा गावात ठिकठिकाणी प्रचारासाठी गेलेले आर. एम. चौगुले यांना संपूर्ण गावात उत्स्फूर्त पाठिंबा मिळाला. प्रचाराला सुरुवात करण्यापूर्वी आर. एम. चौगुले यांचे जल्लोषी …

Read More »