Friday , December 19 2025
Breaking News

Classic Layout

आर. एम. चौगुले यांचे जोरदार शक्तिप्रदर्शन!

  बेळगाव : कर्नाटक विधानसभा निवडणूकीसाठी ग्रामीण मतदारसंघातून महाराष्ट्र एकीकरण समितीचे अधिकृत उमेदवार आर. एम. चौगुले यांनी आज दुपारी भव्य मिरवणुकीद्वारे शक्ती प्रदर्शन करत आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. ग्रामीण मतदारसंघातून मतदान प्रक्रियेद्वारे 131 सदस्यांच्या निवड कमिटीने आर. एम. चौगुले यांची अधिकृत उमेदवार म्हणून घोषणा केली होती. आज आर. एम. …

Read More »

गडकरी, फडणवीस भाजपचे स्टार प्रचारक

  बेळगाव : एकीकडे मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समिती महाराष्ट्रातील भाजपा आणि काँग्रेसला पत्र लिहून आपल्या नेतेमंडळींना समितीच्या विरोधात प्रचारासाठी पाठवू नका अशी विनंती करत असताना दुसरीकडे भाजपच्या केंद्रीय निवडणूक समितीने कर्नाटक विधानसभा निवडणुकीसाठी आपल्या 40 स्टार प्रचारकांची यादी जाहीर केली आहे. या यादीत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि महाराष्ट्राचे माजी …

Read More »

सीमाभागात केळीबागांना तापमानाचा फटका

बागा वाचविण्यासाठी शेतकऱ्यांची धडपड, कोगनोळी परिसरातील चित्र कोगनोळी : गेल्या पंधरवड्यापासून निपाणी तालुक्यात तापमानाचा पारा वाढला असून सकाळी ८ वाजल्यापासून उन्हाचे चटके जाणवत आहेत. एप्रिल महिन्यात ही स्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे केळी पिकावर तापमानाचा परिमाण होत आहे. अशा परिस्थितीत केळीच्या बागा वाचविण्यासाठी शेतकऱ्यांची धडपड सुरु आहे. कोगनोळीसह सीमाभागात अनेक …

Read More »

लक्ष्मी हेब्बाळकर यांचा शक्तिप्रदर्शनाने उमेदवारी अर्ज दाखल

  बेळगाव : बेळगाव ग्रामीणच्या काँग्रेस उमेदवार लक्ष्मी हेब्बाळकर यांनी आज आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. समर्थकांच्या तोबा गर्दीत, झांज पथकाच्या निनादात मिरवणुकीने आलेल्या लक्ष्मी हेब्बाळकर यांनी आपला अर्ज दाखल केला. सजविलेल्या रथातून निघालेल्या हेब्बाळकर यांनी, मिरवणूक मार्गावर कित्तूर राणी चन्नम्मा चौकात राणी चन्नम्मा यांच्या पुतळ्यावर पुष्पवृष्टी करून अभिवादन केले. …

Read More »

शिवाजी विद्यापीठाच्या २०२३ च्या प्रवेश-परिक्षासाठी आवाहन

  शिवाजी विद्यापीठाच्या २०२३ च्या प्रवेश-परिक्षासाठी सीमाभागातील पदव्युत्तर इच्छुक विद्यार्थ्यांना आवाहन सीमाभागातील मराठी भाषिक विद्यार्थ्यांच्या आरक्षित कोट्यांतर्गत होणारी प्रवेश परिक्षेची तारीख जाहीर झाली आहे. प्रवेशपरिक्षेसाठी बिनतारी अर्ज करण्याची प्रक्रिया सुरू झाली असून शेवटची तारीख ‘२० एप्रिल २०२३’ आहे. तरी सीमाभागातील इच्छुक पदव्युत्तर विद्यार्थ्यांनी अंतिम तारखेच्या आत अर्ज प्रक्रिया पूर्ण करून …

Read More »

समितीच्या उमेदवारांना निवडून आणण्याची जबाबदारी मराठी भाषिकांची : प्रकाश मरगाळे

  बेळगाव : शहर महाराष्ट्र एकीकरण समितीने जनमतातून अधिकृत उमेदवार जाहीर केले आहेत. अधिकृत उमेदवाराच्या पाठीशी ठामपणे उभे राहून त्यांना विजयी करण्याची जबाबदारी मराठी भाषिकांची आहे, असे मत शहर समितीच्या बैठकीत खजिनदार प्रकाश मरगाळे यांनी व्यक्त केले. शहर म. ए. समितीची महत्त्वपूर्ण बैठक मंगळवार दिनांक 18 रोजी मराठा मंदिर सभागृहात …

Read More »

राज्य कराटे स्पर्धेत आराध्या निवास सावंतला सुवर्णपदक

  बेळगाव : उवा मेरिडियन काँन्वेशन सेंटरच्या सभागृह सेईकोकाई आंतरराष्ट्रीय इंडिया व कर्नाटक व फिनिक्स अकादमी इंडिया यांच्या संयुक्त विद्यामानाने घेण्यात आलेल्या राज्यस्तरीय कराटे स्पर्धेत सेंट झेवियर्स शाळेच्या आराध्या निवास सावंत हिने 1 सुवर्ण 1 रौप्यपदक पटकावित उल्लेखनीय कामगिरी केली आहे. सबज्युनियर गटात कुमिटे प्रकारात सुवर्णपदक, तर कटाज प्रकारात रौप्यपदक …

Read More »

शक्तिप्रदर्शनाने डॉ. अंजली निंबाळकर यांचा अर्ज दाखल

  बेळगाव  : राष्ट्रीय पक्षांची उमेदवारी जाहीर झाल्यानंतर सर्वत्र बंडखोरीचे सत्र सुरु झाले असून बेळगावसह संपूर्ण राज्यभरात हि विधानसभा निवडणूक अत्यंत चुरशीची ठरणार आहे. बेळगावमधील चारही मतदार संघात ‘टफ फाईट’ देण्यास भाग पाडणाऱ्या महाराष्ट्र एकीकरण समितीच्या उमेदवारांची धास्ती राष्ट्रीय पक्षांनी घेतली असून आज खानापूर मतदार संघाच्या काँग्रेसच्या अधिकृत उमेदवार डॉ. …

Read More »

शक्तीप्रदर्शनाने ग्रामीण मतदारसंघाचे अधिकृत उमेदवार आर. एम. चौगुले यांचा उद्या भरणार अर्ज

बेळगाव : बेळगाव ग्रामीण मतदारसंघाचे महाराष्ट्र एकीकरण समितीचे अधिकृत उमेदवार आर. एम. चौगुले यांचा उमेदवारी अर्ज उद्या सकाळी अकरा वाजता दाखल करण्यात येणार आहे. धर्मवीर संभाजी चौकातून भव्य मिरवणुकीने कॉलेज रोडमार्गे चन्नमा सर्कल काकतीवेसहुन रिसालदार गल्लीतील तहसीलदार कार्यालयात अर्ज भरणार आहेत. तरी तालुक्यातील सर्व आजी माजी जिल्हापंचायत, तालुका पंचायत, ग्रामपंचायत …

Read More »

राष्ट्रवादीतर्फे उत्तम पाटील यांचा निपाणीतून उमेदवारी अर्ज दाखल

  निपाणी (वार्ता) : उत्तम पाटील यांना सोमवारी (ता.१७) राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा बी. फॉर्म मिळाला होता. त्यानंतर मंगळवारी (ता.१८) उत्तम पाटील यांनी राष्ट्रवादीचे अधिकृत उमेदवार म्हणून शहरातील विविध मार्गावरून दुचाकी रॅली काढून निवडणूक अधिकारी जी. एन. मंजुनाथस्वामी यांच्याकडे उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी गोपाळ नाईक, अशोककुमार असोदे, माजी नगराध्यक्ष विलास …

Read More »