Friday , December 19 2025
Breaking News

Classic Layout

‘नवहिंद सोसायटी’च्या चेअरमनपदी प्रकाश अष्टेकर तर व्हा. चेअरमनपदी अनिल हुंदरे

  येळ्ळूर : कर्नाटक, महाराष्ट्र आणि गोवा राज्यात उल्लेखनीय कार्य करत असलेल्या नवहिंद को-ऑप. क्रेडिट सोसायटीच्या चेअरमनपदी श्री. प्रकाश पांडुरंग अष्टेकर यांची तर व्हा. चेअरमनपदी श्री. अनिल हणमंत हुंदरे यांची निवड करण्यात आली. सदर निवड 1 एप्रिल 2023 ते 30 नोव्हेंबर 2025 या अडीच वर्षांसाठी असणार आहे. 1 एप्रिल 2023 …

Read More »

खानापूर विधानसभा क्षेत्रात कायदा व सुव्यवस्था कडक : निवडणुक अधिकारी अनुराधा वस्त्रद

  खानापूर : कर्नाटक विधानसभा निवडणूकीची तारीख निवडणुक आयोगाने जाहीर केल्याने खानापूर विधानसभा क्षेत्राच्या निवडणूक अधिकारी (Ro) अनुराधा वस्त्रद यांनी आज तहसीलदार कचेरीत पत्रकार परिषद घेऊन खानापूर विधानसभा क्षेत्रात केलेली पुर्व तयारी व निवडणुकीत राजकीय पक्षांना लागु असलेली आचारसंहिता याबद्दल माहिती दिली. यावेळी खानापूरचे तहसीलदार प्रकाश गायकवाड पोलीस ईन्सपेक्टर रामचंद्र …

Read More »

कर्नाटकात भाजपाला मोठा झटका बसण्याची शक्यता, सर्व्हेत धक्कादायक आकडेवारी समोर

  नवी दिल्ली : कर्नाटक विधानसभा निवडणुकीचं बिगुल वाजलं आहे. निवडणूक आयोगाने कर्नाटक विधानसभेच्या तारखा जाहीर केल्या आहेत. १० मेला मतदान होणार आहे, तर १३ मेला निकाल जाहीर करण्यात येणार आहे. अशात ‘एबीपी न्यूज’चा एक सर्व्हे समोर आला आहे. यात भाजपाचा पराभव होत असून, काँग्रेस सत्तेवर येत असल्याचं दाखवलं आहे. …

Read More »

मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीची महत्वपूर्ण बैठक शुक्रवारी

  बेळगाव : मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीच्या सभासदांची महत्वपूर्ण बैठक शुक्रवार दिनांक 31 मार्च 2023 रोजी दुपारी 3 वाजता मराठा मंदिर खानापूर रोड बेळगाव येथे बोलावण्यात आली आहे. मध्यवर्ती म. ए. समितीच्या पदाधिकारी व सभासदांनी वेळेवर हजर राहावे, असे आवाहन अध्यक्ष श्री. दीपक दळवी यांनी केले आहे.

Read More »

सीमाभागात आपली मातृभाषा टिकली पाहिजे : समिती युवा नेते आर. एम. चौगुले

  बेळगाव : क्रिकेट सारख्या खेळामुळे तरुणांनी आपला आवडता छंद जोपासावा तसेच आपले शरीरही सुदृढ ठेवावे. अशा क्रिकेट स्पर्धेच्या माध्यमातून आपली एकी मजबूत ठेवावी व आपला सर्वांगीण विकासासाठी योगदान द्यावे. तसेच युवकांनी सीमाभागावर जो अन्याय होत आहे ते अन्यायाच्या विरोधात उठून कार्य केले पाहिजे व आपली मातृभाषा टिकली पाहिजे, असे …

Read More »

“ऑपरेशन मदत” अभियानांतर्गत गोल्याळी येथे विद्यार्थ्यांना खेळाचे साहित्य भेट

  बेळगाव : ‘ऑपरेशन मदत’ ग्रुपच्या कार्यकर्त्यांनी खानापूर तालुक्यातील अतिदुर्गम भागातील गोल्याळी गावातील प्राथमिक शाळेत शिकणाऱ्या गरीब विद्यार्थ्यांना ग्रामीण शिक्षण अभियानांतर्गत खेळाचे साहित्य भेट स्वरूपात दिले. यावर्षीच्या शैक्षणिक वर्षाच्या परीक्षा संपल्या आहेत. तेव्हां या छोट्या मुलां-मुलींना मैदानात खेळायची संधी मिळाली म्हणून ‘ऑपरेशन मदत’ संस्थेच्या माध्यमातून एक सामाजिक बांधिलकी म्हणून या …

Read More »

आचारसंहितेचे उल्लंघन केलास कठोर कारवाई : जिल्हाधिकाऱ्यांचा इशारा

  बेळगाव : कर्नाटक विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता बुधवार पासून लागू होत असल्याने सार्वजनिक ठिकाणावरील सर्व पोस्टर्स, बॅनर, भित्तिचित्रे काढून टाकण्यात यावीत. निवडणूक कर्तव्यासाठी नेमलेल्या सर्व पथकांनी तातडीने कामाला लागावे, असे निर्देश जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी नितेश पाटील यांनी दिले आहेत. आज जिल्हाधिकारी कार्यालयात निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर झालेल्या निवडणूक अधिकारी व …

Read More »

खानापूर कंत्राटदारांच्या बैठकीची काँग्रेस पक्षाला भिती, खोटे आरोप केल्याची बतावणी

  खानापूर (प्रतिनिधी) : खानापूर तालुका कंत्राटदार संघटनेने नुकताच बैठक घेऊन तालुक्यात स्थानिक उमेदवारालाच येत्या आगामी विधानसभा निवडणुकीत निवडून आणू. कारण गेल्या पाच वर्षाच्या काळात खानापूर सरकारी कंत्राटदाराना कोणतेच काम दिले नाही. त्यामुळे खानापूर सरकारी कंत्राटदारच्या सदस्यांना उपासमारीची वेळ आली. गेल्या ४० वर्षाच्या काळात अशी वेळ आली नव्हती. खानापूर सरकारी …

Read More »

“शांताई”तर्फे उद्या डाॅ. जगन्नाथ दीक्षित यांचे व्याख्यान

  बेळगाव : शांताई वृद्धाश्रम आणि आयएमईआरच्या संयुक्त विद्यमाने ‘शांताई’च्या 25 व्या वर्धापन दिनानिमित्त उद्या गुरुवार दि. 30 मार्च रोजी सायंकाळी 5:30 वाजता सुप्रसिद्ध डॉ. जगन्नाथ दीक्षित यांचे मधुमेहावर व्याख्यान आयोजित करण्यात आले आहे. डॉ. जगन्नाथ दीक्षित हे मधुमेह मुक्त भारत व्हावा या उद्देशाने मधुमेह कशा पद्धतीने बरा होईल? आणि …

Read More »

कुनो नॅशनल पार्कमधून आली गूड न्‍यूज : मादी चित्त्‍याने दिला चार बछड्यांना जन्म

  नवी दिल्ली : नामिबियातून १७ सप्टेंबर २०२२ रोजी भारतात आणलेल्या कुनो नॅशनल पार्कमधील मादी चित्त्याने चार बछड्यांना जन्म दिला आहे. याबाबत केंद्रीय पर्यावरण मंत्री भूपेंद्र यादव यांनी चार बछड्यांचा व्हिडिओ शेअर करत ही माहिती दिली आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. नामिबियातून (दक्षिण आफ्रिका) १७ सप्टेंबर २०२२ …

Read More »