Thursday , December 18 2025
Breaking News

Classic Layout

छत्रपती शिवाजी महाराजांच्या गड किल्ल्याचे विविध ठिकाणी पूजन

निपाणी (वार्ता) : छत्रपती शिवाजी महाराजांच्या गड किल्ल्याचे फेब्रुवारीच्या महिन्याच्या शेवटच्या रविवारी (ता.२६) पूजन कार्यक्रम पार पडला. बेळगाव येथील किल्ल्याचे पूजन निपाणी मधील श्रीमंत दादाराजे निपाणकर व श्रीमंत सम्राजलक्ष्मीराजे निपाणकर यांच्या हस्ते करण्यात आले. नरेंद्र बेळगावकर यांनी स्वागत केले. त्यानंतर किल्ल्यावरील तुळजाभवानी, ध्वज किल्ल्यावरील प्रमुख दरवाजा आणि गणेशाचे विधिपूर्वक पूजन …

Read More »

बेळगाव तालुका रुरल इंडस्ट्रियल सोसायटीचा सुवर्णमहोत्सवी सोहळा थाटात

  बेळगाव : संस्थेचे संचालक मंडळ आणि कर्मचारी वर्ग यांच्यातील उत्तम समन्वय, संचालक मंडळाचा पारदर्शक कारभार आणि संस्थेच्या कर्मचाऱ्यांकडून दिली जाणारी उत्तम ग्राहक सेवा यामुळे बेळगाव तालुका रुरल इंडस्ट्रियल को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीने विश्वासार्हता प्राप्त केली असून याच बळावर या सोसायटीने लावलेल्या इवल्याशा रोपाचे रूपांतर प्रचंड अशा वटवृक्षात झालेले आहे, असे …

Read More »

‘स्केटिंग’ मध्ये वर्ल्ड रेकॉर्ड केलेल्या अंकुरम’च्या १५ विद्यार्थ्यांचा गौरव

निपाणी (वार्ता) : येथील कोडणी  रोडवरील अंकुरम इंग्लिश मिडियम स्कूलच्या १५ विद्यार्थ्यांनी ‘स्केटिंग मध्ये वर्ल्ड रेकॉर्ड केला आहे. त्यांना पालक मेळाव्यात  पारितोषिक वितरण करण्यात आले. प्रमुख पाहुणे म्हणून रोटरी क्लबचे अध्यक्ष दिलीप पठाडे होते. प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन झाले. प्राचार्य चेतना चौगुले यांनी, अंकुलम इंग्लिश मिडियम स्कूलची क्रिडो सोबत …

Read More »

अकोळ शर्यतीत वाघमोडे यांची बैलगाडी प्रथम

बाळूमामा भंडारा यात्रा उत्साहात; विविध कार्यक्रम निपाणी (वार्ता) : अकोळ येथील बाळूमामा देवस्थान भंडारा यात्रेनिमित्त आयोजित बैलगाडी शर्यतीत संदीप वाघमोडे यांच्या बैलगाडीने प्रथम क्रमांकाचे १५ हजार रुपये, निशान व ढाल असे बक्षीस मिळविले. विक्रम नांदेकर यांच्या बैलगाडीने द्वितीय क्रमांकाचे १० हजार रुपयांचे तर संदीप पाटील यांच्या बैलगाडीने तृतीय क्रमांकाचे ७००० …

Read More »

हासनजवळ अपघातात एकाच कुटूंबातील चार ठार

  बंगळूर : चन्नरायपटण तालुक्यातील करेहळ्ळीजवळ रात्री उशिरा रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या ट्रॅक्टरला दुचाकीची धडक बसल्याने दोन मुलींसह एकाच कुटुंबातील चार जणांचा जागीच मृत्यू झाला. योगेशचारी (३५), लक्ष्मी (२८) आणि लोकेशच्या बहीणीच्या मुले, गणवी (१२) आणि लेखना (४) अशी मृतांची नावे आहेत. योगेशचारी हे मूळचे तिपातुरु तालुक्यातील एडगरहळ्ळी गावचे असून …

Read More »

दहावी, बारावीच्या विद्यार्थ्यांना मिळणार ग्रेस मार्क्स

कोविडच्या परिणामातून विद्यार्थी सावरले नसल्याने निर्णय बंगळूर : मार्च-एप्रिल २०२२-२३ मध्ये होणार्‍या दहावी (एसएसएलसी) आणि बारावी (द्वितीय पीयूसी) वार्षिक परीक्षा लिहिणाऱ्या विद्यार्थ्यांना शिक्षण विभागाने एक गोड बातमी दिली आहे. मागील वर्षाप्रमाणे यावर्षीही विद्यार्थ्यांना ग्रेस मार्क्स (कृपांक) मिळतील. गेल्या वर्षी कोविडमुळे दहावी आणि बारावी विद्यार्थ्यांना ग्रेस मार्क्स देण्यात आले होते. असेच …

Read More »

अंडी घोटाळ्यामुळे महत्त्वाचे पद गेले

काकासाहेब पाटील : निपाणीत गॅरंटी कार्ड वितरण  निपाणी : आपल्या आमदार कीच्या काळात काळम्मावाडी पाण्याचा करार, वेदगंगा नदीपासून पाइपलाइन, खरी कॉर्नर येथे ब्रिज, निपाणी तालुका निर्मिती, निपाणी मतदारसंघ पुनरुज्जीवन अशी शाश्वत कामे केली आहेत. निपाणी रेल्वेसाठी युद्धपातळीवर प्रयत्न करून सर्वेक्षण करेपर्यंत पाठपुरावा केला. पण त्यानंतर मंत्री आणि खासदार झालेल्यांनी या …

Read More »

नावगे सरकारी मराठी शाळेचा अमृत महोत्सव दिमाखात

  बेळगाव : नावगे (ता. जि. बेळगाव) येथील सरकारी उच्च प्राथमिक मराठी शाळेचा अमृत महोत्सवी सोहळा आज रविवारी सकाळी मोठ्या दिमाखात पार पडला. नावगे (ता. जि. बेळगाव) येथील सरकारी उच्च प्राथमिक मराठी शाळेला यंदा 2023 साली 75 वर्षे पूर्ण होत आहेत. यानिमित्त गोव्याचे उद्योजक मारुती मोटणकर यांच्या अध्यक्षतेखाली आज रविवारी …

Read More »

बेळगाव रेल्वे स्थानकावर महापुरुषांचे शिल्प प्रस्थापित

  बेळगाव : रेल्वे स्थानकाच्या गोडाऊनमध्ये छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या मूर्ती लपविण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आल्यानंतर बेळगावमधील जनतेतून संताप व्यक्त करण्यात येत आहे.. हा प्रकार रविवारी दुपारी उघडकीस आल्यानंतर तब्बल ६ तासांहून अधिक काळ याठिकाणी आंदोलन सुरु होते. दरम्यान गेल्या ५ दिवसांपासून सुरु असलेली शिवसन्मान …

Read More »

जागर भगव्या ध्वजाचा, हुंकार मराठी मनाचा!

  बेळगाव : रणरणत्या उन्हात हातात भगवा ध्वज घेऊन आपल्या शिलेदारांसह दररोज 40 किलोमीटरहून अधिक अंतर पायी चालत भगव्याचा जागर करणारा अवलिया म्हणजे महाराष्ट्र एकीकरण समितीचे नेते रमाकांत दादा कोंडुस्कर. मराठी अस्मितेचे प्रतीक, मराठ्यांचा इतिहास सांगणारा भगवा आणि अखंड महाराष्ट्राचे आराध्य दैवत असणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांचा स्वार्थी राजकारण्यांकडून वेळोवेळी होणारा …

Read More »