Thursday , December 18 2025
Breaking News

Classic Layout

डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरणी ‘सीबीआय’चा तपास पूर्ण

  मुंबई : डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरणाचा तपास अहवाल केंद्रीय गुन्‍हे अन्वेषण विभागाने (सीबीआय) तीन आठवड्यांत सादर करावा, असे निर्देश (दि. ३०) आज मुंबई उच्‍च न्‍यायालयाने दिले. डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरणाचा तपास पूर्ण झाला आहे. तसेच, नव्याने सुरु केलेला तपासही पूर्ण झाला आहे. याचा अहवाल तपास अधिकाऱ्यांनी दिल्लीतील …

Read More »

शिवसेना कोणाची? निवडणूक आयोगासमोर ठाकरे गटाचा शेवटचा डाव

नवी दिल्ली : शिवसेना पक्ष कोणाचा, पक्षाचे निवडणूक चिन्ह धनुष्यबाण कोणाचे, यावर ठाकरे गट आणि शिंदे गटात वाद सुरू आहे. या वादावर निवडणूक आयोगासमोर सुनावणी सुरू आहे. आज दोन्ही गटांना लेखी युक्तिवाद सादर करण्याचे निर्देश देण्यात आले होते. ठाकरे गटाने आज लेखी स्वरुपात आपलं म्हणणं सादर केले. कुठल्याही पातळीवर तपासलं …

Read More »

बेळगावच्या स्केटर्सचे राष्ट्रीय रोलर स्केटिंग चॅम्पियनशिपमध्ये नेत्रदीपक यश

  बेळगाव : बेळगाव जिल्हा रोलर स्केटिंग असोसिएशनच्या दोन स्केटर्सनी सीबीएसई राष्ट्रीय रोलर स्केटिंग चॅम्पियनशिपमध्ये अभिनंदनीय यश मिळविले आहे. गुरुग्राम, हरियाणा येथे जानेवारी 2023 मध्ये झालेल्या सीबीएसई राष्ट्रीय रोलर स्केटिंग चॅम्पियनशिप या स्पर्धमध्ये संपूर्ण भारतातून 1200 हून अधिक स्केटिंगपटूंनी भाग घेतला होता. त्यात बेळगावच्या स्केटर्सनी 1 रौप्य आणि 2 कांस्य …

Read More »

जेडीेएसचे माजी पंतप्रधान देवेगौडा, माजी मुख्यमंत्री कुमारस्वामींसह राज्याध्यक्षांच्या उपस्थितीत खानापुरात भव्य कार्यक्रम

  खानापूर (प्रतिनिधी) : खानापूर मतदारसंघाचे जेडीेएसचे उमेदवार नासीर बागवानचा ६६ वा वाढदिवसानिमित्त येत्या २ फेब्रुवारी रोजी येथील मलप्रभा क्रीडांगणावर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती जेडीेएसचे उमेदवार नासीर बागवान यांनी बोलाविलेल्या पत्रकार परिषदेत दिली. प्रारंभी खानापूर तालुका जेडीएसचे अध्यक्ष एम. एम. सावकार यांनी प्रास्ताविक करून उपस्थितांचे स्वागत केले. …

Read More »

कथित सीडी प्रकरणास डी. के. शिवकुमार हेच जबाबदार; रमेश जारकीहोळी यांचा आरोप

  बेळगाव : गेल्या दीड वर्षांपासून माझ्या विरोधात सातत्याने षडयंत्र केले जात आहे. कथित सीडी प्रकरणाव्दारे माझे वैयक्तिक जीवन उध्वस्त करण्याचा प्रयत्न झाला आहे. या सर्वा मागे काँग्रेस नेते डी. के. शिवकुमार हेच कारणीभूत आहेत. गेल्या अनेक वर्षांपासून राज्यातील बडे राजकारणी तसेच अधिकाऱ्यांना सीडीच्या माध्यमातून ब्लॅकमेल करण्याचे काम केले जात …

Read More »

फेब्रुवारीत भरवणार कुंभार समाजाचा मेळावा

  संत गोरा कुंभार समाज विकास मंडळाच्या बैठकीत निर्णय खानापूर : दर पाच वर्षांनी खानापूर तालुका पातळीवर संत गोरा कुंभार समाज विकास मंडळातर्फे महामेळावा फेब्रुवारीत भरवण्याचा निर्णय रविवारी झालेल्या वार्षिक बैठकीत घेण्यात आला. या बैठकीचे आयोजन फुलेवाडी येथील आयोध्या नगरमध्ये करण्यात आले होते. या बैठकीच्या अध्यक्षस्थानी भैरू कुंभार होते. बैठकीच्या …

Read More »

कोगनोळीच्या चिमुकल्या आराध्याला महाराष्ट्र शासनाचा बालक्रीडा गौरव पुरस्कार

  कोगनोळी : येथील बाळासाहेब पाटील बनाप यांची नात आराध्या पद्मराज पाटील या चिमुकल्या मुलीला कोल्हापूर येथे महाराष्ट्र शासनाचा बाल क्रीडा गौरव पुरस्कार देऊन कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री दीपक केसरकर यांच्या हस्ते नुकतेच सन्मानित करण्यात आले. २६ जानेवारी रोजी सकाळी छत्रपती शाहू स्टेडीयम येथे कोल्हापूर जिल्ह्यातील “कला, क्रीडा, शैक्षणिक या क्षेत्रामध्ये …

Read More »

खानापुरात मराठी सांस्कृतिक प्रतिष्ठानचे काम उल्लेखनीय

  खानापूर : मराठी भाषा व मराठी संस्कृतीचे जतन करणारी संस्था म्हणजे मराठी सांस्कृतिक प्रतिष्ठान असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. मागील बारा वर्षांपासून मराठी भाषा टिकविण्यासाठी मराठी सांस्कृतिक प्रतिष्ठानच्या माध्यमातून हाती घेतलेले कार्य कौतुकास्पद आहे. कोणत्याही शासकीय अनुदानाशिवाय पदाधिकाऱ्यांनी स्वखर्चातून खानापूर तालुक्यातील विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी विविध स्पर्धात्मक परीक्षांचे आयोजन करून …

Read More »

शहीद विंग कमांडर हनुमंतराव सारथी पंचत्वात विलीन

  बेळगाव : हवाई दलाच्या लढाऊ विमानांच्या टकरीत शहीद झालेले बेळगावचे सुपुत्र विंग कमांडर हनुमंतराव सारथी पंचत्वात विलीन झाले. अमर रहे, अमर रहे हनुमंतराव सारथी अमर रहे अशा जयघोषात, बेळगावातील गणेशपूरमधील स्मशानभूमीत त्यांच्यावर लष्करी इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. मध्यप्रदेशमधील मुरेना जिल्ह्यात सुखोई आणि मिराज विमानांच्या सरावावेळी झालेल्या धडकेत बेळगावचे सुपुत्र विंग …

Read More »

ओडिशाचे आरोग्यमंत्री नबा दास यांचं उपचारादरम्यान निधन; पोलिस अधिकाऱ्यानं केला होता गोळीबार

  ओडिशाचे आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री आणि बिजू जनता दल (बीजेडी) ज्येष्ठनेते नबा दास यांचं उपचारादरम्यान निधन झालं आहे. ते 60 वर्षांचे होते. त्यांच्यावर एका पोलिस अधिकाऱ्याने गोळीबार केला होता. पश्चिम ओडिशातील झारसुगुडा जिल्ह्यात आज ब्रजराजनगरमध्ये दिवसाढवळ्या एका सहाय्यक उपनिरीक्षकाने नबा दास यांच्यावर गोळीबार केल्याने गंभीर जखमी झाले होते. …

Read More »