Wednesday , December 17 2025
Breaking News

Classic Layout

दहावी परीक्षा ३१ मार्चपासून

  बंगळूर : दहावीची वार्षिक परीक्षा ३१ मार्च ते १५ एप्रिलपर्यंत होणार आहे. परिक्षेचे अंतिम वेळापत्रक सोमवारी जाहीर करण्यात आले. प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षणमंत्री बी. सी. नागेश यांनी याबाबत ट्विट केले आहे. अधिकृतपणे त्यांनी वेळापत्रक जाहीर केले. नेहमीप्रमाणे पहिला पेपर प्रथम भाषेचा आहे. त्या दिवशी मराठी माध्यमाच्या विद्यार्थ्यांसाठी मराठी, तर …

Read More »

न्यू इंग्लिश स्कूलच्या विद्यार्थ्यांनी लावला कांदा!

सौंदलगा : येथील रयत शिक्षण संस्थेच्या न्यू इंग्लिश स्कूलमध्ये मिनी गुरुकुल प्रकल्पांतर्गत विविध प्रकल्प राबवले जातात. त्या पद्धतीने मुख्याध्यापक जे. एस. वाडकर यांच्या मार्गदर्शनानुसार विभाग प्रमुख श्री. एस. व्ही. यादव व सहाय्यक शिक्षिका सविता कुरले यांनी क्षेत्रभेटीसाठी विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष शेतावर नेऊन कांदा लावणीचा अनुभव घेतला. यावेळी सौंदलगा येथील प्रगतशील शेतकरी …

Read More »

आर. एम. चौगुले यांच्यावतीने किल्ल्याच्या प्रतिकृती साकारलेल्या बालचमुंचा गौरव

  बेळगाव : सांबरा गावात दिवाळीनिमित्त किल्ल्याच्या प्रतिकृती साकारण्यात आलेल्या बालचमुंचा गौरव करण्यात आला. छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे सोमवारी रात्री आयोजित कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी भरमा चिंगळी होते. अभियंते आणि म. ए. समितीचे युवा नेते आर. एम. चौगुले यांच्यावतीने किल्ल्याच्या प्रतिकृती साकारलेल्या सर्व बालचमुंना प्रमाणपत्र आणि मंडळाना चषक देवून गौरवण्यात आले. …

Read More »

येत्या 48 तासात कन्नड संघटनांची गुंडगिरी थांबविली नाही तर स्वतः बेळगावात हजर : शरद पवार

  मुंबई : महाराष्ट्र कर्नाटक सीमाप्रश्न सर्वोच्च न्यायालयात निर्णायक वळणावर असताना दोन्ही राज्यात राजकारण तापले आहे. महाराष्ट्र सरकारची बाजू भक्कम असल्यामुळे कर्नाटक सरकारचे धाबे दणाणले आहेत. त्यामुळे कर्नाटक सरकारने रडीचा डाव मांडला आहे. महाराष्ट्राचे समन्वयक मंत्री बेळगांव दौऱ्यावर येणार होते त्यांना कर्नाटक सरकारने हेतुपुरस्सर प्रवेशबंदी केली तर विविध कन्नड संघटनांनी …

Read More »

अटक केलेल्या म. ए. समिती नेत्यांची सुटका

  बेळगाव : सीमाभागातील मराठी भाषिकांच्या व्यथा आणि समस्या जाणून घेऊन त्या सोडविण्यासाठी बेळगाव येथे येणाऱ्या महाराष्ट्रातील सीमा समन्वयक मंत्र्यांची अडवणूक करू नका या मागणीचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना सादर करण्यासाठी गेलेल्या म. ए. समितीच्या अटक केलेल्या नेत्यांची बेळगाव पोलिसांनी सुटका केली. सीमा भागातील मराठी भाषिकांचे प्रश्न सोडविण्यासाठी महाराष्ट्रातील सीमा समन्वयक मंत्री …

Read More »

समितीवरील कारवाईचा सीमाभागातील गावागावातून निषेध

  बेळगाव : पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांच्या नावे निवेदन देण्यासाठी गेलेल्या महाराष्ट्र एकीकरण समितीच्या नेत्यांवर केलेल्या दडपशाहीविरोधात गावागावांतून निषेध करण्यात येत आहे. मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांच्या आदेशानुसार महाराष्ट्रातील मंत्र्यांवर जिल्हा बंदीची कारवाई करण्यात आली आहे. पण, आज कन्नड संघटनेच्या गुंडांनी महाराष्ट्राच्या वाहनांवर दगडफेक केली. त्यामुळे मंत्र्यांना …

Read More »

कर्नाटक सरकारच्या दडपशाहीचा येळ्ळूर विभाग म. ए. समितीच्यावतीने जाहीर निषेध

    येळ्ळूर : सीमा भागातील मराठी भाषिकांचे प्रश्न ऐकून घेण्यासाठी व कार्यकर्त्यांशी संवाद साधण्यासाठी सीमा समन्वयक मंत्री बेळगावला येणार होते परंतु कर्नाटक सरकारने सुरुवातीपासूनच त्यांना रोखण्याचा प्रयत्न केला, यामुळे घटनात्मक अधिकारांची पायमल्ली झाली म्हणून मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीच्यावतीने एक पत्र देऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांना लिहिले …

Read More »

निवेदन देण्याकरिता गेलेल्या समिती नेत्यांना अटक

बेळगाव : महाराष्ट्र सीमासमन्वयक मंत्र्यांच्या बेळगाव दौऱ्यावर बंदी घालण्यात आल्याने यासंदर्भात जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्याकरिता गेलेल्या समिती कार्यकर्त्यांना अटक करण्यात आली आहे. महाराष्ट्रातून येणाऱ्या नेत्यांची अडवणूक करू नका, या मागणीसाठी बेळगावच्या जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यासाठी गेलेल्या महाराष्ट्र एकीकरण समितीच्या नेत्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. 144 कलम लागू असताना अशाप्रकारे निवेदन देण्यासाठी इतक्या मोठ्या …

Read More »

सीमाप्रश्नी महाराष्ट्र सरकारचे पुन्हा बोटचेपी धोरण!

  बेळगाव : महाराष्ट्राचे सीमा समन्वयक मंत्री शंभूराजे देसाई व चंद्रकांत पाटील 6 डिसेंबर रोजी बेळगाव दौऱ्यावर येणार अशी बातमी प्रसिद्ध होताच सीमाभागात नवचैतन्य निर्माण झाले होते. मात्र आज अचानक समन्वयक मंत्र्यांचा ठरलेला दौरा रद्द झाल्यामुळे महाराष्ट्र सरकारने दिल्लीश्वरांकडे झुकते माप घेतल्यामुळे पुन्हा एकदा सीमावासीयांच्या जखमेवर मीठ चोळण्याचे काम महाराष्ट्रातील …

Read More »

मध्यवर्ती म. ए. समितीच्या वतीने उद्या जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देणार

  बेळगाव : सीमा प्रदेशातील मराठी भाषिकांचे प्रश्न ऐकून त्यावर उपाययोजना करण्यासाठी महाराष्ट्राचे सीमाप्रश्न समन्वयक मंत्री सीमाभागातील मराठी भाषिकांना भेटण्यासाठी बेळगावला येणार आहेत. परंतु कर्नाटक सरकारने त्यांना रोखण्याचे प्रयत्न चालू केले आहेत, यामुळे घटनात्मक अधिकाराची पायमल्ली होणार आहे. याबाबत पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री श्री. अमित शाह यांना लिहिलेल्या …

Read More »