Wednesday , December 17 2025
Breaking News

Classic Layout

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर सजावटींच्या साहित्याने बेळगावसह उपनगरातील बाजारपेठा फुलल्या!

  बेळगाव : लाडक्या गणरायाचे आगमन अवघ्या दोन दिवसांवर आले असून गणेश चतुर्थीच्या सणासाठी सजावटींच्या साहित्याने बेळगावसह उपनगरातील बाजारपेठा फुलल्या आहेत. बाजारात सजावटींच्या साहित्यात विविध आकर्षक मखर प्लास्टिक फुलांच्या माळा, मोत्यांचे तसेच विविध प्रकारचे हार, पाट, फुलांच्या माळा, पडदे, झालर, आकर्षक तोरणे यांची बाजारपेठेत रेलचेल झाली आहे. त्याचप्रमाणे पूजेचे साहित्य …

Read More »

काँग्रेस आमदार वीरेंद्र पप्पी यांना २८ ऑगस्टपर्यंत ईडी कोठडी

  बंगळूर : बेकायदेशीर बेटिंग कंपनी चालवण्याच्या आरोपांशी संबंधित मनी लाँड्रिंग प्रकरणात अटक केलेले काँग्रेस आमदार के. सी. वीरेंद्र पप्पी यांना येथील न्यायालयाने रविवारी २८ ऑगस्टपर्यंत अंमलबजावणी संचालनालयाच्या (ईडी) कोठडीत पाठवले. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आमदाराला आज सकाळी सिक्कीमहून बंगळुरला आणण्यात आले. येथील विमानतळावर पोहोचताच ईडीच्या विशेष पथकाने त्यांना ताब्यात घेतले. …

Read More »

चिन्नय्या यांच्या अटकेनंतर धर्मस्थळ प्रकरणाला नवे वळण; कवटीचे रहस्य उलगडले

  बंगळूर : चिन्नय्या यांनी आणलेला मृतदेह कुठून आला या प्रश्नाचे उत्तर अखेर मिळाले आहे. विशेष तपास पथकाने (एसआयटी) चिन्नय्या यांची चौकशी करण्यासाठी त्याला १० दिवस कोठडीत घेऊन चौकशी सुरू केली आहे. या प्रकरणामागील स्फोटक गुपिते उलगडत आहेत. चिन्नय्या यांनी आणलेला मृतदेह धर्मस्थळापूर्वी दिल्लीला गेल्याचे धक्कादायक सत्य समोर आले आहे. …

Read More »

सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ बॅरिस्टर नाथ पै चौक शहापूर सुवर्ण महोत्सवी वर्ष

  बेळगाव : बेळगावच्या सार्वजनिक गणेशोत्सवाला एक भव्य परंपरा लाभली आहे. महाराष्ट्रा पाठोपाठ बेळगाव सीमाभागात सार्वजनिक गणेशोत्सव मोठ्या हर्षोल्सासात आणि उत्साहात साजरा केला जातो. बेळगावच्या भव्य सार्वजनिक गणेशोत्सवाची परंपरा पुढे नेण्याचे काम एका विशिष्ट पूर्ण रीतीने बेळगाव उपनगरातील बॅरिस्टर नाथ पै चौक शहापूर येथील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाने केले आहे. यावर्षी …

Read More »

मराठा बँकेची ८३ वी वार्षिक सर्वसाधारण सभा खेळीमेळीच्या वातावरणात संपन्न

  बेळगाव : मराठा बँकेची 83 वी वार्षिक सर्वसाधारण सभा मराठा मंदिर येथे कै. अर्जुनराव गोविंदराव घोरपडे सभागृहात खेळीमेळीच्या वातावरणात संपन्न झाली. प्रारंभी बँकेचे चेअरमन श्री. बाळाराम पाटील यांनी उपस्थित सभासदांचे स्वागत केले व प्रास्ताविक भाषणात स्पर्धात्मक बँकिंग क्षेत्रामध्ये आपल्या बँकेने केलेल्या प्रगतीबाबत उपस्थित सभासदांना माहिती दिली. तसेच 2024-2025 च्या …

Read More »

प्रजापिता ब्रह्माकुमारीच्या महारक्तदानाला शेकडो रक्तदात्यांचा प्रतिसाद

  बेळगाव : देश विदेशात सामाजिक एकता, शांतता आणि विश्वबंधुत्वासाठी कार्यरत असलेल्या प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालयाच्या बेळगाव युनिट वतीने ब्रह्माकुमारी दादी प्रकाशमणी यांच्या स्मृतिदिनानिमित्त 22 ते 24 ऑगस्ट दरम्यान बेळगावात सलग तीन दिवस महा रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. सलग तीन दिवस चाललेल्या या महा रक्तदान शिबिरात बेळगावातील शेकडो …

Read More »

सीमाभागातील विद्यार्थ्यांनी उच्च शिक्षणासाठी सवलतींचा लाभ घ्यावा

  बेळगाव : सीमाभागातील विद्यार्थ्यांनी माफक शुल्कात उच्च शिक्षणासाठी विविध अभ्यासक्रमात देण्यात येणाऱ्या सवलतींचा लाभ घ्यावा असे आवाहन कोल्हापूर येथील शिवाजी विद्यापीठाचे उपकुलसचिव विनय शिंदे यांनी केले. शिवाजी विद्यापीठाच्या दूरशिक्षण व ऑनलाईन शिक्षण केंद्र यांच्यावतीने राबविण्यात येणा-या विविध अभ्यासक्रमाची माहिती देण्यासाठी म.ए. समितीतर्फे सीमाभागातील विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शन शिबिराचे आयोजन ओरिएंटल हायस्कूल …

Read More »

के-सेट परीक्षेतून मराठीला वगळले; उद्या युवा समिती जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देणार

  बेळगाव : पदव्युत्तर विद्यार्थ्यांसाठी प्राध्यापक भरतीसाठी आवश्यक असलेल्या, कर्नाटक परीक्षा प्राधिकारण मार्फत घेण्यात येणाऱ्या के-सेट परीक्षेतून मराठी विषयाला वगळण्यात आले आहे, त्या संदर्भात महाराष्ट्र एकीकरण युवा समितीच्या वतीने सोमवार दिनांक २५ ऑगस्ट २०२५ रोजी सकाळी ११.०० वाजता जिल्हाधिकारी बेळगाव यांना निवेदन देण्यात येणार आहे तरी सर्व पदाधिकारी आणि मराठी …

Read More »

29 तारखेला आरक्षणाचा तुकडाच पाडणार; मनोज जरांगे कडाडले

    मुंबई : येत्या 29 ऑगस्ट रोजी जरांगे पाटील आपल्या लाखो मराठा बांधवांसह मुंबईच्या आझाद मैदानात येणार आहेत. दरम्यान, जरांगे यांच्या या आंदोलनाची पुन्हा एकदा महाराष्ट्रभर चर्चा चालू झाली आहे. एकीकडे गणेशोत्सवाची धूम असताना दुसरीकडे जरांगे पाटील आंदोलनासाठी मुंबईत येणार असल्याने कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्या व्यक्त …

Read More »

बेळगाव ग्रामीण भागातील अनेक गावात आज वीज पुरवठा खंडित

बेळगाव : दुरुस्तीच्या कारणास्तव विविध भागात आज रविवार दि. 24 रोजी सकाळी 9 ते सायंकाळी 4 पर्यंत वीजपुरवठा खंडित करण्यात येणार असल्याचे हेस्कॉम ग्रामीण विभागाने कळविले आहे. मुचंडी, अष्टे, कॅम्बेल, मारिहाळ, करडीगुद्दी, पंतबाळेकुंद्री, बाळेकुंद्री, होन्निहाळ, माविनकट्टी, तारिहाळ, चंदन होसूर, एमईएस सांबरा, मुतगा, सुळेभावी, पंतनगर, मोदगा, यद्दलभावीहट्टी, खणगाव, चंदूर, चंदगड, गणिकोप्प, …

Read More »