Wednesday , December 17 2025
Breaking News

Classic Layout

काटगाळीत ज्ञानेश्वर पारायण सोहळ्याची मुहूर्तमेढ उत्साहात

खानापूर (प्रतिनिधी) : काटगाळीत (ता. खानापूर) येथे सालाबाद प्रमाणे यंदाही २७ व्या वर्षी होणाऱ्या पारायण सोहळ्याची मुहूर्तमेढ सोमवारी दि. ३ रोजी पार पडली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी हभप शंकर पाटील होते. प्रास्ताविक बाबू बस्तवाडकर यांनी केले. यावेळी मुहूर्तमेढ भाजप नेते व श्री महालक्ष्मी ग्रूपचे संस्थापक विठ्ठलराव हलगेकर यांच्या हस्ते रोवण्यात आली. यावेळी …

Read More »

’गौरी गणेश’ने महिला सबलीकरणाला महत्त्व दिले

  अध्यक्षा अश्विनी मगदूम : वार्षिक सभा निपाणी (वार्ता) : महिला आर्थिकदृष्ट्या मजबूत झाल्या पाहिजेत, महिलांनी सुसंस्कृत कुटुंब निर्माण केले पाहिजे. त्या सुसंस्कृत कुटुंबातून चांगले समाज घडविण्याकडे महिलांनी लक्ष दिले पाहिजे, या हेतूने गौरी गणेश पतसंस्थेने सहकार क्षेत्राबरोबरच सामाजिक क्षेत्रालाही प्राधान्य देऊन प्रत्येक महिला सभासदांना आर्थिकदृष्ट्या मजबूत करण्याबरोबरच त्यांच्या सबलीकरणासाठी …

Read More »

समाजाच्या प्रगतीसाठी महात्मा गांधींचे विचार आवश्यक : तृप्ती भाभी शाह

  देवचंदमध्ये गांधी जयंती निपाणी (वार्ता) : समाजाच्या उन्नतीवर देशाची उन्नती अवलंबून असते. समाजाचा विकास होण्यासाठी महात्मा गांधी यांचे विचार आवश्यक आहेत. सत्य अहिंसा, स्वच्छता यांचा अवलंब केल्यास समाज प्रगतीपथाच्या मार्गावर जाईल, असे विचार तृप्ती भाभी शाह त्यांनी व्यक्त केले. अर्जुन नगर (ता. कागल) देवचंद महाविद्यालयातील राष्ट्रीय सेना योजना -2 …

Read More »

इस्लामी देशांत हिजाबला विरोध होत असताना भारतातील हिजाब समर्थक कुठे आहेत? : अधिवक्ता रचना नायडू

  काही महिन्यांपूर्वी कर्नाटकमध्ये हिजाब घालून शाळा-कॉलेजमध्ये प्रवेश करणार्‍या मुसलमान मुलींचा विषय सर्वोच्च न्यायालयापर्यंत पोचला. सध्या हिजाबला विरोध करणार्‍या इराण आणि अन्य इस्लामी देशांतील महिलांच्या भावनांकडे का पाहिले जात नाही? भारतातील घटना आणि जगभरातील घटना असे पाहून निवडक आक्रोश होतांना दिसतो. एरव्ही विविध घटनांत अन्य देशांची उदाहरणे देणारे सध्या जगभरातील …

Read More »

डॉ. वीरकुमार गोरवाडे यांना पीएचडी प्रदान

  निपाणी (वार्ता) : बोरगाव येथील प्रतिष्ठित नागरिक बापूसाहेब गोरवाडे यांचे सुपुत्र डॉ. वीरकुमार गोरवाडे यांना शिवाजी विद्यापीठाकडून नुकतेच पीएचडी पदवी मिळाली. वीरकुमार यांनी ’आग्रो केमिकल व वेस्ट मॅनेजमेंट’ या विषयावर विषय सादर केला होता. त्यांनी सादर केलेला या विषयावर शिवाजी विद्यापीठाचा शेती रसायन व कीट व्यवस्थापन विभागाकडून विशेष असे …

Read More »

कोनेवाडी येथे पूजा व महाप्रसादाचे आयोजन

  बेळगाव : दिनांक 2 ऑक्टोबर रोजी कोनेवाडी येथे दुर्गामाता युवक मंडळ यांच्यावतीने दुर्गामाता देवीच्या समोर सत्यनारायणची पूजा संपन्न झाली व तसेच महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. महाप्रसादाचा संपूर्ण खर्च ग्रामीणचे माजी आमदार व बेळगाव जिल्हा अध्यक्ष श्री. संजयदादा पाटील व बेळगाव भाजप ग्रामीणचे माजी अध्यक्ष श्री. विनयदादा कदम यांच्या …

Read More »

बसचे ब्रेक निकामी झाल्याने कम्पाउंडला धडक!

  आरटीओ सर्कल येथील घटना बेळगाव (प्रतिनिधी) : ब्रेक निकामी झालेली एक खासगी आराम बस थेट इमारतीच्या कंपाऊंडमध्ये शिरली. आज सोमवारी सकाळी बेळगाव आरटीओ सर्कल नजीक हा धक्कादायक प्रकार घडला. यावेळी बसमध्ये प्रवासी नव्हते त्यामुळे सुदैवाने जीवितहानी टळली. याबाबत घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार चन्नम्मा सर्कलकडून एक खासगी आराम बस आरटीओ सर्कल नजीक …

Read More »

लाख मोलाच्या खिलारवर ‘२४ तास’ लक्ष

  शौकीन आणि पशुपालकांकडून ‘लम्पी स्कीन’ पासून बचावासाठी अखंडित प्रयत्न अंकली (प्रतिनिधी) : ‘लम्पी स्कीनमुळे पशुधनाला हादरे बसत आहेत. यामध्ये नामवंत जाती ही धोक्यात आल्या आहेत. पशुपालकांमध्ये सर्वाधिक लोकप्रिय असणारा खिलार बैलही ‘लम्पी’च्या कचाट्यात अडकत आहे. लाख मोलाचा खिलार जगवण्यासाठी पशुपालकांकडून दररोज हजारो रुपयांचा खर्च होत आहे. सध्या शर्यतींवर तात्पुरती बंदी …

Read More »

आज होणार देवीचा गोंधळ चंडिका होम आणि जागरण

  बेळगाव : येथील नार्वेकर गल्लीतील ज्योतिर्लिंग देवस्थानात दरवर्षी नवरात्रोत्सवात अष्टमी दिवशी मंदिरात देवीचा गोंधळ घालण्यात येतो. तसेच अहो रात्र जागरणही करण्यात येते. यावर्षी अष्टमी दिवशी म्हणजे आज सोमवारी रात्री 11 वाजता वाजता देवीचा गोंधळ घालण्यात येणार आहे तसेच नवचंडी का होम करून जागरणही करण्यात येणार आहे. तरी भाविकांनी दर्शनाचा …

Read More »

केएसआरटीसी बस-लॉरीमध्ये भीषण अपघात; चौघांचा मृत्यू

  होसकोटे : केएसआरटीसी बसची महामार्गाच्या कडेला उभ्या असलेल्या लॉरीला धडकल्याने झालेल्या अपघातात चार जण ठार झाले. होसकोटे-कोलार मुख्य रस्त्यावर मैलापूरजवळ हा भीषण अपघात झाला. कोलारहून बंगळुरूकडे जाणाऱ्या केएसआरटीसी बसवरील चालकाचे नियंत्रण सुटले आणि ती एका उभ्या असलेल्या लॉरीला धडकली. या घटनेत आंध्र प्रदेशातील एका जोडप्यासह चार जणांचा मृत्यू झाला. …

Read More »