Wednesday , December 17 2025
Breaking News

Classic Layout

तहसीलदारांच्या निरोपावेळी कर्मचारी गहिवरला!

  डॉ. मोहन भस्मे यांना निरोप  : बंगळूरु येथे बढती निपाणी (वार्ता) : येथील तहसीलदार डॉ. मोहन भस्मे हे दीड वर्षापासून येथील कार्यालयात तहसीलदार म्हणून कार्यरत आहेत. त्यांनी आपल्या कारकिर्दीमध्ये, कोरोना महापूर शहर विविध समस्यांना तोंड देत सर्वसामान्यांची कामे केली आहेत. त्यांना बंगळुरु येथे बढती मिळाली आहे. त्यानिमित्त त्यांचा महसूल …

Read More »

खानापूर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्यावतीने हेस्काॅम, नगरपंचायतीला निवेदन

  खानापूर (प्रतिनिधी) : यंदाच्या ३१ ऑगस्टपासून सुरू होणाऱ्या गणेशोत्सव काळात पावसाळा असल्याने पावसामुळे खानापूर शहरातील अनेक रस्त्यावर खड्डे पडून रस्ते अतिशय खराब झाले आहेत. गणेश दर्शनासाठी खानापूर तालुक्यातील अनेक गावचे नागरीक शहरात येतात. यावेळी नागरीकाची गैरसोय होऊनये. यासाठी रस्त्याची डागडुजी करावी. तसेच रस्त्यावरील पथदिपांची व्यवस्था करावी. तसेच मलप्रभा नदीघाटावर …

Read More »

पूर मदत कार्यासाठी 200 कोटी; जिल्हा प्रशासनाशी मुख्यमंत्र्यांचा व्हिडिओ संवाद

  बंगळूर : मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी शनिवारी सायंकाळी राज्यातील जिल्हाधिकाऱ्यांशी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारा संपर्क साधून पूर परिस्थिती बाबत चर्चा केली. पूरग्रस्तांना तातडीने मदत करण्याच्या त्यांनी सूचना केल्या. बैठकीत पावसामुळे झालेल्या नुकसानीची माहिती जिल्हाधिकाऱ्यांनी दिली. त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी राज्य नैसर्गिक आपत्ती निवारण निधी अंतर्गत २०० कोटी रुपये मंजूरीचा आदेश दिला. बेळ्ळारी, चित्रदुर्ग, …

Read More »

लिंगायत वस्तीतील बोरगांववाडीत अनोखा मोहरम!

५०८ वर्षाची परंपरा कायम : उद्याज मोहरमचा मुख्य दिवस निपाणी (विनायक पाटील) : बोरगाववाडी हे निपाणी तालुक्यातील धार्मिक-संस्कृती जोपासणारे छोटे गांव आहे. हे गांव लिंगायत समाजाचे असून गावात एकही मुस्लिम बांधव वास्तव्यास नाही. तरीही लिंगायत लोक मोहरम साजरा करतात. या सणाला ५०८ वर्षाची परंपरा असून सोमवारी (ता.८) मुख्य दिवस आहे. …

Read More »

विठ्ठल हलगेकर “विजयरत्न”ने सन्मानित

खानापूर (श्रीपाद वसंत उशिनकर) : खानापूर येथे शांतीनिकेतन या नावाने मोठी ज्ञानाची गंगा व कॉलेज, श्री महालक्ष्मी ग्रुपचे चेअरमन श्री. विठ्ठल हलगेकर यांना बेंगलोर विजयवानीतर्फे “विजयरत्न” हा सन्मान देऊन त्यांचा सन्मान करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

Read More »

महागावजवळ ट्रकने कारला ठोकर दिल्याने कारचे मोठे नुकसान; सुदैवाने कारचालक वाचला

  तेऊरवाडी (एस. के. पाटील) :  अपघातांसाठी प्रसिद्ध असणाऱ्या लाकूरवाडी घाटात महागाव (ता गडहिंग्लज) नजीकच्या मोठ्या वळणावर ट्रक (नं. MH09CV2786) याने नेक्सॉन कार (नं. MH09 FV4883) ला समोरून धडक दिल्याने कारचे मोठे नुकसान झाले. सुदैवाने समोरील एअर बॅग खुलल्याने कारचालक उदय कोकितकर (नरेवाडी, ता. गडहिंग्लज) या अपघातातून बचावले. या अपघातात …

Read More »

दोडामार्ग-कोल्हापूर बसला हुनगीनहाळ नजिक अपघात, दोन प्रवासी जखमी

चालकाच्या प्रसंगावधानामुळे इतर प्रवासी सुखरूप तेऊरवाडी (एस.के. पाटील) : चंदगड -गडहिंग्लज या राज्यमार्गावरहुन नगीनहाळ (ता. गडहिंग्लज) गावाजवळील ओढ्यानजीक रस्त्याकडेला पडलेल्या झाडाला चुकविताना महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळाच्या कोल्हापूर आगारातील दोडामार्ग-कोल्हापूर (बस क्रमांक एमएच -१४, बीटी,०५०९) या बसला अपघात झाला. बस झाडावर आदळल्याने दोन प्रवासी जखमी झाले. आज (शनिवारी दि. ०६ ऑगस्ट …

Read More »

संकेश्वर पतंजली योग समितीतर्फे जडीबुटी दिन साजरा

  संकेश्वर (महंमद मोमीन) : संकेश्वर पतंजली योग समितीच्या वतीने येथील महालक्ष्मी समुदाय भवनमध्ये जडीबुटी दिन साजरा करण्यात आला. जडीबुटीचे जनक पूज्य आचार्य बाळकृष्ण यांचा जन्मदिवस जडीबुटी दिन म्हणून मोठ्या उत्साही वातावरणात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाची सुरुवात तुळशीच्या रोपाला जलार्पणांने करण्यात आली. कार्यक्रमाला प्रमुख पाहुण्या म्हणून सुरेखा शेंडगे उपस्थित होत्या. …

Read More »

मोहरम शांततेने पार पाडा : गणपती कोगनोळी

संकेश्वर (महंमद मोमीन) :  संकेश्वरातील मोहरम हिंदू- मुस्लिम ऐक्याचे प्रतिक समजले जाते. त्यामुळे मोहरम सणात सर्व धर्मांचे लोक सहभागी होतात. मोहरम शांततामय आणि भक्तीमय वातावरणात साजरा करण्याचे आवाहन संकेश्वर पोलिस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक गणपती कोगनोळी यांनी केले. संकेश्वर पोलिस ठाण्यात आज सायंकाळी मोहरम निमित्त शांतता सभेचे आयोजन करण्यात आले होते. …

Read More »

संकेश्वर डाकघर झालं दिडशे वर्षांचं : पवन कत्ती

  संकेश्वर (महंमद मोमीन) : संकेश्वरातील डाकघर (पोस्ट ऑफीस)ने दिडशे वर्षे उत्तम सेवा बजावून जनमानसातील आपली विश्वासार्हता कायम केल्याचे युवानेते पवन कत्ती यांनी सांगितले. गोकाक विभागिय कार्यालयाच्या संकेश्वर पोस्ट ऑफीसतर्फे आयोजित “संकेश्वर मुखिया डाकघरच्या विशेष लखोटा प्रकाशन सोहळ्यात ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. संकेश्वर नेसरी गार्डन डिलक्स येथे कार्यक्रमाचे …

Read More »