Wednesday , December 17 2025
Breaking News

Classic Layout

शिवसेनेने अशी आव्हाने पायदळी तुडवत भगवा रोवलाय : उद्धव ठाकरे

  मुंबई : शिवसेनेला संपवण्याचे खूप प्रयत्न सुरु आहेत. पण त्यांना कल्पना नाही की शिवसेनेने अशी अनेक आव्हाने पायदळी तुडवत भगवा रोवलाय आहे, असे वक्तव्य शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केले आहे. ते पुढे म्हणाले, राजकारणात हार जीत होत असते पण आता संपवण्याची भाषा केली जात आहे, असेही उद्धव ठाकरे …

Read More »

निपाणीतील ज्योतिषाचार्य सलीमभाई मुल्ला यांचा सत्कार

  निपाणी : खगोल शास्त्र व गणिता वर आधारित असलेल्या ज्योतिष शास्त्राचा अभ्यास करून एक मुस्लिम धर्मिय सलीमजी मुल्ला हे ज्योतिष शास्त्राच्या आधारे लोकांना मार्गदर्शन करून त्याचा आत्मविश्वास दृढ करतात. कोणती अपेक्षा न ठेवता साध्या सोप्या पद्धतीने समस्या निराकरण करण्यासाठी मार्गदर्शन करतात. हे त्याचे कार्य कौतुकास्पद आहे. म्हणून च श्रीमंतराजमाता …

Read More »

सामान्य जनतेच्या पाठिंब्यामुळेच काँग्रेस सत्तेवर येणार : के. सी. वेणुगोपाल

  हुबळी : राज्यातील भाजप सरकार लूट करण्यात व्यस्त आहे, हे भाजपनेच सिद्ध केले आहे. हि बाब लक्षात घेऊन काँग्रेसला सर्वसामान्य जनतेचा वाढता पाठिंबा आहे. या पाठिंब्यामुळेच आगामी निवडणुकीत काँग्रेस बहुमताने सत्तेवर येईल, असा विश्वास काँग्रेस सरचिटणीस के. सी. वेणुगोपाल यांनी व्यक्त केला. यावेळी बोलताना ते म्हणाले, केंद्र आणि राज्य …

Read More »

ठिय्या आंदोलनाच्या माध्यमातून प्रशासनाला जागे करू; दीपक दळवी

बेळगाव : भाषिक अल्पसंख्याक कायद्यानुसार मराठी कागदपत्रे मराठीतून मिळावीत या मागणीसाठी 8 ऑगस्ट रोजी ठिय्या आंदोलनाच्या माध्यमातून मराठी भाषिकांची जिद्द आणि मराठी बाणा दाखवून द्यावा, असे आवाहन शहर महाराष्ट्र एकीकरण समितीचे अध्यक्ष दीपक दळवी यांनी केले. शहर समितीच्या बैठकीत ते बोलत होते. समितीची चळवळ ही कार्यकर्त्यांनी सुरू ठेवली आहे. मराठी …

Read More »

महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावरील सुनावणी उद्या

  नवी दिल्ली : राज्यात सत्तासंघर्ष सुरु असताना सुप्रीम कोर्टा काय निकाल देणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. आज सुप्रीम कोर्टात सुनावणी पार पडली असता उद्धव ठाकरे आणि शिंदे गटाकडून युक्तिवाद करण्यात आला. उद्धव ठाकरेंच्या वकिलांकडून वारंवार बंडखोरांकडे दुसर्‍या पक्षात विलीन होण्याशिवाय पर्याय नसल्याचा मुद्दा मांडण्यात आला. तर शिंदे गटाने …

Read More »

कॉ. गोविंद पानसरे हत्या प्रकरणाचा तपास एटीएसकडे

  मुंबई : कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्या हत्येचा तपास मुंबई उच्च न्यायालयाने राज्य एसआयटीकडून महाराष्ट्र एटीएसकडे हस्तांतरित केला आहे. खर्‍या सूत्रधारांपर्यंत पोहोचण्यासाठी आतापर्यंत कोणतेही प्रयत्न झाले नसल्याचा आरोप करत पानसरे यांच्या कुटुंबियांनी ही मागणी केली होती. महाराष्ट्र एसआयटीकडून या प्रकरणाचा तपास केला जात आहे. मात्र पानसरे कुटुंबिय त्याबाबत समाधानी नाहीत. …

Read More »

निपाणीत नागोबा मंदिराची यात्रा साजरी

  मूर्ती स्थापनेसह विविध कार्यक्रम : दर्शनासाठी दिवसभर भाविकांची गर्दी निपाणी (वार्ता) : शहर परिसरात नाग पंचमी विविध धार्मिक कार्यक्रमाने उत्साहात साजरी झाली. पूजा, झोपाळा खेळणे, नागपंचमीची गाणी, महाप्रसाद अशा विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. येथे नागोबा गल्लीतील श्रीमंत सिद्धूजीराजे निपाणकर सरकार यांनी स्थापन केलेल्या नागोबा मंदिरामध्ये नागपंचमी उत्साहात …

Read More »

पीर पंजाच्या स्थापनेने निपाणी दर्गामध्ये मोहरम सणास प्रारंभ

  निपाणी (वार्ता) : येथील सर्व धर्मियांचे श्रध्दास्थान श्री संत बाबा महाराज चव्हाण प्रस्थापित श्री महानवलिया पिराने पीर दस्तगीर साहेब दर्गाह येथे पवित्र मोहरम मासानिमित्त पीर पंजांची स्थापना करण्याचा विधी पार पडला. यावेळी बेबी फातिमा आणि हसन हुसेन या पीर बाबांचे पंजे आणून दर्गामध्ये चव्हाण वारस यांच्या उपस्थितीत व इम्तियाज …

Read More »

शिरगुप्पीच्या तरुणाचे दहशतवादी कनेक्शन!

  बेळगाव : 15 ऑगस्ट स्वातंत्र्यदिनी समाजविघातक कृत्यांमध्ये सामाजिक शांतता बिघडण्याच्या प्रयत्नात असल्याच्या संशयावरून देशभरात राष्ट्रीय तपास यंत्रणेकडून छापेमारी सुरू आहे. केंद्रीय व राज्य गुप्तचर विभागही याचा तपास सुरू करीत आहे. याप्रकरणी दिल्लीतील रेहान अहमद सिद्दिकी याला अटक केली असता त्याच्या संपर्कात शिरगुप्पी (ता. कागवाड, जि.बेळगाव) येथील तौसिफ दुंडी हा …

Read More »

ट्रकच्या धडकेत विद्यार्थ्याचा जागीच मृत्यू

बेळगाव : अवघ्या दोनच दिवसांपूर्वी जुन्या भाजी मार्केट जवळील पेट्रोल पंपाजवळ सकाळी सकाळी ट्रकच्या धडकेत एका विद्यार्थिनीचा मृत्यू झाला होता. त्या पाठोपाठ आज सकाळी फिश मार्केटजवळ कॅम्प येथे ट्रकच्या धडकेत इस्लामिया उर्दू शाळेचा विद्यार्थी अरहान बेपारी याचा जागीच मृत्यू झाला. बहीण अतिका ​​आणि आयुष आजरेकर हा ज्योती सेंट्रल स्कूलचा विद्यार्थी …

Read More »