Thursday , December 18 2025
Breaking News

Classic Layout

शेतकर्‍यांवरील अन्याय खपवून घेणार नाही

  राजू पोवार यांचा इशारा : विधानसभेवर रयत संघटनेचा मोर्चा निपाणी (वार्ता) : देशातील नेते मंडळी व राजकारणांना निवडून देण्याचे काम सर्वसामान्य नागरिक आणि शेतकर्‍यांनी केले आहे. पण निवडून गेल्यानंतर शेतकरी विरोधी धोरण अवलंबून त्यांना चिरडण्याचे काम सुरू आहे. त्यांच्या समस्या ऐकून घेण्यासाठी राजकीय नेते मंडळींना वेळ कमी पडत आहे. …

Read More »

भाजप ग्रामीण मंडळतर्फे सात हजार रोपांचे वितरण

  बेळगाव : आज दि. 24/7/2022 रोजी भारतीय जनता पार्टी बेळगाव ग्रामीणच्या वतीने सालाबादप्रमाणे सात हजार रोपांचे वितरण करण्यात आले. याप्रसंगी बोलताना भाजपा बेळगाव ग्रामीण अध्यक्ष श्री. धनंजय जाधव म्हणाले, काही वर्षांपूर्वी सरकारी जागेमध्ये आम्ही वृक्षारोपण करत होतो. पण त्याची जोपासणा होत नसल्याने बरीच झाडे नाश होत होती. पण गेल्या …

Read More »

जांबोटीत संगीताचार्य विष्णू सडेकरांचा गुरुवंदनानिमित्त सत्कार

  खानापूर (प्रतिनिधी) : जांबोटी (ता. खानापूर) येथील संगीताचार्य विष्णू सडेकर यांचा गुरुपोर्णिमेचे औचित्य साधून मणतुर्गे गावच्या बाल शिवाजी भजनी मंडळाच्यावतीने शाल, श्रीफळ, पानविडा देऊन सत्कार करण्यात आला आणि त्यांच्या चरणाशी संगीत भजनाची बाल शिवाजी भजनी मंडळाच्या वतीने गुरूवंदना अर्पण करण्यात आली. त्याचबरोबर गुरुजींना नेहमीच तबल्याची साथसंगत करत आलेले त्यांचे …

Read More »

तीन तासाच्या परिश्रमानंतर मांजराची सुटका!

  बेळगाव : बेळगावमधील खडेबाजार येथील एका तीन मजली इमारतीच्या बाल्कनीतून जीव धोक्यात आलेल्या मांजराची सुटका करण्यात अग्निशमन दलाच्या जवानांना यश आले आहे. सुमारे तीन तासांच्या परिश्रमनंतर मांजराची यशस्वी सुटका केल्यानंतर नागरिकांनी टाळ्या वाजवून अग्निशमन दलाचे अभिनंदन केले. प्रेमाने पाळलेले पाळीव मांजराचे एक पिल्लू बेळगावच्या खडेबाजार येथील तीन मजली इमारतीच्या …

Read More »

यंदाही शांतिनिकेतन सीबीएसई दहावीचा निकाल 100 टक्के

  खानापूर : तोपिनकट्टी (ता. खानापूर) श्रीमहालक्ष्मी ग्रुप संचालित शांतिनिकेतन पब्लिक स्कूलच्या सीबीएसई दहावीचा निकाल यंदाही 100 टक्के लागला आहे. सलग आठव्या वर्षाही 100 टक्के निकालाची परंपरा कायम ठेवण्यात आली आहे. नुकताच जाहीर झालेल्या सीबीएसई दहावीच्या परीक्षेत शांतिनिकेतन पब्लिक स्कूलचे 139 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. सलग आठ वर्षे शांतिनिकेतन पब्लिक …

Read More »

कोप्पळजवळ भीषण अपघात; एकाच कुटुंबातील 5 जणांचा मृत्यू

  कोप्पळ : कोप्पळ जिल्ह्यातील यालबुर्गा तालुक्यातील भानापुर गावात अज्ञात वाहनाने स्कॉर्पिओ वाहनाला धडक दिल्याने झालेल्या भीषण अपघातात एकाच कुटुंबातील पाच जणांचा मृत्यू झाला. देवप्पा कोप्पड (62), त्यांची सून गिरिजम्मा कोप्पड (45), शांतम्मा (35), पर्वतम्मा (32), कस्तुरम्मा (20) यांचा मृत्यू झाला. हे सर्व बिन्नळ गावातील एकाच कुटुंबातील आहेत. स्कॉर्पिओमधून एकूण …

Read More »

हुबळीजवळ अग्निकांडात चौघे जळाले?

  हुबळी : भीषण अग्निकांडात चौघे होरपळून मरण पावल्याची अंगावर काटा आणणारी घटना घडली आहे. हुबळीबाहेरील तारिहाळ येथील एका खासगी कारखान्यात ही दुर्घटना घडली आहे. हुबळी ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली आहे. यात चारहून अधिक कामगारांचा होरपळून मृत्यू झाल्याची शंका व्यक्त करण्यात येत आहे. ही आग कशी लागली? …

Read More »

मिस्टर फडणवीस, शिवसेनेचा लाऊडस्पीकर तुम्हाला बधिर केल्याशिवाय राहणार नाही, संजय राऊतांचा हल्लाबोल

  नवी दिल्ली : आमचा लाऊडस्पीकर हा जनतेचा बुलंद आवाज आहे. कोणाला कितीही पिपाण्या वाजवू द्या. शिवसेनेचा लाऊडस्पीकर 56 वर्ष झालं सुरु आहे. महाराष्ट्र आणि देश निष्ठेनं शिवसेनेच्या मागे उभा असल्याचे वक्तव्य शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केलं. मिस्टर फडणवीस, शिवसेनेचा लाऊडस्पीकर तुम्हाला बधिर केल्याशिवाय राहणार नाही, असं म्हणत राऊतांनी …

Read More »

मंकीपॉक्स ही जागतिक आरोग्य आणीबाणी, डब्ल्यूएचओची मोठी घोषणा

जीनिव्हा : कोरोनानंतर जगभरात चिंतेचा विषय ठरलेला मंकीपॉक्स हा साथरोग प्रकारातील आजार जागतिक आरोग्य संघटनेकडून (डब्ल्यूएचओ) जागतिक आरोग्य आणीबाणी म्हणून घोषित करण्यात आला आहे. सध्या जगभरात मंकीपॉक्सच्या रुग्णांमध्ये वेगाने वाढ होत आहे. या पार्श्‍वभूमीवर डब्ल्यूएचओच्या आपत्कालीन समितीची दुसरी बैठक नुकतीच पार पडली. त्यात यावर विस्तृत चर्चा झाली होती. अखेर सार्वजनिक …

Read More »

नीरज चोप्राने पुन्हा इतिहास रचला! जागतिक ऍथलेटिक्स स्पर्धेत रौप्यपदक

  भारताचा स्टार भालाफेकपटू नीरज चोप्राने पुन्हा एकदा इतिहास रचला आहे. जागतिक ऍथलेटिक्स विजेतेपद स्पर्धेत नीरजनं भारताचा कित्येक वर्षांचा दुष्काळ संपवत रौप्यपदक पटकावलं आहे. त्याला या स्पर्धेत सुवर्णवेध घेता आला नाही मात्र त्यानं कडवी झुंज देत रौप्यपदक मिळवलं. नीरज चोप्राचा पहिला थ्रो फाऊल ठरला तर दुसऱ्या थ्रोमध्ये वापसी करताना त्यानं …

Read More »