Wednesday , December 17 2025
Breaking News

Classic Layout

मोदी सरकारची देशात हुकूमशाही : एम. बी. पाटील

  बेळगाव : पंतप्रधान नरेंद्र मोदी आयटी, ईडी, सीबीआय या तपास यंत्रणांच्या माध्यमातून विरोधकांना त्रास देत आहेत. देशातील मोदी सरकार हुकूमशाही राबवत आहे, असा आरोप काँग्रेस प्रचार समितीचे अध्यक्ष एम बी पाटील यांनी केला. बेळगाव शहरातील काँग्रेस भवन येथे आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी भाजप सरकारवर जोरदार …

Read More »

येडूर परिसरात बिबट्याचा वावर असल्याचा संशय

  बेळगाव : चिक्कोडी तालुक्यातील येडूर गावात बिबट्या आल्याचा संशय ग्रामस्थांनी व्यक्त केला आहे. त्यावरून वनविभागाचे अधिकारी शोध घेत आहेत. येडूरसह आजूबाजूच्या गावात गेल्या आठ दिवसांपासून बिबट्याने वास्तव्य केल्याच्या वृत्ताने स्थानिक ग्रामस्थांत भीतीचे वातावरण पसरले आहे. सध्या या घटनेमुळे चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. येडूर गावातील जाधव यांच्या शेतात बिबट्या …

Read More »

जेवढा मोठा संघर्ष तितके मोठे यश : ज्येष्ठ विचारवंत आर. वाय. पाटील

  जे. के. फाऊंडेशन, दमशि मंडळ बी. के. कॉलेज माजी विद्यार्थी संघटना, प्रगतिशील- एल्गार परिषदतर्फे मार्गदर्शन शिबिर, व्याख्यानाचे आयोजन बेळगांव : जीवनात जेवढा मोठा संघर्ष तितके मोठे यश संपादन करता येते किंवा आपण मिळवू शकतो हे प्रत्येकाने समजून घ्यायला हवे. अनेक संकटांना मात करून पुढे जाण्यासाठी पुढाकार घेतला पाहिजे. स्पर्धात्मक …

Read More »

महिला कुस्तीपटू स्मिता पाटील यांचे एनआयएस परीक्षेत यश

बेळगाव : बेळगावची एकलव्य पुरस्कार व राष्ट्रीय पदकविजेत्या महिला कुस्तीपटू स्मिता भावकाणा पाटील या पटियाळा येथे घेण्यात आलेल्या एनआयएस (NIS) डिप्लोमा कोर्स उत्तीर्ण झाल्या असून त्यांना मान्यवरांच्या हस्ते एनआयएस पदवी प्रमाणपत्र बहाल करण्यात आले. कंग्राळी खुर्दच्या महिला मल्ल स्मिता पाटील यांनी शालेय जीवनापासून कुस्तीचा सराव करून अनेक स्पर्धांमध्ये यश संपादन …

Read More »

खानापूर – रामनगर रस्त्याचे काम लवकरच करण्याचे आश्वासन

खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीचे राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण कार्यालयास निवेदन खानापूर : खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीच्या वतीने आज धारवाड येथील राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण कार्यालयातील प्रकल्प संचालक यांना निवेदन देण्यात आले.  खानापूर ते रामनगर पर्यंत हा महामार्ग निर्माण करण्याचे काम काही वर्षापासून या-ना त्या कारणाने रखडलेला आहे. या महामार्गावर अवलंबून …

Read More »

बेळगावात जिल्हाधिकारी कार्यालयावर काँग्रेसचा निषेध मोर्चा

बेळगाव : राजकीय हेतूने आणि द्वेषातून तपास यंत्रणांचा गैरवापर करणार्‍या केंद्र सरकारच्या कृतीचा निषेध करत आज बेळगावात काँग्रेस पक्षाच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर निषेध मोर्चा काढून निदर्शने करण्यात आली. आज बेळगाव येथे काँग्रेस पक्षाच्या वतीने तपास यंत्रणांचा गैरवापर करणार्‍या भाजप सरकारच्या कृतीचा निषेध करण्यासाठी बेळगाव शहर, ग्रामीण आणि जिल्हा काँग्रेस कमिटीच्या …

Read More »

हुपरी नगरपालिकेत तृतीयपंथी ’देव तात्या’ बनले स्वीकृत नगरसेवक; राज्यातील पहिलीच निवड

  हुपरी : हुपरी नगरपालिकेच्या स्वीकृत नगरसेवक पदावर आज ‘देवतात्या’ म्हणून प्रसिध्द असणार्‍या तातोबा बाबूराव हांडे यांची निवड झाली. एका तृतीयपंथीयाला या पदावर संधी देण्याची हा राज्यातील पहिलीची निवड आहे. ताराराणी आघाडीने त्यांना संधी दिली आहे. आज हुपरी नगरपालिका आवारात या निवडीच्या निमित्ताने उत्साहाचे वातावरण होते, तर या ठिकाणी मोठी …

Read More »

13 ते 15 ऑगस्ट दरम्यान घरोघरी तिरंगा फडकवा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे देशवासियांना आवाहन

  नवी दिल्ली : केंद्र सरकारच्या हर घर तिरंगा मोहिमेच्या बळकटीकरणासाठी देशातील प्रत्येक नागरिकाने 13 ते 15 ऑगस्ट दरम्यान आपल्या घरावर तिरंगा ध्वज फडकवण्याचे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले आहे. या मोहिमेमुळे राष्ट्रध्वजाशी आपला संबंध अधिक दृढ होईल, असे म्हणत मोदींनी ट्वीट केले आहे. पहिल्या तिरंग्याचे छायाचित्र शेअर यावर्षी …

Read More »

आमचीच शिवसेना खरी : दीपक केसरकर

  मुंबई : तुम्ही कितीही यात्रा काढा, लोकांच्या मनात कितीही संभ्रम निर्माण करा. आमची शिवसेना खरी असल्याचा दावा शिंदे गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर यांनी केला आहे. केसरकर यांनी आज पत्रकार परिषद घेत म्हटलं की, आमची शिवसेना ही खरी शिवसेना आहे. एकनाथ शिंदे यांची बदनामी का सुरू आहे. ज्यांनी आमदारांची काळजी …

Read More »

कस्तुरीरंगन अहवालाविरोधात खानापूर तालुक्यातील सर्व पक्षीय नेत्यांनी एकत्रीत लढा उभारावा; मणतुर्गा ग्रामस्थांची मागणी

  खानापूर (प्रतिनिधी) : केंद्र सरकारने कस्तुरीरंगन अहवालाच्या अंमलबजावणीसाठी सुचना जारी केली असून 60 दिवसाची मुदत दिली आहे. याला तालुक्यातील विविध गावातून तसेच संघटनांतून विरोध करण्यात येत असून यासाठी तालुक्यातील सर्व पक्षीय नेत्यांनी एकत्रीत येऊन अभ्यासु जानकाराच्या सल्ल्यानुसार यावर चर्चा करून योग्य ती पावले उचलावी, अशी माहिती मणतुर्गा गावचे व …

Read More »