Wednesday , December 17 2025
Breaking News

Classic Layout

जीएसटी वाढ, विस्ताराचे मुख्यमंत्र्यांकडून समर्थन

  बेंगळुरू : केंद्र सरकारच्या जीएसटी वाढवण्याच्या निर्णयाचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी आज समर्थन केले. अनेक वस्तू जीएसटीच्या कक्षेत आणल्याचा आणि जीएसटी वाढविल्याचा भार ग्राहकांवर पडणार नाही असा दावाही त्यांनी केला. सोमवारी विधानसौधमध्ये राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीसाठी मतदानाचा हक्क मुख्यमंत्री बोम्मई यांनी बजावला. त्यानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना बोम्मई म्हणाले, जीएसटी वाढ आणि …

Read More »

केरळमध्ये मंकीपॉक्सचा दुसरा रुग्ण आढळला, 14 जिल्ह्यांमध्ये अलर्ट जारी

  तिरुअनंतपुरम : भारतात मंकीपॉक्सचा दुसरा रुग्ण सापडला असून केरळमधील कन्नूमरमध्ये 31 वर्षाच्या युवकाला त्याची लागण झाल्याचं समोर आलं आहे. हा व्यक्ती 13 जुलै रोजी दुबईहून भारतात परतला आहे. केरळमध्ये मंकीपॉक्स आजाराचा दुसरा रुग्ण सापल्याने आरोग्य यंत्रणा अधिक सतर्क झाली आहे. या रुग्णाला रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलं असून त्याची प्रकृत्ती …

Read More »

शिंदे गट स्वत:ची कार्यकारिणी करणार; बैठकीला 14 खासदार देखील उपस्थित

  मुंबई : शिवसेनेचे बंडखोरे नेते आणि राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आता पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना देण्याच्या तयारीत आहेत. एकनाथ शिंदे गट आता स्वत:ची कार्यकारिणी तयार करणार असल्याचे वृत्त आहे. विशेष म्हणजे शिंदे गटातील आमदारांच्या बैठकीत शिवसेनेच्या 14 खासदारांनी ऑनलाईन उपस्थिती दर्शवली आहे. त्यामुळे एकनाथ शिंदे गटाकडून शिवसेनेवर दावा …

Read More »

बाबा महेंद्रनाथ धाम मंदिरात चेंगराचेंगरी; 2 महिलांचा मृत्यू

  सिवान : बिहारमधील सिवान जिल्ह्यातील बाबा महेंद्रनाथ शिव मंदिरात झालेल्या चेंगराचेंगरीत दोन महिलांचा मृत्यू झाला. सोमवारी झालेल्या अपघातात इतर भाविक जखमी झाले आहेत. सध्या त्यांना रुग्णालयात दाखल केले आहे. या घटनेनंतर मंदिर परिसरात पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. लिलावती देवी (42, रा. हुसैनगंज ब्लॉकच्या प्रतापपूर गाव) व सुहागमती …

Read More »

भारताची एकदिवसीय क्रमवारीत तिसर्‍या स्थानावर भक्कम पकड

  नवी दिल्ली : भारतीय संघाने इंग्लंडविरुद्धची तीन एकदिवसीय सामन्यांची मालिका 2-1 अशी जिंकली आहे. या विजयासह भारताने अनेक विक्रम केले असून आयसीसी एकदिवसीय क्रमवारीत तिसर्‍या स्थानावर पकड भक्कम झाली आहे. चौथ्या क्रमांकावर असलेल्या पाकिस्तानसाठी भारताला मागे टाकणे कठीण असेल. पहिल्या एकदिवसीय सामन्यात इंग्लंडविरुद्ध 10 गडी राखून दणदणीत विजय मिळवून …

Read More »

मुख्यमंत्री शिंदे आज दिल्लीला जाणार!

  मुंबई : राज्यात गेल्या काही दिवसांपासून घडत असलेल्या नाट्यमय घडामोडींच्या केंद्रस्थानी दिल्ली असल्याचं सत्ता स्थापनेच्या वेळी लक्षात आलंच. त्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी बर्‍याचदा दिल्ली दौरा केला. आताही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे दिल्लीला जाणार आहे. एकनाथ शिंदे आज रात्री दिल्लीला जाणार आहेत. मंत्रिमंडळ विस्ताराविषयी चर्चा करण्यासाठी ते …

Read More »

अतिरिक्त शिक्षकांच्या बदलीसाठी कौन्सिलिंगचे वेळापत्रक लवकरच जाहीर

  बेळगाव : शिक्षण खात्याने राज्यात 15 हजार शिक्षक भरती करण्याचा निर्णय घेतला आहे. तत्पूर्वी शिक्षण खात्याने सरकारी प्राथमिक व माध्यमिक शाळांमध्ये विद्यार्थ्यांच्या संख्येनुसार किती शिक्षकांनाही गरज आहे याचे सर्वेक्षण करण्याचे काम हाती घेतले आहे. त्याचप्रमाणे अतिरिक्त शिक्षकांची माहिती जमा करण्यात आली असून अतिरिक्त शिक्षकांच्या बदलीसाठी कौन्सिलिंगचे वेळापत्रक लवकरच जाहीर …

Read More »

पावसाचा जोर ओसरल्याने कृष्णा आणि पंचगंगा नदीच्या पाणी पातळीत घट

  कोल्हापूर : कोल्हापूर, सांगली आणि सातारा जिल्ह्यातील घाट विभागात तसेच नद्यांच्या पाणलोट क्षेत्रात रविवारी पाऊस कमी झाल्याने कृष्णा आणि पंचगंगा नद्यांच्या पाणी पातळीत घट झाली आहे. पंचगंगा नदीची पाणीपातळी आज दुपारी 12 वाजेपर्यंत 36 फुट 5 इंचावर आहे. जिल्ह्यातील 48 बंधारे अजूनही पाण्याखाली आहेत. मात्र, सध्या कोणताही मोठा रस्ता …

Read More »

माजी मंत्री रामदास कदम यांचा शिवसेना नेतेपदाचा राजीनामा

मुंबई : माजी मंत्री रामदास कदम यांनी शिवसेना नेतेपदाचा राजीनामा दिला आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या कामकाजावर टीका करत त्यांनी नेतेपदाचा राजीनामा दिला. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी नेतेपदी माझी नियुक्ती केली होती. मात्र बाळासाहेब ठाकरे यांच्या निधनानंतर या पदाला काहीच अर्थ राहिला नाही, असं रामदास कदम म्हणाले. “माझ्यावर अनेकदा …

Read More »

प्रदूषणकारी एसबीओएफ खत कारखाना बंद करण्याची मागणी

  खानापूर : खानापूर तालुक्यातील नंजिनकोडल गावाजवळ असलेल्या साविओ बायो ऑरगॅनिक अँड फर्टिलायझर प्रायव्हेट लिमिटेड (एसबीओएफ) या खत कारखान्यामुळे मोठ्या प्रमाणात प्रदूषण होत असून नागरिकांच्या आरोग्याच्या समस्या वाढल्या आहेत. त्याकरिता हा कारखाना बंद करण्यात यावा आशा मागणीचे निवेदन नंजिनकोडल, दोड्डेबैल आणि सागरे ग्रामस्थांनी हलशी आणि नंजिनकोडल ग्राम पंचायतींना सादर केले. …

Read More »