Tuesday , December 16 2025
Breaking News

Classic Layout

कोगनोळी येथे विद्युत स्पर्शाने तीन शेळींचा मृत्यू

कोगनोळी : विद्युत पुरवठा करणाऱ्या खांबावरून तार तुटून खाली पडली होती. या पडलेल्या तारेला तीन शेळींचा स्पर्श होऊन मृत्यू झाल्याची घटना शुक्रवार तारीख 15 रोजी सायंकाळी पाचच्या सुमारास घडली. याबाबत घटनास्थळावरून अधिक माहिती अशी की, येथील हंचिनाळ रोडवर असणाऱ्या पीरमाळ येथे विद्युत पुरवठा करणाऱ्या खांबावरून तार तुटून खाली पडली होती. …

Read More »

कोगनोळी फाट्यावर अपघातात पादचाऱ्याचा मृत्यू

कोगनोळी : येथील राष्ट्रीय महामार्ग क्रमांक चारवर असणाऱ्या कोगनोळी फाट्यावर बसच्या धडकेत पदचाऱ्याचा मृत्यू झाल्याची घटना गुरुवार तारीख 15 रोजी सायंकाळी चारच्या सुमारास घडली. भानुदास श्रीपती विटे (वय 55) असे मयत झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. याबाबत घटनास्थळावरून व पोलिसांकडून मिळालेली अधिक माहिती अशी की, भानुदास विटे हे करनूर येथून कोगनोळी …

Read More »

त्रिसूत्रीचा अवलंब करून महिलांनी आपले आरोग्य टिकवावे

बेळगाव : दक्षिण महाराष्ट्र शिक्षण संचलित येथील भाऊराव काकतकर महाविद्यालयात स्त्रियांच्या समस्या व उपाय या विषयावर पॅथॉलॉजिस्ट डॉ. आसावरी संत यांचे व्याख्यान पार पडले. योग्य आहार, व्यायाम आणि योगासन या त्रिसूत्रीचा अवलंब करून महिलांनी आपले आरोग्य कशा पद्धतीने टिकवावे याबद्दल मार्गदर्शन केले. स्त्रियांना जाणवणाऱ्या अडचणी व आरोग्याच्या समस्या याबद्दल विचारण्यात …

Read More »

एकीकरण समिती नेत्यांकडून किरण पाटील यांचे अभिनंदन

  बेळगाव : मुतगा ग्रामपंचायत अध्यक्षपदी म. ए. समितीची सत्ता कायम राहिली असून महाराष्ट्र एकीकरण समितीचे कट्टर समर्थक किरण पाटील हे ग्रामपंचायत अध्यक्षपदीच्या निवडणुकीत विजयी झाले आहेत. यामुळे समितीच्या कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी करत मोठ्या उत्साहात किरण पाटील यांचे स्वागत केले. शिवाय समितीच्या कार्यकर्त्यांनी अभिनंदनाचा वर्षाव देखील केला. किरण पाटील विजयी होताच …

Read More »

मुतगा ग्रामपंचायत अध्यक्षपदी किरण पाटील

बेळगाव : मुतगा ग्रामपंचायत अध्यक्षपदी म. ए. समितीची सत्ता कायम राहिली असून महाराष्ट्र एकीकरण समितीचे कट्टर समर्थक किरण पाटील हे ग्रामपंचायत अध्यक्षपदीच्या निवडणुकीत विजयी झाले आहेत. मावळते अध्यक्ष भालचंद्र पाटील यांनी अडीच पैकी सव्वा वर्षाची अध्यक्षपदाची टर्म झाल्यानंतर राजीनामा दिला होता त्यानंतर ही निवडणूक झाली. आणखी सव्वा वर्षासाठी किरण पाटील …

Read More »

आमदार लक्ष्मी हेब्बाळकर श्रींच्या भेटीला..

संकेश्वर (महंमद मोमीन) : बेळगांव ग्रामीण मतक्षेत्राच्या आमदार लक्ष्मी हेब्बाळकर यांनी आज निडसोसी श्री दुरदुंडीश्वर सिध्द संस्थान मठाला भेट देऊन देवदर्शनासह मठाचे पंचम श्री शिवलिंगेश्वर महास्वामीजींची भेट घेऊन श्रींच्या आरोग्याची विचारपूस केली. आमदार लक्ष्मी हेब्बाळकर स्वामीजींबरोबर बोलताना म्हणाल्या, स्वामीजी तुमच्या इनोव्हाला अपघात झाल्याचे समजताच आपणाला धक्काच बसला. तुम्ही अपघातात सुखरुप …

Read More »

नगरसेवक आनंद चव्हाण यांचा स्तुत्य उपक्रम

बेळगाव : वॉर्ड क्रमांक 44 मधील नगरसेवक आनंद चव्हाण यांनी लेले ग्राउंड परिसरातील रस्त्यावरील धोकादायक खड्डे बुजविले. बेळगाव शहरात बऱ्याच ठिकाणी रस्ते खराब झाले आहेत. रस्त्यात खड्डे की खड्ड्यात रस्ता असे म्हणण्याची वेळ नागरिकांवर आलेली आहे. सध्या पावसाळा सुरू असल्यामुळे रस्त्यावरील खड्ड्यात पाणी साचले आहे त्यामुळे या रस्त्यावर छोटेमोठे अपघात …

Read More »

रोटरी -केएलई डायलेसिस सेंटरचे उद्घाटन

बेळगाव : येळ्ळूर रोड येथील केएलई सेंटीनारी चॅरिटेबल हॉस्पिटलमधील रोटरी क्लब ऑफ बेळगाव पुरस्कृत नूतन डायलेसिस सेंटरचा उद्घाटन समारंभ काल गुरुवारी उत्साहात पार पडला. सदर समारंभास प्रमुख पाहुणे म्हणून केएलई सोसायटीचे अध्यक्ष डॉ. प्रभाकर कोरे उपस्थित होते. त्यांच्या हस्ते नामफलकाचे अनावरण करून नव्या डायलेसिस सेंटरचे उद्घाटन करण्यात आले. याप्रसंगी सन्माननीय …

Read More »

हिरण्यकेशीला आता “नो महापूर”…

  संकेश्वर (महंमद मोमीन) : संकेश्वर हिरण्यकेशी नदीवरील जुना गोटूर बंधारा हटविणेचे कार्य झाल्यामुळे हिरण्यकेशी नदीतील पाण्याचा प्रवाह गतीने पुढे सरकताना दिसतो आहे. त्यामुळे महापुराचे संकट जवळजवळ टळलेले दिसत आहे. जुना गोटूर बंधारा हटावसाठी भारतीय किसान संघ गडहिंग्लजने शर्थीचे प्रयत्न केले. याकामी कर्नाटक राज्याचे वन आहार व नागरी पुरवठा मंत्री …

Read More »

कृष्णा नदी काठावरील गावांचे आमदारांकडून निरीक्षण

कागवाड : कागवाड मतदारसंघांतर्गत येणाऱ्या कुसनाळ आणि मोळवाड गावांना कागवाडचे आमदार व माजी मंत्री श्रीमंत (तात्या) पाटील यांनी भेट देऊन वाढत्या पाण्याची पाहणी केली कुसनाळ ग्रामपंचायत कार्यालयात त्यांनी जनतेच्या समस्या ऐकून घेतल्या व त्यांच्या समस्यांना योग्य उत्तरे दिली. पूर आल्यास गावकऱ्यांना निवारा केंद्रात नेण्यासाठी बोटीची व्यवस्था करण्याची विनंती गावातील नेत्यांनी …

Read More »