Tuesday , December 16 2025
Breaking News

Classic Layout

अंगणवाडी सेविकांचे खासदारांच्या घर-कार्यालयासमोर निदर्शने

बेळगाव : बेळगाव जिल्ह्यातील विविध तालुक्यांतील अंगणवाडी सेविकांनी आज आपल्या विविध मागण्या पूर्ण कराव्यात या मागणीसाठी खासदारांनी आवाज उठवून केंद्र सरकारकडे आपले प्रश्न मांडण्यासाठी कर्नाटक राज्य अंगणवाडी कर्मचारी संघटनेच्या वतीने खासदारांना निवेदन दिले. जिल्ह्यातील सर्व तालुक्यांतील अंगणवाडी सेविकांनी आपल्या विविध मागण्या पूर्ण कराव्यात या मागणीसाठी आज बेळगाव येथे आंदोलन केले. …

Read More »

कोगनोळी तिहेरी अपघातात वाहनांचे नुकसान

कोगनोळी : येथील राष्ट्रीय महामार्ग क्रमांक चारवर असणाऱ्या आरटीओ ऑफिस जवळ तिहेरी अपघातात वाहनांचे नुकसान झाल्याची घटना सोमवार तारीख अकरा रोजी सायंकाळी पाच वाजता घडली. याबाबत घटनास्थळावरून मिळालेली अधिक माहिती अशी की,  बेळगावहून कोल्हापूरकडे जात असणाऱ्या आयशर ट्रकने राष्ट्रीय महामार्ग क्रमांक चारवर असणाऱ्या आरटीओ ऑफिस येथे अचानक ब्रेक मारल्याने बेळगावहून …

Read More »

कागिनेले येथे बुधवारी महासंस्थान गुरुवंदना कार्यक्रम

समाज बांधवांनी उपस्थित रहावे: लक्ष्मण चिंगळे यांचे आवाहन निपाणी (वार्ता) : कागिनेले महासंस्थान, कनकगुरुपिठाचे प्रथम जगत्गुरु बिरेंद्र केशव तारकानंदपुरी महास्वामीजी यांचे १६ वे पुण्यस्मरण व गुरुपोर्णिमेनिमित्त गुरुवंदना कार्यक्रम बुधवारी (१३) सकाळी १०.३० वाजता संपन्न होणार आहे. यावर्षी बेळगांव जिल्हा धनगर समाज बांधवाकडून या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. या कार्यक्रमासाठी पावनसानिध्य …

Read More »

ग्रीन कॉरिडॉरने हृदय प्रत्यारोपणासाठी आणले बेळगावात

बेळगाव : एका अपघातामुळे धारवाड येथील एसडीएम हॉस्पिटल आणि मेडिकल रिसर्च सेंटरमध्ये जीवन–मृत्यूच्या संघर्षात झुंजणाऱ्या १५ वर्षीय मुलीने अवयवदान करून ४ जणांचे प्राण वाचवून समाजासमोर आदर्श ठेवला आहे. अपघातात मेंदूला इजा झाल्याने धारवाडच्या रुग्णालयात दाखल झालेल्या १५ वर्षांच्या मुलीच्या हृदयाचे बेळगावातील केएलई डॉ. प्रभाकर कोरे रुग्णालयात दाखल एका रुग्णावर प्रत्यारोपणाचे …

Read More »

गोमतेची हत्या रोखा 

तहसीलदारांना निवेदन : हिंदुत्ववादी संघटनांची मागणी निपाणी : शहर व ग्रामीण भागात हिंदू धर्मियांचे श्रद्धेचे प्रतीक असलेल्या गोमातेची हत्या रोखण्यात यावी. यासाठी हिंदुत्ववादी युवकांनी तहसीलदार डॉ. मोहन भस्मे यांना निवेदन दिले. यावेळी समाधी मठाचे मठाधिपती प्राणलिंग स्वामी यांची प्रमुख उपस्थिती होती. निवेदनामधील माहिती अशी, काही धर्मांध लोक हिंदू धर्मियांसाठी श्रद्धेच …

Read More »

शेतकरी हुतात्मा दिनास उपस्थित राहावे

राजू पोवार : धारवाडमध्ये संघटनेची कार्यकारिणी बैठक निपाणी (वार्ता) : सरकारच्या तकलादू धोरणामुळे शेतकरी दिवसेंदिवस अडचणीतच सापडत आहे. अतिवृष्टी आणि महापुरामुळे पिकांचे दरवर्षी नुकसान होत आहे. पण सर्वे मध्ये पक्षपातीपणा केला जात असल्याने अनेक शेतकरी नुकसान भरपाई पासून वंचित आहेत. परिणामी शेतकऱ्यावर कर्जाचा डोंगर वाढत चालला असून शेतकऱ्यांच्या न्याय्य हक्कासाठी …

Read More »

नामदेव मंदिरात एकादशी साजरी

निपाणी (वार्ता) : येथील माऊली फाउंडेशनच्या वतीने आषाढी एकादशी निमित्त नामदेव मंदिरात सोमवारी(ता.११)  द्वादशी दिवशी विठ्ठल रुक्मिणीची आरती करून महाप्रसाद वाटप करण्यात आला. श्रीमंत दादाराजे देसाई निपाणीकर सरकार व समराजलक्ष्मी राजे निपाणीकर सरकार यांच्या हस्ते आरती करण्यात आली. यावेळी माऊली फाउंडेशनचे अध्यक्ष सुनील राऊत यांनी स्वागत केले. कार्यक्रमास रवी गुळगुळे, …

Read More »

…तर पालिकेसमोर कचरा टाकू : नगरसेविका वाणी जोशी यांचा इशारा

  बेळगाव : कुंदानगरी बेळगावात कचरा विल्हेवाटीची समस्या मोठी डोकेदुखी बनली आहे. खुद्द नगरसेवकांनीच मनपाच्या अधिकाऱ्यांविरोधात संताप व्यक्त केला आहे.होय, महापालिकेच्या प्रभागातील कचरा उचलण्यास होत असलेल्या दिरंगाईबाबत नगरसेवकांनी तक्रारी केल्या आहेत. दर चार दिवसांनी घरोघरी कचरा नेणे टाळावे आणि तो दररोज किंवा दुसऱ्या दिवशी उचलावा, अशी नगरसेवकांची मागणी आहे. पण …

Read More »

पंढरपूर अपघातातील मृतांवर अंत्यसंस्कार; दिव्यांअभावी मोबाईल टॉर्चमध्ये अंत्यविधी

बेळगाव : पंढरपूरला जाताना रस्ता अपघातात मृत्युमुखी पडलेले बेळगावचे फ्रीलान्स छायाचित्रकार राजू शिंदोळकर यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. स्मशानात दिव्यांअभावी मोबाईल टॉर्चच्या प्रकाशामध्ये अंत्यसंस्कार करावे लागले. राजू संभाजी शिंदोळकर आणि परशुराम संभाजी झंगरुचे हे शनिवारी सायंकाळी एकादशी निमित विठ्ठल रुक्मिणीच्या दर्शनासाठी कारमधून बेळगावहून निघाले असताना पंढरपूर-सांगोला मार्गावर कासेगाव फाट्यावर कार उलटून …

Read More »

बेळगाव जिल्ह्यात सध्या पुराचा धोका नाही : मंत्री गोविंद कारजोळ

बेळगाव : बेळगाव जिल्ह्यात होणार पाऊस हा बहुतांशी लोकांना त्रासदायक ठरतो. मात्र जिल्ह्यात सध्या पुराचा धोका नाही. पूर व्यवस्थापनासाठी आवश्यक उपाययोजनाही केल्या आहेत असे बेळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री गोविंद कारजोळ यांनी सांगितले. बेळगाव जिल्ह्यातील पूरस्थितीबाबत बोलताना मंत्री कारजोळ म्हणाले की, कोयना धरणात येणाऱ्या पाण्याचे प्रमाण खूपच कमी आहे. दोन दिवसांपूर्वी आम्हाला …

Read More »