Tuesday , December 16 2025
Breaking News

Classic Layout

बेळगाव जिल्ह्यात 17 लाख रोप लागवडीचे उद्दिष्ट

बेळगाव : शासनाच्या कोटीवृक्ष अभियान अंतर्गत जिल्हा पंचायत फलोत्पादन खाते, वन खाते, सामाजिक वनीकरण खात्याच्या माध्यमातून पुढील पाच वर्षात जिल्ह्यात एक कोटी वृक्षारोपण केले जाणार आहेत. याचाच एक भाग म्हणून यावर्षी 17 लाख 2 हजार रोपे लावण्यात येणार आहेत. विविध सरकारी कार्यालयाचे आवार, सरकारी शाळा, जिल्ह्यातील एपीएमसी आवार, स्मशानभूमी, जंगल …

Read More »

निडसोसी श्रींच्या आरोग्याची महास्वामीजींकडून विचारपूस

संकेश्वर (महंमद मोमीन) : निडसोसी मठाचे पंचम श्री शिवलिंगेश्वर महास्वामीजी काल रस्ता अपघातात सुखरुप बचावले. श्रींच्या आरोग्याचे विचारपूस करण्यासाठी आज श्रीशैल जगद्गुरू, संकेश्वर श्री शंकराचार्य संस्थान मठाचे श्री सच्चिदानंद अभिनव विद्यानू्सिंह भारती महास्वामीजी, मनकवाडचे श्री सिध्दरामेश्वर महास्वामीजी, इलकलचे श्री महांत स्वामीजी, श्री शेगुणशी स्वामीजी, तम्मणहाळी हावेरीचे स्वामीजी, हुक्केरी हिरेमठचे श्री …

Read More »

खनदाळ येथे आषाढीला श्रीसंत सद्गुरू बाळूमामा धार्मिक उत्सव

संकेश्वर (महंमद मोमीन) : खनदाळ तालुका गडहिंग्लज येथील श्रीसंत सद्गुरू बाळूमामा मंदिरात आषाढीला विविध धार्मिक कार्यक्रमांंचै आयोजन करण्यात आल्याची माहिती देवस्थान विश्वस्त कमिटीच्या पदाधिकाऱ्यांनी पत्रकारांशी बोलताना दिली. येत्या रविवारी १० जुलै २०२२ रोजी आषाढी एकादशीला निलजी ते खनदाळ श्रीसंत सद्गुरू बाळूमामा मंदिरापर्यंत दिंडी सोहळा संपन्न होणार आहे. सायंकाळी प्रवचन, पूजा, …

Read More »

मराठा सेवा संघातर्फे मराठा युवा उद्योजक मेळावा संपन्न

बेळगाव : मराठा समाजाच्या युवकांनी नोकरीच्या मागे न लागता स्वतंत्र उद्योजक बनावे. यासाठी मराठा उद्योजकाना एकत्र करून युवकांच्या अडचणी व शंका दूर करण्यासाठी मराठा सेवा संघ बेळगाव यांच्या वतीने दि. 3 जुलै रोजी संभाजी नगर वडगाव येथे उद्योजक मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. मराठा सभागृहात आयोजित मेळाव्यास चेंबर ऑफ कॉमर्स …

Read More »

शिंदे-फडणवीस सरकारमध्ये महत्त्वाची खाती भाजपकडे

मुंबई : राज्यात युतीचं सरकार स्थापन झाल्यावर खातेवाटपाकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना भाजपाची साथ मिळाल्यानंतर आता शिंदेसेनेला महत्त्वाची खाती मिळणार असा अंदाज बंडखोर आमदारांना होता. मात्र सत्तावाटपामध्ये भाजपचाच वरचष्मा राहण्याची शक्यता सूत्रांकडून वर्तवण्यात आली आहे. कारण महत्त्वाची मलईदार खाती भाजपामध्ये जाणार असल्याचे बोलले जात आहे. …

Read More »

भारतीय वंशाचे ऋषी सुनक बनू शकतात ब्रिटनचे नवे पंतप्रधान

ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन आज राजीनामा देण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. गेल्या २४ तासात पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांच्या सरकारमधून बंडखोरी करत ४० पेक्षा जास्त मंत्र्यांनी राजीनामे दिले आहेत. परिणामी बोरिस जॉन्सन यांचे सरकार कोसळण्याची शक्यता आहे. बोरिस जॉनसन हे पंतप्रधान पदावरुन पायउतार झाले तर भारतीय वंशांचे ऋषी सुनक हे ब्रिटनचे …

Read More »

कॉ. गोविंद पानसरे हत्याकांडाचा तपास करणारे अधिकारी जबाबदारीतून मुक्त, नवीन तपास अधिकारी नेमण्याचा कोर्टाचा आदेश

मुंबई : कॉम्रेड गोविंद पानसरे हत्याकांड प्रकरणाचा तपास करणार्‍या अधिकार्‍याला जबाबदारीतून मुक्त करण्यासंबंधी मान्यता हायकोर्टाने दिली आहे. या संबंधी राज्य सरकारने एक याचिका हायकोर्टात दाखल केली होती. कोर्टाने ती याचिका स्वीकारली आहे. पण येत्या चार आठवड्यात नवीन तपास अधिकार्‍याची नेमणूक करावी असा आदेशही न्यायालयाने दिला आहे. अतिरिक्त पोलीस अधीक्षक तिरूपती …

Read More »

सीबीआयकडून भ्रष्टाचार प्रकरणी टाटा पॉवरच्या सहा अधिकार्‍यांना अटक, टाटा पॉवरकडून लाचखोरीच्या आरोपाचा इन्कार

नवी दिल्ली : सेंट्रल ब्युरो ऑफ इन्व्हेस्टिगेशन म्हणजेच सीबीआयने टाटा प्रकल्पाच्या 6 अधिकार्‍यांना अटक केली आहे. ईशान्येकडील प्रादेशिक ऊर्जा प्रणाली सुधार प्रकल्पातील भ्रष्टाचाराच्या आरोपावरून सीबीआयने सहा वरिष्ठ अधिकार्‍यांना अटक केली आहे. एजन्सीने अटक केलेल्या टाटा प्रोजेक्ट्सच्या अधिकार्‍यांमध्ये कार्यकारी व्हीपी देशराज पाठक आणि सहाय्यक व्हीपी आरएन सिंह यासारख्या उच्च पदस्थ अधिकार्‍यांचा …

Read More »

कोगनोळी येथील भाविक पंढरपूरला रवाना

कोगनोळी : पंढरपूर येथे आषाढी एकादशी निमित्त विठोबा दर्शनासाठी कोगनोळी तालुका निपाणी येथील शेकडो भाविक मंगळवार दि. 5 जुलै रोजी बसने रवाना झाले. येथील ग्रामदैवत श्री अंबिका मंदिराजवळ बापूसाहेब पिडाप पाटील व बाळासाहेब जाधव यांच्या हस्ते बसचे विधिवत पूजन करण्यात आले. यावेळी बोलताना बापूसाहेब पाटील म्हणाले, कोगनोळी वारकरी व भाविकांच्या …

Read More »

वेटलिफ्टिंगपटू मराठा युवतीचा किरण जाधव यांनी केला सन्मान : दानशूरांना केले मदतीचे आवाहन

बेळगाव : वेटलिफ्टिंग या क्रीडा क्षेत्रातील कार्यकर्तृत्वाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मन की बात मध्ये हालगा – बेळगावच्या ज्या युवतीबद्दल गौरवोद्गार काढले, त्या शेतकरी कन्या असणार्‍या शूर मराठा युवतीचा विमल फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष आणि भाजप युवा नेते किरण जाधव यांनी आर्थिक मदत देऊन सन्मान केला. अक्षता बसवंत कामती, राहणार हालगा, …

Read More »