Sunday , December 14 2025
Breaking News

Classic Layout

सभापती बसवराज होरट्टी यांचा भाजप प्रवेश!

बेंगळुरू : कर्नाटक विधान परिषदेचे सभापती बसवराज होरट्टी यांनी आज केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या उपस्थितीत भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. विधान परिषदेचे सभापती बसवराज होरट्टी यांनी आज केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या उपस्थितीत बेंगळुरू येथे भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. गेल्या ३० वर्षांपासून जेडीएसशी असलेले घट्ट नाते तोडून त्यांनी …

Read More »

अक्षय तृतीयाला श्री कपिलेश्वर गाभाऱ्यात आंब्यांची आरास

बेळगाव : श्री क्षेत्र दक्षिण काशी कपिलेश्वर मंदिरामध्ये आज अक्षय तृतीयेला जगत ज्योती बसवेश्वर जयंती व भगवान परशुराम जयंती निमित्त आणि शिवजयंतीनिमित्त शिव पारायण पठण, श्री बसवेश्वर महाराजांनी रचलेले वचनांचे पठण व या सर्व महापुरुषांच्या जयंतीनिमित्त विशेष रुद्राभिषेक करण्यात आला. सालाबादप्रमाणे अक्षय तृतीया निमित्त आकर्षक अशी आंब्याची आरास संपूर्ण गाभारा …

Read More »

फर्स्ट इंडिया स्केट रोलर गेम्स -2022 मध्ये बेळगावचे स्केटिंगपटू चमकले

बेळगाव : रोलर स्केटिंग फेडरेशन ऑफ इंडिया आयोजित फर्स्ट इंडिया स्केट रोलर गेम्स स्केटिंग चॅम्पियनशिप- 2022 या स्केटिंग स्पर्धेत बेळगावच्या स्केटिंगपटूंनी सुयश मिळविले. चंदीगड पंजाब मधील मोहाली येथे 21 ते 30 एप्रिल 2022 या दरम्यान ही स्पर्धा घेण्यात आली. या स्पर्धेत सुमारे 1900 स्केटिंगपटू सहभागी झाले होते. यामध्ये बेळगावच्या स्केटिंगपटूंनी …

Read More »

बेळगाव शहर परिसरात रमजान ईद भक्तिभावाने साजरा

बेळगाव : बेळगाव शहर आणि उपनगरातील समस्त मुस्लिम बांधवांनी आज मंगळवारी रमजान ईद सण अत्यंत श्रद्धा भक्तिभावाने साजरा केला. यानिमित्त एकमेकांना शुभेच्छा देण्याबरोबरच शहरात ठिकठिकाणी सामूहिक नमाज पठणाचे कार्यक्रम शांततेत पार पडले. गेल्या दोन वर्षापासून कोरोना प्रादुर्भावामुळे सरकारच्या आदेशानुसार रमजान ईद सण घरगुती साध्या पद्धतीने साजरा केला जात होता. त्याचप्रमाणे …

Read More »

सौंदलगा येथील बहुउद्देश सेवा केंद्राच्या इमारतीचा स्लॅब भरणी शुभारंभ

सौंदलगा : सौंदलगा येथील प्राथमिक कृषी पत्तिन संघास नाबार्डकडून मंजूर झालेल्या बहुउद्देश सेवा केंद्राच्या इमारतीचा स्लॅब भरणी शुभारंभ मंत्री शशिकला जोल्ले यांच्या हस्ते करण्यात आला. कार्यक्रमाच्या सुरुवातीला पी.के. पी. एस. चे अध्यक्ष संजय शिंत्रे यांनी सर्वांचे स्वागत करून प्रास्ताविकात सांगितले की, नाबार्डकडून बेळगाव जिल्हा सहकारी बँकेच्या सहकार्यातून आमच्या संघास बहूउद्देश …

Read More »

आंतरराष्ट्रीय परिषदेत जायंट्स मेन सन्मानित

बेळगाव : गेल्या छत्तीस वर्षांपासून लोकसेवेचे व्रत घेऊन समाजजीवनात काम करणार्‍या बेळगावच्या जायंट्स मेन या संघटनेला त्यांच्या सेवाकार्याबद्दल विशेष पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. कोरोना महामारीमुळे गेली दोन वर्षे जायंट्सचे आंतरराष्ट्रीय परिषद झाली नव्हती. यावर्षीची परिषद ही दमन सारख्या केंद्रशासित प्रदेशात झाली. तीन दिवस चाललेल्या परिषदेत जायंट्सच्या संघटनांनी कोणत्या पद्धतीने …

Read More »

गर्लगुंजीत भंडार्‍याची उधळण करत लक्ष्मी, मर्‍याम्मा देवीच्या मुर्तीच्या मिरवणुकीला सुरूवात

खानापूर (प्रतिनिधी) : गर्लगुंजीत (ता. खानापूर) गावच्या लक्ष्मी आणि मर्‍याम्मा मंदिराचा जीर्णोद्धार करून नव्याने उभारण्यात आलेल्या मंदिरात लक्ष्मी आणि मर्‍याम्मा देवींच्या मुर्तीची प्राणप्रतिष्ठापणा करण्यात येत आहे. यानिमित्ताने मंगळवारी दि. 3 मे रोजी गावची ग्रामदेवता माऊली मंदिरापासून मुर्तीच्या मिरवणुकीला मंगळवारी पहाटेपासून वाद्याच्या तालावर व भंडार्‍याची उधळण करत गावच्या पंचाच्या व मानकर्‍यांच्याहस्ते …

Read More »

छ. शिवराय व बसवेश्वर यांचे विचार आधुनिक काळात सदोदित प्रेरणा देतील : ज्येष्ठ विचारवंत के. जी. पाटील

शिवबसव आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर – महावीर जयंतीनिमित्त व्याख्यान : राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे आयोजन बेळगाव : चारशे वर्षांपूर्वी छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य निर्मितीसाठी केलेला विचार हा त्यांनी किती प्रतिकूल परिस्थितीत हे सतीचे वाहन हाती घेतले होते याचा अचंबा वाटतो. मध्ययुगीन राजवटीत अनेकांच्या विरोधात बंड करणे म्हणजे प्राणाशी गाठ असायची परंतु शिवाजी …

Read More »

महाराष्ट्र केसरी पै. पृथ्वीराज पाटील यांचा मांडेदुर्गचे कोच राम पवार यांच्या घरी सत्कार

तेऊरवाडी (एस. के. पाटील) : गेल्या बावीस वर्षाचा कोल्हापूरचा महाराष्ट्र केसरीचा दुष्काळ संपवून मानाची गदा पटकावल्याचा विशेष आनंद झाल्याची भावना महाराष्ट्र केसरी पै. पृथ्वीराज पाटील यांनी व्यक्त केली. आपल्या घरी कुस्तीची परंपरा असून त्याचबरोबर सैन्य दलातून आंतरराष्ट्रीय पातळीवरील मांडेदुर्ग (ता. चंदगड)चे कुस्ती प्रशिक्षक राम पवार यांच्या मार्गदर्शनाखाली या स्पर्धेला प्रोत्साहन …

Read More »

निपाणी शहर मध्यवर्ती रिक्षा संघटनेतर्फे शिव बसव जयंतीनिमित्त रिक्षा रॅली

निपाणी (वार्ता) : नरवीर तानाजी चौकातील शहर मध्यवर्ती रिक्षा चालक-मालक संघटनेतर्फे शिव बसव जयंती साजरी करण्यात आली. त्यानिमित्त प्रतिमापूजन व शहरातील विविध मार्गावरून रिक्षा रॅली काढण्यात आली. छत्रपती श्री शिवाजी महाराज आणि श्री बसवेश्वर महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन निपाणी शहर पोलीस ठाण्याच्या उपनिरीक्षक कृष्णवेणी गुर्लहोसूर यांच्याहस्ते झाले. तर मध्यवर्ती शिवाजी …

Read More »