Sunday , December 14 2025
Breaking News

Classic Layout

7 कोटींच्या विकासकामांना मंत्री कत्ती यांनी दिली चालना

हुक्केरी : हुक्केरी मतदारसंघात पंतप्रधान ग्राम सडक योजना आणि लघु पाटबंधारे खात्याच्या योजना समर्पकपणे राबविण्यात येत असल्याची माहिती वन तसेच अन्न व नागरी पुरवठा मंत्री उमेश कत्ती यांनी सांगितले. मंत्री उमेश कत्ती यांच्याहस्ते आज, रविवारी लघु पाटबंधारे खात्याच्या वतीने जाबापूर, हुल्लोळीहट्टी, अलूर के. एम., सोलापूर, होन्नीहळ्ळी गावात लहान बंधारे दुरुस्ती …

Read More »

कोल्हापूर कन्या कस्तुरीने सर केले अन्नपूर्णा शिखर

कोल्हापूर : जगात सर्वात खडतर समजले जाणारे अष्टहजारी अन्नपूर्णा 1 शिखर कोल्हापूरची कन्या कस्तुरी सावेकर हिने सर केले. हे शिखर सर करणारी ती जगातील सर्वात तरुण गिर्यारोहक ठरली आहे. 24 मार्चपासून सुरू झालेल्या तिच्या माऊंट एव्हरेस्ट मोहिमेतील हा महत्त्वाचा टप्पा मानला जातो. साधारणपणे 15 मे दरम्यान चांगली वेदर विंडो पाहून …

Read More »

महाराष्ट्र धर्माची पताका विश्वात फडकावल्याशिवाय राहणार नाही : मुख्यमंत्र्यांची ग्वाही

मुंबई : कितीही अडथळे आणि संकटे आली तरी महाराष्ट्राची घोडदौड सुरूच राहील. अवघ्या देशाला स्फूर्ती देणारा हा शिवरायांचा महाराष्ट्र आहे. ज्यांनी संयुक्त महाराष्ट्रासाठी आपले रक्त सांडले, त्यांचे बलिदान कधीही विसरणार नाही. महाराष्ट्र धर्माची पताका देशातच नव्हे तर विश्वात फडकावल्याशिवाय राहणार नाही, असा निर्धार मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शनिवारी व्यक्त केला. …

Read More »

राज्याच्या भूगर्भात मुंबई तोडण्याच्या हालचालींना वेग; राऊतांचा भाजपावर आरोप

मुंबई : महाराष्ट्राच्या स्थापनेला आज ६२ वर्षे पूर्ण झाली. त्यानिमित्त शिवसेना खासदार संजय राऊत यांनी शिवसेनेचं मुखपत्र असलेल्या सामनामध्ये आपल्या रोखठोक या सदरातून महाराष्ट्रातल्या सद्यस्थितीवर भाष्य केलं आहे. जे अखंड हिंदुस्थानचे फक्त स्वप्न दाखवतात, तेच महाराष्ट्राचे खरे शत्रू असं विधानही त्यांनी केलं आहे. त्यासोबतच मुंबई कोणाची या प्रश्नाचा उहापोह करताना …

Read More »

तेऊरवाडी येथे राहणाऱ्या महिलेचा भरधाव ट्रकच्या धडकेत जागीच मृत्यू, एक जण गंभीर जखमी

होसूरजवळ घडला अपघात तेऊरवाडी (एस. के. पाटील) : देवदर्शन करून येणाऱ्या दुचाकीवरील दाम्पत्याला भरधाव ट्रकने धडक दिल्याने झालेल्या भीषण अपघातात पत्नीचा जागीच मृत्यू झाला असून दुचाकीस्वार गंभीर जखमी झाला आहे. या अपघातानंतर ट्रक चालक पसार झाला असून या प्रकरणी चंदाप्पा शंकर लमाणी (वय 39, रा. तेऊरवाडी, ता. चंदगड, मुळ – …

Read More »

माय मराठीच्या संवर्धनासाठी सीमावासीयांचे कार्य कौतुकास्पद : ज्येष्ठ पत्रकार प्रभाकर ढगे

बेळगाव : गेली 65 वर्षे बेळगाव सीमा भागातील मराठी जनता न्याय हक्कासाठी लढा देत आहे. सर्वोच्च न्यायालयात महाराष्ट्र कर्नाटक सीमाप्रश्न अद्यापही प्रलंबित आहे. अशा काळात बेळगाव सीमा भागातील मराठी भाषिक जनता मराठी भाषा आणि संस्कृती संवर्धनासाठी सातत्याने करत असलेले प्रयत्न कौतुकास्पद असल्याचे प्रतिपादन, गोव्याचे ज्येष्ठ पत्रकार प्रभाकर ढगे यांनी बोलताना …

Read More »

राजीव गांधी आरोग्य विज्ञान विद्यापीठाचे स्थलांतर थांबवा : आमदार अनिल बेनके यांची मागणी

बेळगाव : बेळगाव येथील राजीव गांधी आरोग्य विज्ञान विद्यापीठ स्थलांतरित करू नये अशी मागणी बेळगाव उत्तरचे आमदार अनिल बेनके यांनी आरोग्यमंत्री के. सुधाकर यांच्याकडे केली आहे. बेनके यांनी आरोग्य, कुटुंब कल्याण आणि वैद्यकीय शिक्षण मंत्री के. सुधाकर यांची भेट घेत राजीव गांधी आरोग्य विज्ञान विद्यापीठ कर्नाटक बंगलोरच्या प्रादेशिक केंद्राच्या निर्मितीबाबत …

Read More »

गोकाक येथील महिलेचा कोरोनामुळे मृत्यु

बेळगाव : देशभरात पुन्हा एकदा कोरोना संक्रमण वाढू लागले आहे. केंद्र आणि राज्य सरकार कोरोना संक्रमणाच्या पार्श्वभूमीवर सतर्क झाले आहे. कर्नाटक राज्यात संक्रमणाचा वेग मंदावला असला तरीही, राज्य सरकारने विशेष खबरदारी घेतली आहे. दरम्यान तब्बल दोन महिन्यांच्या कालावधीनंतर बेळगाव जिल्ह्यातील गोकाक येथील 67 वर्षीय महिलेचा आज शनिवारी घटप्रभा येथील रुग्णालयात …

Read More »

नव्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणामुळे शिक्षण व्यवस्था अधिक बळकट : उच्च शिक्षण मंत्री डॉ. अश्वथ नारायण

बेळगाव : नव्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणामुळे शिक्षण व्यवस्था अधिक बळकट होणार आहे. आपल्या देशाला नवे शैक्षणिक धोरण वेगळ्या उंचीवर घेऊन जाईल, असे प्रतिपादन उच्च शिक्षण मंत्री डॉ. अश्वथ नारायण यांनी केले. बेळगावमधील विश्वेश्वरय्या तांत्रिक विद्यापीठाच्या एपीजे अब्दुल कलाम ऑडिटोरियम हॉलमध्ये भारतीय शिक्षण मंडळाचा कर्नाटक उत्तर विभाग तसेच व्हीटीयू यांच्या सहयोगाने …

Read More »

संकेश्वरात सोमवारी शिवस्मारकाचे भूमिपूजन

संकेश्वर (महंमद मोमीन) : संकेश्वरात छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त सोमवार दि. २ मे २०२२ रोजी सकाळी ९ वाजता शिवाजी चौक येथे शिवस्मारक भूमिपूजन निडसोसी मठाचे पंचम श्री शिवलिंगेश्वर महास्वामीजी, संकेश्वर श्री शंकराचार्य संस्थान मठाचे श्री सच्चिदानंद अभिनव विद्यानू्सिंह भारती महास्वामीजींच्या दिव्य सानिध्यात होत आहे. शिवस्मारकाचे भूमिपूजन राज्याचे वन आहार व …

Read More »