Wednesday , December 17 2025
Breaking News

Classic Layout

सरकारी शाळेतील मुलांसाठी मोफत बस प्रवास

  डी.के. शिवकुमार; केजी ते बारावीपर्यंतच्या विद्यार्थ्याना लाभ बंगळूर : काँग्रेसच्या नेतृत्वाखालील राज्य सरकारने सरकारी शाळेतील मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी एक महत्त्वाची घोषणा केली आहे. राज्यातील सरकारी शाळांमधील मुलांना शाळांमध्ये जाण्यासाठी मोफत बस सुविधा मिळणार आहे. उपमुख्यमंत्री आणि प्रदेश काँग्रेस अध्यक्ष डी. के. शिवकुमार यांनी सोशल मीडियावर याबद्दल पोस्ट करत घोषणा …

Read More »

युवा समिती बेळगाव यांच्या वतीने विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप

  बेळगाव : आज शनिवार दि. 12/07/2025 रोजी सावगाव शाळेत युवा समिती बेळगाव यांच्या वतीने इयत्ता 1 लीच्या सर्व तसेच गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वितरीत करण्यात आले. हा उपक्रम दरवर्षी राबविण्यात येत असल्याने मुलांच्यामध्ये शिक्षणाची आवड निर्माण होत आहे. यावेळी युवा आघाडी सावगावचे अध्यक्ष श्री. यल्लाप्पा मा. पाटील, शाळेचे एसडीएमसी …

Read More »

गणेशोत्सव मार्गावरील विद्युत खांब बदलण्यासाठी लोकमान्य टिळक महामंडळाकडून हेस्कॉमला निवेदन

  बेळगाव : श्री लोकमान्य टिळक गणेशोत्सव महामंडळाच्या वतीने महामंडळाच्या पदाधिकाऱ्यांच्या नेतृत्वाखाली शुक्रवारी 11 जुलै रोजी हेस्कॉमचे एक्झिक्युटिव्ह इंजिनीयर मनोहर सुतार यांना निवेदन देण्यात आले व गणेशोत्सव आगमन सोहळा व विसर्जन मिरवणुक मार्गावरील कमी उंचीचे विद्युत खांब बदलून त्या जागी जास्त उंची असलेले विद्युत खांब उभारण्याची मागणी करण्यात आली. गणेश …

Read More »

भाजपविरुद्ध जाहिरात: मुख्यमंत्री सिद्धरामय्याविरुद्धच्या मानहानीच्या खटल्याला स्थगिती

  बंगळूर : मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्याविरुद्ध भाजपने लोकप्रतिनिधींच्या विशेष न्यायालयात दाखल केलेल्या फौजदारी मानहानीच्या खटल्याला उच्च न्यायालयाने शुक्रवारी अंतरिम स्थगिती दिली. २०२३ च्या विधानसभा निवडणुकीत भाजपविरुद्ध भ्रष्टाचाराचा आरोप करणाऱ्या दैनिक वर्तमानपत्रांमध्ये जाहिराती दिल्याबद्दल मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्याविरुद्ध फौजदारी मानहानीचा खटला दाखल करण्यात आला होता. सिद्धरामय्या यांनी त्यांच्याविरुद्धचा मानहानीचा खटला रद्द करण्यासाठी …

Read More »

शिवरायांच्या 12 किल्ल्यांचा युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत समावेश

  मुंबई : छत्रपती शिवाजी महाराजांच्या 12 किल्ल्यांचा युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत समावेश करण्यात आला आहे. त्यामुळे शिवप्रेमींमध्ये आनंदाचे वातावरण पसरले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याबाबत ट्वीट करत माहिती दिली आहे. हे 12 किल्ले कोणते आहेत ते जाणून घेऊया. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याबाबत ट्वीट करताना म्हटले की, ‘महाराष्ट्रातील …

Read More »

बेळगावमध्ये उद्या लोकअदालतीचे आयोजन

  बेळगाव : उद्या दि. १२ जुलै रोजी बेळगावमध्ये लोकअदालत आयोजित करण्यात येणार आहे. तसेच, सरकारी योजनांची माहिती लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी विधी सेवा प्राधिकरणातर्फे जनजागृती केली जाईल, अशी माहिती बेळगाव जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव संदीप पाटील यांनी दिली. आज बेळगावमध्ये पत्रकार परिषद घेऊन ते बोलत होते. संदीप पाटील म्हणाले की, …

Read More »

फेसबुक फ्रेंड सर्कल आणि पत्रकार संघाच्या वतीने विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप

  बेळगाव – गुरुपौर्णिमेचे औचित्य साधून फेसबुक फ्रेंड सर्कल आणि बेळगाव मिडिया असोसिएशन या पत्रकार संघाच्या संयुक्त विद्यमाने काल गुरुवारी शहापूर येथे गरीब गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले. शहापूर नाथ पै चौक येथे आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमाला फेसबुक फ्रेंड सर्कलचे संतोष दरेकर यांच्यासह सुधाकर चाळके, सामाजिक कार्यकर्ते विल्सन …

Read More »

भारत विकास परिषदेचा राष्ट्रीय स्थापना दिवस उत्साहात

  तसेच डॉक्टर्स डे आणि सीए डे देखील साजरा बेळगाव : भारत विकास परिषदेचा 63 वा राष्ट्रीय स्थापना दिवस तसेच डॉक्टर्स डे आणि चार्टर्ड अकौंटंट डे असा संयुक्त कार्यक्रम गुरूवारी सायंकाळी जीजीसी सभागृहात अपूर्व उत्साहात साजरा करण्यात आला. प्रमुख अतिथी म्हणून डॉ. सूरज जोशी आणि चार्टर्ड अकाऊंटंट संजीव अध्यापक उपस्थित …

Read More »

मराठा लाईट इन्फंट्री येथे अग्निवीर विविध पदांसाठी २ ऑगस्टपासून भरती मेळावा

  बेळगाव : मराठा लाईट इन्फंट्री रेजिमेंटल सेंटर बेळगाव येथील छत्रपती शिवाजी स्टेडियम येथे येत्या दि. 2 ते दि. 9 ऑगस्ट 2025 दरम्यान अग्निवीर जनरल ड्यूटी, अग्निवीर क्लार्क आणि अग्निवीर ट्रेडसमॅनसाठी युनिट हेडकॉटर्र कोटा (युएचक्यू) अग्निवीर भरती मेळावा आयोजित करण्यात आला आहे. सदर मेळावा फक्त युद्ध विधवा, सैनिक, माजी सैनिक …

Read More »

अनगोळ येथे ३७ वर्षीय माजी सैनिकाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू

  बेळगाव : राज्यात हृदयविकाराच्या झटक्यांचे प्रमाण वाढत असताना, बेळगाव शहरात गुरुवारी अशीच एक दुर्दैवी घटना घडली आहे. भारतीय सैन्यातून निवृत्त झालेल्या एका माजी सैनिकाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला. ही घटना बेळगाव शहरातील अनगोळ परिसरात घडली. इब्राहिम देवलापूर (३७) असे मृत माजी सैनिकाचे नाव आहे. भारतीय सैन्यात सेवा दिल्यानंतर ते …

Read More »