Wednesday , December 17 2025
Breaking News

Classic Layout

दोघांचे मृतदेह बेळगावात तर दोघांचे गोव्यात आणणार!

  बेळगाव : प्रयागराज महाकुंभ मेळ्यात झालेल्या चेंगराचेंगरीत मृत्युमुखी पडलेल्या बेळगावातील चार भाविकांचे मृतदेह बेळगावला पाठवण्यात आले आहेत. बेळगाव येथील अरुण कोपर्डे (वय 61) व महादेवी भावनूर (वय 48) यांचे पार्थिव बेळगाव येथील सांबरा विमानतळावर सायंकाळी पाच वाजता दाखल होणार आहे. तर मेघा हत्तरवठ (२४), ज्योती हत्तरवठ (४४) या आई …

Read More »

निपाणीतील मास्क ग्रुपतर्फे ऋतिकाबेन मेहता यांचा आनंदोत्सव

  निपाणी (वार्ता) : येथील कोठीवाले कॉर्नर वरील डॉ. वैशाली आणि विलास पारेख महावीर आरोग्य संघ सेवार्थ दवाखान्याचे विश्वस्त राजेंद्र मेहता यांची कन्या ऋतिकाबेन मेहतायांनी जैन धर्माची दीक्षा घेतली. त्यानिमित्त येथील मास्क ग्रुपतर्फे त्यांचा आनंद उत्सव आणि स्वागत कार्यक्रम पार पडला. यापुढील मुख्य कार्यक्रम रविवारी (२५ मे) दीक्षाविधी गुजरातमधील संखेश्वरपुरम …

Read More »

कुंभमेळ्यात मृत्युमुखी पडलेल्या चौघांचे मृतदेह “एअरलिफ्ट”ने आणणार

  बेळगाव : महाकुंभमेळ्यात झालेल्या भीषण चेंगराचेंगरीत मृत्युमुखी पडलेल्या बेळगावातील चार जणांचे मृतदेह हवाई मार्गाने “एअरलिफ्ट”ने आणण्यात येणार असल्याचे माहिती मिळाली आहे. प्रयागराज येथून मृतदेह रुग्णवाहिकेने दिल्लीला आणून तेथून विमानाने बेळगावला आणण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यासंदर्भात उच्चस्तरीय अधिकारी एएसपी श्रुती आणि केएएस अधिकारी हर्षा उत्तर प्रदेशात गेले आहेत. जवळपास …

Read More »

मराठी भाषा संवर्धन पंधरवडा सांगता समारंभ संपन्न

  बेळगाव : गुरुवर्य वि. गो. साठे मराठी प्रबोधिनी व राज्य मराठी विकास संस्था मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने 14 जानेवारी ते 28 जानेवारी या कालावधीत मराठी भाषा संवर्धन पंधरवडा साजरा करण्यात आला. या पंधरवड्यात काव्यसप्ताह कार्यक्रम, शिक्षक, पालक व विद्यार्थी कवी संमेलन, पुस्तक परीक्षण प्रात्यक्षिक, पुस्तक परीक्षण सादरीकरण, साने गुरुजी …

Read More »

कुटुंब वत्सल, विद्यार्थी प्रिय शिक्षक रा. ल. पाटील गुरुजी

  चन्नेवाडी तालुका खानापूर येथील व तालुका आदर्श शिक्षक पुरस्कार विजेते श्री. राजाराम लक्ष्मण पाटील यांचे दिनांक 19 जानेवारी 2025 रोजी दुःखद निधन झाले, आज त्यांचा बारावा दिवस त्यानिमित्त त्यांच्या कार्याचा घेतलेला आढावा… श्री. राजाराम लक्ष्मण पाटील उर्फ रा. ल. गुरुजी यांचा जन्म खानापूर तालुक्यातील चन्नेवाडी या गावी दिनांक 4 …

Read More »

टिप्पर – दुचाकी अपघातात आंबेवाडी येथील दोन तरुणांचा दुर्दैवी मृत्यू

  बेळगाव : अलतगा जवळील खडीमिशन दरम्यान आज झालेल्या अपघातात आंबेवाडी गावातील 24 वर्षीय योगेश संभाजी न्हावी आणि 27 वर्षीय नितेश वैजू तरळे या दोघांचा दुर्दैवी मृत्यू झाला. दोघेही कुटुंबांचे एकुलते एक पुत्र होते. सदर अपघात सायंकाळी 4.30 ते 5 वाजता झाला असून आंबेवाडी ग्रामस्थांसाठी ही दुःखद घटना आहे. वाळू …

Read More »

कॉम्रेड गोविंद पानसरे हत्या प्रकरणातील सर्व सहा आरोपींना जामीन मंजूर

  मुंबई : कॉम्रेड गोविंद पानसरे हत्या प्रकरणातील सर्व आरोपींना मुंबई उच्च न्यायालयाने दिलासा दिला आहे. न्यायालयाद्वारे सर्व सहा आरोपींचा जामीन मंजूर करण्यात आला आहे. जस्टीस ए. एस. किलोर यांच्या एकल खंडपीठाने हत्या प्रकरणातील सहा आरोपींचा जामीन मंजूर केला आहे. सचिन अंदुरे, गणेश मिस्किन, अमित देगवेकर, अमित बट्टी, भरत कुरणे …

Read More »

चेंगराचेंगरीत मृत्युमुखी पडलेल्यामध्ये शिवाजी नगर येथील महिलेचाही समावेश

  बेळगाव : प्रयागराज येथील कुंभमेळ्यातील चेंगराचेंगरीत बेळगाव येथील मृत्यू झालेल्यांची संख्या चार झाली असून शिवाजी नगर परिसरात राहणाऱ्या भाजप कार्यकर्त्या सौ. महादेवी भावनूर यांचाही मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे. तत्पूर्वी, वडगाव येथील ज्योती हत्तरवाड (50) आणि तिची मुलगी मेघा हत्तरवाड, तसेच भाजप महिला कार्यकर्त्या कांचन कोपर्डे यांचे पती …

Read More »

कुंभमेळ्यात चेंगराचेंगरीत मृत्युमुखी पडलेल्यांची संख्या तीन

  बेळगाव : प्रयागराज येथील कुंभमेळ्यात झालेल्या चेंगराचेंगरीत बेळगाव येथील मृत्यूमुखी पडलेल्यांची संख्या आता तीन झाली आहे. भाजपच्या महिला कार्यकर्त्या असलेल्या कांचन कोपर्डे यांच्या पतीचेही या चेंगराचेंगरीत मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. वडगाव येथील आई आणि मुलगी तसेच बेळगाव शेट्टी गल्ली येथील अरुण कोपर्डे असे एकूण तीन जण कुंभमेळ्यातील …

Read More »

कुंभमेळ्यातील चेंगराचेंगरीत वडगाव येथील आई-मुलीचा दुर्दैवी मृत्यू

  बेळगाव : प्रयगराज येथील महाकुंभमेळ्यात झालेल्या चेंगराचेंगरीत वडगाव भागातील आई आणि मुलीचा मृत्यू दुर्दैवी मृत्यू झाला. ज्योती हत्तरवाड (50) आणि मेघा हत्तरवाड रा. वडगावी अशी मृतांची नावे आहेत. कुंभमेळ्यात झालेल्या चेंगराचेंगरीनंतर दोघीनांही प्रयागराज येथील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र उपचार निष्फळ ठरल्याने दोघींचाही मृत्यू झाला. आज …

Read More »