Wednesday , December 17 2025
Breaking News

Classic Layout

म. ए. समिती शिष्टमंडळाने कोल्हापूर धरणे आंदोलनासंदर्भात कोल्हापुरातील सर्वपक्षीय नेतेमंडळींना निवेदन

  बेळगाव : १७ जानेवारी हुतात्मा दिनानिमित्त महाराष्ट्र शासनाला सीमाप्रश्नी जागे करण्यासाठी आणि सीमाप्रश्न चालना मिळविण्यासाठी मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीच्या वतीने कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालय येथे धरणे आंदोलन पुकारण्यात येणार आहे. तरी या धरणे आंदोलनाला कोल्हापुरातील सर्वपक्षीय नेते मंडळींनी सक्रीय सहभाग नोंदवून पाठिंबा द्यावा यासाठी समितीच्या शिष्टमंडळाने विविध नेते मंडळींची भेट …

Read More »

सार्वजनिक वाचनालयाचे पत्रकार पुरस्कार जाहीर

    बेळगाव : येथील सार्वजनिक वाचनालयाच्यावतीने देण्यात येणारा ‘सार्वजनिक वाचनालय बेळगाव पत्रकार पुरस्कार २०२४’ करिता मराठी विभागासाठी श्री. संजय अण्णासो सुर्यवंशी, वृत्त संपादक दैनिक पुढारी, बेळगाव व कन्नड विभागासाठी श्री. चंद्रकांत सुगंधी, जिल्हा प्रतिनिधी न्यूज १८ चॅनेल, बेळगाव यांना जाहीर करण्यात आला आहे. तसेच, ‘प्रा. एस. आर. जोग महिला …

Read More »

माजी जिल्हाधिकारी बेविस ए. कौटिन्हो यांचे निधन

  बेळगाव : प्रख्यात सेवानिवृत्त आयएएस अधिकारी, बेळगावचे माजी जिल्हाधिकारी, एक प्रतिष्ठित नोकरशहा आणि कर्नाटक सरकारचे माजी अतिरिक्त मुख्य सचिव बेविस ए. कौटिन्हो (75 वर्षे) यांचे आज गुरुवारी सकाळी दीर्घ आजाराने हनुमाननगर, बेळगाव येथील त्यांच्या निवासस्थानी निधन झाले. कौटिन्हो हे 1977 च्या कर्नाटक केडरचे आयएएस अधिकारी होते. त्यांनी त्यांच्या शानदार …

Read More »

१७ जानेवारी हुतात्मा दिनानिमित्त बेळगाव तालुका समितीच्यावतीने आवाहन

  बेळगाव : संयुक्त महाराष्ट्रासाठी बेळगाव येथे १७ जानेवारी १९५६ रोजी झालेल्या सत्याग्रहात हुतात्मा झालेले कंग्राळी गावचे सुपुत्र पैलवान मारुती बेन्नाळकर व बाळू निलजकर यांना अभिवादन प्रतिवर्षाप्रमाणे यावर्षीही करण्यात येणार आहे. उद्या शुक्रवार दिनांक १७ जानेवारी २०२५ रोजी सकाळी ठीक ८.३० वाजता कंग्राळी खुर्द येथे हा अभिवादन करण्यात येणार आहे. …

Read More »

हुतात्मा दिनी सीमाभागात कडकडीत हरताळ पाळा; शहर समितीच्या बैठकीत निर्णय

  बेळगाव : हुतात्मा दिनानिमित्त उद्या शुक्रवार दिनांक 17 जानेवारी रोजी बेळगाव सीमाभागातील नागरिकांनी आपापले व्यवसाय बंद ठेवून कडकडीत हरताळ पाळावा तसेच सकाळी साडेआठ वाजता हुतात्मा चौक बेळगाव येथे हुतात्म्यांना अभिवादन करण्यासाठी बहुसंख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन शहर समितीच्या बैठकीत करण्यात आले. बुधवार दिनांक 15 जानेवारी रोजी रंगुबाई पॅलेस येथे …

Read More »

प्रदेश कॉंग्रेस अध्यक्ष तातडीने बदला; सतीश जारकीहोळींची मागणी

  प्रदेश काँग्रेसमधील मतभेद तीव्र बंगळूर : काँग्रेसच्या विधिमंडळ पक्षाची बैठक संपल्यानंतरही काँग्रेस पक्षातील मतभेद संपलेले नाहीत. सार्वजनिक बांधकाम मंत्री सतीश जारकीहोळी थेट केपीसीसी अध्यक्ष डी. के. शिवकुमार यांच्या विरोधात उघड वक्तव्य करत रिंगणात उतरले आहेत. प्रदेश काँग्रेसच्या नवीन अध्यक्षांची नियुक्ती करण्यात यावी अशी पक्ष हायकमांडकडे मागणी करण्यात आल्याचे ते …

Read More »

अभिनेता सैफ अली खान याच्यावर चाकू हल्ला

  मुंबई : बॉलीवूड अभिनेता सैफ अली खान याच्यावर हल्ला झाला आहे. वांद्रे (पश्चिम) येथील त्याच्या घरात घुसून एका दरोडेखोराने त्याच्यावर हल्ला केला. या हल्ल्यात तो जखमी झाला आहे. गुरुवारी मध्यरात्री अडीच वाजताच्या सुमारास तो त्याच्या कुटुंबियांसह घरात झोपला असताना ही घटना घडली. सैफ अली खान व करीना कपूर खान …

Read More »

म. ए. युवा समितीची व्यापक बैठक उद्या

  बेळगाव : महाराष्ट्र एकीकरण युवा समितीची व्यापक बैठक गुरुवार दिनांक १६ जानेवारी २०२५ रोजी सायंकाळी ६.०० वा. “१७ जानेवारी हुतात्मा दिवस” आणि कोल्हापूर येथे होणाऱ्या धरणे आंदोलनासंदर्भात बोलाविण्यात आली आहे, तरी युवा समितीच्या सर्व पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी महाराष्ट्र एकीकरण युवा समिती कार्यालय, कावळे संकुल, टिळकवाडी, बेळगाव येथे उपस्थित रहावे, असे …

Read More »

बाळगोपाळ एसएसएलसी व्याख्यानमाला 19 जानेवारीपासून

    बेळगाव : दहावी परीक्षा ही विद्यार्थ्यांच्या जीवनातील अतिशय महत्त्वाची परीक्षा आहे. त्यासाठी या परीक्षेमध्ये चांगले गुण मिळवण्यासाठी विद्यार्थ्यांना परीक्षेचे योग्य मार्गदर्शन मिळणे गरजेचे आहे. विद्यार्थ्यांची ही अडचण ओळखून बाळगोपाळ एसएसएलसी व्याख्यानमालेचे आयोजन केले आहे. रविवार दि. 19 जानेवारी रोजी सकाळी 9.30 वाजता व्ही. एस. पाटील हायस्कूल माच्छे येथे …

Read More »

स्वामी समर्थ आराधना केंद्रातर्फे समर्थांच्या पादुकांचे भव्य स्वागत

  बेळगाव : अक्कलकोट येथील श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळ यांच्यातर्फे सुरू झालेली पालखी परिक्रमा बुधवारी सायंकाळी पाच वाजता स्वामी समर्थ आराधना केंद्र त्रिमूर्ती कॉम्प्लेक्स, महाद्वार रोड येथे आल्यावर भव्य स्वागत करण्यात आले याप्रसंगी पालखीचे स्वागत उपमहापौर आनंद चव्हाण, नगरसेवक नितीन जाधव, नगरसेविका नेत्रावती भागवत, पायोनियर बँकेचे चेअरमन प्रदीप अष्टेकर …

Read More »